थाई करी पेस्ट
थाई करी पेस्ट ही दोन प्रकारची असते. रेड आणि ग्रीन. आपल्याकडे जसे प्रत्येक घरच्या मसाल्यात थोडा फार फरक असतो तसेच या पेस्टचे. यातील काही जिन्नस भारतात मिळायची शक्यता कमी तेव्हा त्याला पर्यायही देतेय.
रेड करी पेस्ट
५ लाल सुक्या मिरच्या, चिरुन
१ १/२ टे. स्पून शॅलोट ( लाल कांदा चालेल, लसूण थोडा जास्त वापरायचा), चिरुन
१/२ टे. स्पून अगदी बारीक चिरुन लेमन ग्रास म्हणजे आपला गवती चहा असतो त्याचा फक्त दांडा
१/२ टे. स्पून लसूण, बारीक चिरुन
१ टी स्पून बारीक चिरलेले गलांगल( आले चालेल)
१/२ टी स्पून बारीक चिरून लिंबाची फक्त साल(lime zest) . (थाई जेवणात kaffir lime ची साल आणि पाने वापरतात).
२ डहाळ्या कोथींबीर बारीक चिरून(पाने, देठ, असल्यास मूळ ही)
१ टे. स्पून धणे, भाजून
१/२ टी. स्पून जिरे, भाजून
१/२ टी स्पून shrimp paste( याला पर्याय नाही. फरमेंट केलेली सुकट ची पेस्ट असते. विचित्र वास असतो तेव्हा वापरली नाही तरी चालेल)
१/२ टी स्पून मीठ
हे सगळे एकत्र वाटायचे.
ग्रीन करी पेस्ट
यात लाल मिरच्यांऐवजी १०-१२ हिरव्या मिरच्या वापरायच्या. आणि कोथिंबीर थोडी जास्त वापरायची.
मला स्वतःला तरी किंमत आणि वेळेचा हिशोब करता $२-$३ ला ४०० ग्रॅमचा पेस्टचा जार आवडतो. तसेच वाटणाची भानगड नसल्याने माझा मुलगा हौसेने थाई फूड बनवतो and that is priceless.
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 6:21 pm | विंजिनेर
सोपी दिसतेय... श्रींप पेस्ट सोडून सगळे मिळावे...
23 Oct 2009 - 3:29 pm | मसक्कली
फोटु द्या... :W
प्रतिसाद तेव्हाच दिला जाइल... :B :B :B
23 Oct 2009 - 3:32 pm | सहज
ते कोल्हापूरचा जसा तांबडा रस्सा व पांढरा रस्सा असतो अगदी तसेच महत्वाच्या ह्या रेड करी पेस्ट, ग्रीन करी पेस्ट
(थाई ग्रीन चिकन करीचा फॅन) सहज
23 Oct 2009 - 11:24 pm | मिसळभोक्ता
"दाम करी काम"
आणि
"थाई करी पेस्ट"
अशी दोन शीर्षके वाचून अंमळ संभ्रमित झालो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)