आजच्या सामन्यातील अग्रलेख वाचला का?
नसेल तर पहा...
मराठ्यांचे पुन्हा एकदा 'पानिपत'- शिवसेना
मुंबई
अखंड महाराष्ट्रासाठी राज्यात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याने काय खस्ता खाल्या हे कदाचित नव्या पिढीला माहीत नसावे, त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, त्यांना भगव्या झेंड्याचे तेज ठावूक नाही आणि म्हणूनच त्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचे काम केले आहे. त्यामुळेच फदफितुरीतून मराठी मतांमध्ये फूट पाडणा-यांना साथ देऊन मराठी एकजुटीच्या पुन्हा एकदा ठिक-या उडविल्या आहेत. पुन्हा एकदा पानिपतचा कित्ता गिरवला आहे, अशा शब्दात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर तरुण मतदारांवर फोडले आहे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे, की मोगलाईतही मराठी माणसे मानाची सरदारपदे भूषवित होती. त्यांच्याही पालख्या, अंबा-यांमध्ये हत्ती झुलत होते. मात्र त्यांच्या पालख्या अंबा-या आणि शिवरायांचे तेज यात जमीन आस्मानचा फरक होता. शिवरायांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगवणे शिकवले. तेच तेज आणि तोच स्वाभिमान शिवसेनेने मराठी माणसाला दिला. मात्र त्या बदल्यात मराठी माणसांनी आम्हाला पराभवाची फुले दिली. पराभवाची फुले शिवसेनेच्या पदरी आली असली तरीही ती आम्ही त्यांचे निर्माल्य होऊ न देता ती जपून ठेऊ कारण त्यातूनच पुन्हा उद्याच्या क्रांतीच्या ठिणग्या उडणार आहे.
आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षांत नक्षलवाद, दहशतवाद, मुंबईवरील हल्ला, भूक, बेरोजगारी, लोडशेडिंगचा अंधार आणि सुमारे 22 हजार शेतक-यांच्या आत्महत्या दिल्या हे त्यांचे योगदान कमी की काय म्हणून जनतेने महाराष्ट्राला पुन्हा एकदा नरकात ढकलले आहे. हे शासन उखडून फेकण्याची एक संधी जनतेने पुन्हा एकदा घालवली आहे.
या लेखातून पक्षाच्या पराभवाला आणि मराठी मतांमध्ये फूट पाडण्यास पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला जबाबदार ठरविण्यात आले असून राज यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा जय होणे हाच आपला विजय वाटत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. तरुणांनी पळत्याच्या पाठीमागे (मनसे) लागण्याचा मुर्खपणा केला असला तरीही या पळत्याच्या पाठीमागे लवकरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा ब्रह्मराक्षस लागणार आहे हे विसरून चालणार नाही, असा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे.
------------
वि.सू.- हा अग्रलेख बाळासाहेबांनीच लिहिला असे आमचे म्हणणे नाही. मात्र वृत्तपत्रातील सर्वच मजकुरासाठी विशेषतः संपादकीय लेखांसाठी संपादक जबाबदार असतो असे संकेत असल्याने त्यात बाळासाहेबांचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात तो पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून किंवा तत्सम संपादकीय सहका-यांकडून लिहून घेतला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
प्रतिक्रिया
23 Oct 2009 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामनाचे संपादकीय वाचणारे अनेक आहेत त्यापैकी आम्ही एक. पराभव पक्षाला जिव्हारी लागला आणि त्यातली दु:ख दायक वेदना वाचायला तिथे मिळते . काल 'स्टार न्यूज' वर 'वंश' नावाचा एक कार्यक्रम दाखविला मा.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय 'वंशा'चा प्रबोधनकारापासून ते उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आढावा त्यात घेतला. आणि समारोपात राजकडे असलेली वकृत्त्व आणि आक्रमकता युवकांचे पाठबळ सेनेच्या कार्याध्यक्षाकडे नाही. असा तो सारांश होता.
दहा वर्ष सत्तेवर असणा-यांच्या विरोधात कौल जाईल असेही वाटत होते. पण इथे तसे घडले नाही. कारण विरोधीपक्ष म्हणून जवाबदारी नीट पेलता आली नाही, हे एक कारण जसे आहे तसे दोन-दोन वेळेस निवडून येऊनही सेनेच्या आमदारांनी विकासाकडे पाठ फिरवली हेही एक कारण त्याला आहेच. आमचा औरंगाबाद जिल्हा सेनेचा बालेकिल्ला पण यावेळे सेनेला चारीमुंड्या चीत व्हावे लागले त्याचे एकमेव कारण म्हणजे स्वतःचा विकास करण्यावर भर या आमदारांनी दिला आणि त्यांना जनतेने धडा शिकवला. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी झाली असावी. असो,मनसे फॅक्टर कारणीभूत आहे याबद्दलही शंका नाहीच. पण, सतत भावनेला हात घालून निवडून येता येत नाही. हे शहाणपण सेनेला यायला हरकत नाही. हीच परिस्थिती राहिली तर सेनेला भविष्यकाळ फार उज्वल आहे असे वाटत नाही. त्यांना उतरती कळा लागली आहे असे वाटते. ज्या काँग्रेसने शिवसेना पोसली तीच आता मनसे पोसणार आहे. तेव्हा येणारा काळ हा मनसेचाच असेल असे वाटते.
वि.सू.- हा अग्रलेख बाळासाहेबांनीच लिहिला असे आमचे म्हणणे नाही. मात्र वृत्तपत्रातील सर्वच मजकुरासाठी विशेषतः संपादकीय लेखांसाठी संपादक जबाबदार असतो असे संकेत असल्याने त्यात बाळासाहेबांचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात तो पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून किंवा तत्सम संपादकीय सहका-यांकडून लिहून घेतला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
संजय राऊत संपादकीय लिहितात आणि पडद्यामागून सेना चालवितात हेही सर्वांना ठाऊक आहे, त्याची चिंता नसावी. :)
-दिलीप बिरुटे
24 Oct 2009 - 3:57 pm | दशानन
:)
१००% सहमत.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
23 Oct 2009 - 11:36 am | जे.पी.मॉर्गन
सगळे शेवटी सारखेच... निदान मनसेची ही पहिली खेप आहे... काही केलं त्यांनी तर ठीक नाहीतर पुन्हा आहेच 'ये रे माझ्या मागल्या' !
23 Oct 2009 - 11:36 am | विजुभाऊ
शिवसेनेबद्दल प्रेम आणि सहानुभुती असूनही विचारावेसे वाटते की विरोधी पक्ष म्हणून सेनेने संपूर्ण विधानसभेच्या कालावधीत कर्तृत्वाचे कोणते दिवे लावले होते?
त्यानी कोणता प्रश्न धसास लावला होता? कोणत्या प्रश्नावर विधीमंडळात सत्ताधारी पक्षास कोंडीत पकडले होते?
मराठी भाषेच्या / भुंईपुत्रांच्या प्रश्नांवर राजठाकरे जेंव्हा महाराष्ट्रभर रान उठवततेंव्हा त्या प्रश्नावर शिवसेना मूग गिळून गप्प बसली होती.
भाजपने त्याबद्दल तर विश्वामित्री पावित्राच घेतला होता.
मराठी माणसाला या गोष्टी दिसत नसतील असे मानायचे आहे का?
मराठी भाषेबद्दल शिवसेनेने फारकत घेतली आणि भाजपसारख्या विचारसरणी हरवलेल्या पक्षाबरोबर वहात गेल्यानेच शिवसेनेबद्दल लोकांत नाराजी आहे हे बाळासाहेब ठाकर्याना पुत्रप्रेमामुळे दिसत नाही.
स्वतःच्या आणि सोबत असलेल्या पक्षाच्या नाकर्तेपणामुळे मतदारानी नाकारले हे कबूल करण्याऐवजी फंदफितुरीमुळे पराभव झाला हे कार्यकर्त्याच्या मनावर फसवणूकीची फुंकर घालायला बरे वाटते. पण त्याऐवजी सेनेच्या नेतृत्वाने आत्मशोधन करावे
यातून काही तरी शिकण्याची सेनेला उपरती व्हावी ही श्रीचरणी प्रार्थना .
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
23 Oct 2009 - 2:41 pm | विशाल कुलकर्णी
विजुभाऊंशी पुर्णपणे सहमत !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Oct 2009 - 11:40 am | विष्णुसूत
वरील लेखातील फक्त एक वाक्य बरोबर वाटतं :
"पराभवाची फुले शिवसेनेच्या पदरी आली असली तरीही ती आम्ही त्यांचे निर्माल्य होऊ न देता ती जपून ठेऊ कारण त्यातूनच पुन्हा उद्याच्या क्रांतीच्या ठिणग्या उडणार आहे"
अशी क्रांती लवकर घडो हिच सदिच्छा.
राज ला अनेक शुभेच्छा !
23 Oct 2009 - 12:17 pm | विष्णुसूत
मनसे च्या रुपाने महाराष्ट्रात एक नवी चळवळ सुरु झाली आहे. मी ह्या चळवळी ची तुलना "संयुक्त महाराष्ट्र " आणि "शिवसेने च्या जन्माच्या चळवळी" शी करतो. महाराष्ट्रातील युवा वर्ग आणि शिक्षित/अशिक्षित वर्ग / विविध जाती, ह्या चळवळी शी किती समरस होतात आणि एकजुट दाखवतात हे महत्वाचे आहे.
ह्या राजकिय चळवळी चे भक्कम फाउन्डेशन झाले आहे , पुढे खंबीर नेतृत्व आणि सामाजिक आधार कसा मिळतो ह्यावर यश अवलंबुन आहे.
नाहितर शिवसेनेचं "मराठि-मराठि" , "हिन्दु- हिन्दु " असे जे झाले तसेच मनसे चे होइल आणि मराठि युवक हा निराश, बेरोजगार आणि अपयशीच राहिल !
23 Oct 2009 - 12:41 pm | अमोल केळकर
सहमत
जय महाराष्ट्र !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
23 Oct 2009 - 1:05 pm | देवदत्त
फक्त नव्या पिढीला दोष देऊन काय फायदा? त्यांच्यातील जुन्या पिढीतील लोकही बाहेर पडलेच ना? त्या लोकांना सांभाळून का ठेवता आले नाही ह्याचाही शिवसेनेने विचार करावा.
आणि आपल्या जुन्या उमेदवारांना डावलून नवीन अननुभवी लोकांना ती जागा देणे ह्यात जर तो नवीन उमेदवार हरला तर दोष कोणाचा?
आणि विजुभाऊंच्या
स्वतःच्या आणि सोबत असलेल्या पक्षाच्या नाकर्तेपणामुळे मतदारानी नाकारले हे कबूल करण्याऐवजी फंदफितुरीमुळे पराभव झाला हे कार्यकर्त्याच्या मनावर फसवणूकीची फुंकर घालायला बरे वाटते. पण त्याऐवजी सेनेच्या नेतृत्वाने आत्मशोधन करावे
ह्या वाक्याशीही सहमत.
असो, आता तरी विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने आपली भूमिका नीट पार पाडावी ही आशा.
काँग्रेस पुन्हा आल्यामुळे "हे शासन उखडून फेकण्याची एक संधी जनतेने पुन्हा एकदा घालवली आहे. " ह्याच्याशी मी ही सहमत.
मनसेचे अभिनंदन व शुभेच्छा. त्यांनीही मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावा ही अपेक्षा.
23 Oct 2009 - 1:07 pm | प्रणित
जेव्हा राज बाळासाहेबांसोबत राहुन राजकारणाचे धडे गिरवत होता तेव्हा उध्दव विमानात बसुन फोटो काढत होता.
कुठेतरी उध्दव कमी पडतो हे मान्य करायच सोडुन उगाच राज ला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे.
23 Oct 2009 - 1:07 pm | प्रणित
जेव्हा राज बाळासाहेबांसोबत राहुन राजकारणाचे धडे गिरवत होता तेव्हा उध्दव विमानात बसुन फोटो काढत होता.
कुठेतरी उध्दव कमी पडतो हे मान्य करायच सोडुन उगाच राज ला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे.
23 Oct 2009 - 1:08 pm | प्रणित
जेव्हा राज बाळासाहेबांसोबत राहुन राजकारणाचे धडे गिरवत होता तेव्हा उध्दव विमानात बसुन फोटो काढत होता.
कुठेतरी उध्दव कमी पडतो हे मान्य करायच सोडुन उगाच राज ला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे.
23 Oct 2009 - 1:16 pm | कोदरकर
कॉग्रेस मनसे ला १०० जागा मिळे पर्यत वाढवेल नन्तर परत एखादा राज उभा करेल.. ४-४.५ वर्ष काही न करता सत्ता चाखावि नन्तर विरोधक फोडावे असे छान तंन्त्र त्याना जमले आहे.. एक विश्लेषण छान होते.. ४-४.५ वर्ष कोनि खाल्ले हे जनते ला लक्षात राहू नये या साठी मुख्यमंत्री बदलावा....
23 Oct 2009 - 1:49 pm | शरदिनी
अवांतर :
यावेळी मनसेला मत दिले...
त्याबद्दल अपराधी वाटून घ्यावे काय?' असा काल विचार करत राहिले...
23 Oct 2009 - 2:24 pm | मड्डम
मत दिले आणि विचारपूर्वक दिले. त्यानंतर अपराधी वाटून घेण्याची गरज ती काय?
23 Oct 2009 - 6:56 pm | वेताळ
मनसे ला मत दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
वेताळ
23 Oct 2009 - 2:26 pm | योगी९००
वाईट फक्त बाळासाहेबांविषयी वाटते. त्यांना या वयात हे सर्व बघावे लागत आहे. उद्धवाने थोडाफार शिवसेनेचा चेहरा बदलला पण त्याचे प्रयत्न असफल ठरले. मात्र त्याचे आणि शिवसेनेचे हसू झाले.
बाळा नांदगावकरांनी जिंकून आल्यावर "माझ्या आईसारख्या शिवसेनेला हरवून निवडणूक जिंकलो याची खंत वाटते" असे उद्गार काढले. यातच मनसेचे शिवसेनेविषयी आणि बाळासाहेबांविषयी प्रेम दिसते.
माझ्यामते बाळासाहेबांनी स्वतः पुढे येऊन हा वाद मिटवायला पाहिजे होता. आता ते शक्य दिसत नाही. माझ्यामते यापुढे कधीही शिवसेनेला किंवा मनसेला सत्ता मिळाली तरच आश्चर्य. त्यांच्या विरोधकांनी या भाऊबंदकीचा चांगलाच फायदा घेतला आहे.
अवांतर :
जनता शहाणी आहे. भ्रष्ट लोकांना परत निवडून दिले कारण त्यांची पोटे आधीच भरलेली (?) असल्याने त्यांना आणखी भ्रष्टाचार करावा लागणार नाही अशी अपेक्षा ठेवत आहे. नवीन कोण आला तर तो त्याचे पोट भरायचा प्रयत्न करेल असे वाटते.
खादाडमाऊ
23 Oct 2009 - 3:16 pm | गणपा
माऊच्या आवांतराशी सहमत.
जेव्हा पहिल्यांदा युती सत्तेवर आली तेव्हा खाबुगीरीचा इतका सापाटा लावला होता की त्याची फळ पुढच्या निवडणुकीत मिळाली.
सध्या जनता आसाच विचार करत असावी की पोट भरलेला, रिकाम पोट्या अधाश्या पेक्षा कमी खाईल.
23 Oct 2009 - 3:19 pm | मड्डम
मला तसं वाटत नाही. तर दरोडेखोरांपेक्षा चोर परवडतील म्हणून कदाचित पुन्हा संधी मिळाली असावी. चोर केवळ चोरीच करतील. दरोडेखोर तर साफ लुटून नेतील आणि वरून बदडतील ते वेगळेच.
23 Oct 2009 - 2:31 pm | Dhananjay Borgaonkar
मनसेचे अभिनंदन्..बाळासाहेबांनी अजुन सुदधा हट्टीपणा सोडला तर शिवसेना वाचु शकते. शेंबड्या पोराला सुद्धा आता महित आहे की उद्धवच्या मधे शिवसेना चालवण्याची ताकद नाहीये.
पण हेही तितकच खरं की सेनेची वाताहत झालेली पाहुन खुप वाईट वाटतय.
23 Oct 2009 - 7:53 pm | तिमा
मी जुन्या पिढीतलाच आहे. आणि शिवसेनेच्या जन्मापासून सर्व स्थित्यंतरे पाहिली आहेत.
शिवसेना स्थापन झाली तेंव्हा त्यांच्या विचारांचे आकर्षण नक्कीच वाटले होते. पण 'विसावा' हॉटेल जाळले हे तेंव्हाही सुसंस्कृत मनाला खटकले होते. तरीसुध्दा स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला मत देत होतो. पुढे शिवसेना भवन व 'मातोश्री' तयार होईपर्यंत 'खंडणीच्या व दादागिरीच्या इतक्या गोष्टी समजल्या की शिवसेनेबद्दल काही आत्मीयता राहिली नाही. पुढे आणीबाणीत जेंव्हा 'साधना' सारखी साप्ताहिकेसुध्दा जमेल तसा लढा देत होती तेंव्हा शिवसेनेचे व ठाकर्यांचे वर्तन अगदीच केविलवाणे होते. पुढचा संपत्ती गोळा करण्याचा, लोकांच्या तोंडाला काळे फासण्याचा , हिंदुत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन सर्व उत्तर भारतीयांना अभय देण्याचा प्रवास हा उबगवाणा होताच, पण ज्या इंदिरेच्या घराणेशाहीबद्दल यांनी झोड उठवली तेच आचरण ते आज स्वतः निलाजरेपणे करत आहेत.
मराठी माणूस स्वाभिमानी आहे पण उर्मट नक्कीच नाही. पण यांच्या वर्तनाने सार्या देशाचा तसा समज झाला आहे.
राज ठाकरे पण त्याच मुशीत तयार झाला आहे. तेंव्हा त्याच्याकडून जे अवास्तव अपेक्षा ठेवत आहेत त्यांची मला कींव येते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
23 Oct 2009 - 8:26 pm | निमीत्त मात्र
तिरशिंगरावांशी सहमत आहे.
24 Oct 2009 - 1:59 am | विष्णुसूत
तिरशींग रावां चे काहि विचार पटतात पण खालील वाक्य नाहि:
"मराठी माणूस स्वाभिमानी आहे पण उर्मट नक्कीच नाही. पण यांच्या वर्तनाने सार्या देशाचा तसा समज झाला आहे."
ह्या उलट मराठि माणुस स्वाभिमानी नाहि फक्त उर्मट आहे.
महाराष्ट्राची अधोगती चे हेच कारण आहे. मी किती शहाणा हा माज करत रहाणे. कार्य करुन दाखवण्यात शुन्य. चाकरी करण्यात स्वत: ला धन्य मानण्यात पुढे. शरद पवार आदि लोकांनी फक्त दिल्लीत मुजरा करण्यात धन्यता मानली.
राष्ट्रवादि कॉन्ग्रेस ह्यात काय राष्ट्रवादि आहे ?
सोनीयाच्या पायाचे चुंबन घेणं ?
उद्दा राज, राणे, भुजबळ एकत्र आले तर एका झटक्यात सत्तांतर होइल.
24 Oct 2009 - 5:15 am | अडाणि
बरोबर आहे ...
आपल्या प्रतिसादात शरद पवारांचे मुल्य मापन करून आपण हे उदाहरणासह दाखवून दिलेले आहे. परिस्तिती आणि फॅक्ट माहिती नसताना, उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या न्यायाने पवारांविरोधी बरळत राहणे ह्यातही स्वतःला धन्य मानणारे बरेच आहेत.
-
अफाट जगातील एक अडाणि.
23 Oct 2009 - 8:20 pm | Dhananjay Borgaonkar
तिरशिंगराव तुम्ही म्हणताय ते पटतय्..माझ फक्त एवढच म्हण्ण आहे की दगडापेक्शा वीट मऊ.
काँग्रेसवाले काय कमी मवाली आहेत...असो.
23 Oct 2009 - 8:59 pm | शिवापा
लोकशाहीत जनताच सार्वभौम वैगेरे असते. त्या जनतेनेच कॉग्रेसी नरकासुरांना सलग तिस-यांदा विजयी केले आहे. त्यावर आम्ही आणखी काय प्रतिक्रिया व्यक्त करणार?
आपण सगळे वैगेरे वैगेरेच आहोत का हे जरा तपासुन पहायला लागेल. बाकि कालचा अग्रलेख वाचला अन मग आजचा तर प्रचंड करमणुक होतेय.
http://www.saamana.com/2009/Oct/22/agralekh.htm हा कालचा
http://www.saamana.com/2009/Oct/23/agralekh.htm आणि हा आजचा.
24 Oct 2009 - 1:05 am | दिलीप वसंत सामंत
शिवसेनेने फक्त "मराठी" हाच मुद्दा धरून राजकारण करावे व ते सुद्धा
भाजप सारख्या कसलेही मूलभूत धोरण नसलेल्या पक्षाची साथ सोडून फक्त स्वबळावर. बाकी इतर जे काही सारे म्हणतात "खंडणी, गुंडगिरी, भ्रष्टाचार" त्यात सारेच एकाच माळेत. ह्यात बदल विचारी नागरिक घडवू शकतो. मते चांगल्या माणसाला द्या पक्षाला देऊ नका.
आजचा विचार करू नका फार पुढचा विचार करा. माणसाचे आयुष्य
७०-८० वर्षे समाज राष्ट्र कायमचे. आजचे तुमचे मत भविष्यातील समाज बदलेल - कदाचित ५० वर्षांनंतरचा - असा विचार करून द्या. हा विचार विचित्र वाटेल पण ते अशक्य नक्कीच नाही.
अनपेक्षित धक्क्याने सारेच गोंधळतात तसाच हा अग्रलेख. परंतू यातून शिवसेना नक्कीच सावरेल कारण कोणताही पक्ष जनता संपवते अगर मोठा करते, इतर पक्ष किंवा व्यक्ती नाही.
24 Oct 2009 - 4:42 pm | अविनाशकुलकर्णी
राष्ट्र्वादिला मिळालेले यश नेत्र दिपक आहे.. यात शंका नाहि..सारे अंदाज खोटे पाडले...६२+१२ बंडखोर्=७४ जागा...
मुंबईत काहि दिवसानि मराठी हा मुद्दा रहाणार का? का पुढच्या निवडणुकिच्या वेळी निरुपम ४५ जागा उ.भा साठी राखिव ठेवण्यास भाग पाडेल..व त्या वेळचे मुख्य मंत्री आदरणीय कृपा शंकर जीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजी ते मान्य हि करतिल.
24 Oct 2009 - 4:53 pm | चिरोटा
मनसेने तेरा लोक निवडून लोकांचा कल कुठे जात आहे ते स्पष्ट केले आहे. कुठचाही पक्ष सत्तेवर असो, लोकांच्या भावनांविरुध्ध सारखे निर्णय घेता येत नाहीत. सोनिया गांधींनी/काही काँग्रेस नेत्यांनी प्रचारसभेत 'जय महाराष्ट्र' म्हणणे ह्यात सर्व काही येते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न