गाभा:
या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा...
आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात .
रत्नागिरी आणि देवगड ..
बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा?
मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही..
तर आपले यावर मत काय ?
माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही..
चवीचा प्रश्न आहे हो !
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 10:12 am | पर्नल नेने मराठे
चुचु
7 Oct 2009 - 10:14 am | विजुभाऊ
अधीक माहितीसाठी
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८)
http://misalpav.com/node/2538 = एप्रिल फळ (९)
7 Oct 2009 - 10:37 am | llपुण्याचे पेशवेll
बाठीला खराब निघत असेल तरी देवगड हापूस.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
7 Oct 2009 - 10:48 am | छोटा डॉन
>>तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा
करेक्ट ...
बाकी देवगड असेल हो सर्वात बेश्ट, अजुन कुठला असायला ?
दुसरा कुठला जरी असला तरी देवगड त्याला फाट्यावर मारेलच, मग बाकीच्याच्या भारी असण्याला अर्थ काय उरला ? त्याचा भारीपणा आम्ही कुठल्या खात्यावर मांडायचा ?
आमचे मत देवगडला ..!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
7 Oct 2009 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमचंही मत देवगडला.
अदिती
तुम्हाला गुळाची चव समजत असेलच!
7 Oct 2009 - 10:55 am | llपुण्याचे पेशवेll
आमचेही मत देवगडाला आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो.
बाकी देवगडाला फाट्यावर मारायला माणकूर कशाला पाहीजे? देवगड सोडून कुठलाही चालेल. फाट्यावर मारणं महत्वाचं.
पुण्याचे पेशवे
7 Oct 2009 - 11:01 am | नंदन
पेशव्यांशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Oct 2009 - 11:32 am | निखिल देशपांडे
आमचही मत देवगडलाच
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
7 Oct 2009 - 11:51 am | सखाराम_गटणे™
आमचे ही मत देव्ग्द ला
देवगड कोणत्याही आंब्याला फाट्यावर मारु शकतो. अगदी अमेरिकन अल्फासो सुद्धा.
7 Oct 2009 - 11:54 am | श्रावण मोडक
आंब्यांची उस्तवारी इतक्यात सुरू झाली? छान.
आमचे मत देवगडलाच. फळ गोमटे आहे.
7 Oct 2009 - 11:03 am | गोगट्यांचा समीर
>>त्याचा भारीपणा आम्ही कुठल्या खात्यावर मांडायचा ?
रत्नागिरी.. या खात्यावर / नावावर मांडा की हो ...
अस्सल रत्नागिरीकर तर म्हणतात की रत्नागिरीच्या १०० किमी परिघाबाहेर आंबा कळत नाय विशेष ..
7 Oct 2009 - 10:52 am | जे.पी.मॉर्गन
ही अशी छायाचित्र कृपया टाकू नका हो ! न ते ही ऑक्टोबर महिन्यात ......... त्रास होतो !
आमचं मतही देवगडलाच बरंका !
7 Oct 2009 - 11:41 am | Nile
दोन्ही आंबे पेटीभर पाठवा, पुर्ण अभ्यासाअंती निर्णय जाहीर करतो.
एक्स्परीमेंटलीस्ट,
५-६ वर्षांपासुन पायरीची पण चव विसरलेला. :|
7 Oct 2009 - 12:07 pm | व्यंकु
गोगट्यांच्या समीरशी सहमत रत्नागिरी हापूसला तोड नाही.
7 Oct 2009 - 12:10 pm | व्यंकु
खोबरी आंबा हा प्रकार कोणी खाल्लाय का? हे फळ कितीही कच्चं असलं तरी याला यत्किंचितही आंबटपणा नसतो.
7 Oct 2009 - 12:22 pm | अवलिया
दोन्ही प्रकारचे आंबे दोन दोन डझन पाठवुन द्या.
खावुन सांगतो कोणता चांगला ते ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Oct 2009 - 1:21 pm | हर्षद आनंदी
समीर, का रे तुला आंबा आठवला? @)
या दिवसात मस्त पेरु, पपई, संत्रे, मोसंबे, डाळिंबे, सफरचंद खायची सोडुन आंब्यांची अवदसा कोठुन आठवली बाबा तुला?
चुचुताई, असे फोटो टाकुन बादलीभर लाळ गाळायला लावणे, बास करा आता ;;) ;;)
सध्या देवगड हापुसच्या रसाने भरलेल्या (घरघुती) बाटल्या संपविण्यात मग्न आहोत, त्यामुळे आंब्याची अशी ऊणीव भासत नाही.
7 Oct 2009 - 2:32 pm | गोगट्यांचा समीर
आठवणेच हातात आहे म्हणून आठवला... :)
7 Oct 2009 - 2:50 pm | गणपा
आज आत्ता ताबडतोब आंबे चापून येतो !! आलोच थांबा !!
(इकडे १२ मास आंबे मिळतात)
बाकी आपण आंबे देवगड की रत्नांगिरी असल्या वांझोट्या चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा , सरळ संपवतो ..
;)
7 Oct 2009 - 3:27 pm | पर्नल नेने मराठे
इकडे पण १२ महिने मिळ्तात पण ते फिलिपिन्स चे असतात :S
चुचु
7 Oct 2009 - 10:10 pm | टारझन
हॅहॅहॅ ... फिलीपिन्स चे आंबे फारंच छोटे असतात म्हणे ... अफ्रिकेत एकेक आंबा हे एवढा एवढा ... कितीपण खा .. :) एकात गार ..
बाकी आपल्याला तर ह्या आधीच म्हंटल्याप्रमाणे तोतापुरी आंबाच आवडतो ..
बाकी आंबे कसे थुलथुलीत न लिबलिबीत, पिचलेले.. खराब होतात लगेच .. ह्याआआआआ !!
- (तोतापुरी आंबे प्रेमी) टार्या
7 Oct 2009 - 8:01 pm | आर्य
का असा काटा कढताय, असे झकास फोटु लाऊन.
आंबा म्हणजे आंबा, पण ...देवगडला तोड नाहि.....................
8 Oct 2009 - 12:33 am | आशिष सुर्वे
कनचा पन..
देवगडचो असा, रत्नागिरीचा असो नायतर आमच्या चिपलूनचा..
जल्ला आम्बा म्हनला की आपन 'ठार'..
माझे खाजगी मत मात्र 'देवगड'च्या हापूस आंब्यालाच!!
ह्याच विषयाला धरून थोडे बोलू इच्छितो.. ( कृपा करून 'विषयांतर..विषयांतर.. म्हणून ओरडू नये, ही विनंती.. :) )
वर 'खोबरी आंबा' चा उल्लेख आला आहे.
कधी जमले तर्र या आमच्या गावाला.. शेजार्यांच्या पडवीत आहे एक झाड.. आम्ही ह्या प्रकारच्या आंब्याला 'खोबरांबा' म्हणतो..
हा खरेच आंबट नसतो.. लहानपणी आम्ही सवंगडी गोळा करून हे आंबे दगडाने पाडून, अंगावरच्या शर्टाला पुसल्यासारखे करून खोबर्याची कवड खावी तसे खायचो..
आमच्याकडे बहुतांशी 'रायवळी' आणि 'कलमी' प्रकारचे आंबे असतात.
'रायवळी' प्रकारात.. 'साधा हिरवा', 'रातांबा' (हा देठाकडे थोडा लाल-पिवळसर असतो), 'खोबरांबा' आणि 'आमटांबा' (हा फारच आंबट असतो).. हे आंबे येतात..
आफ्रिकेत (नायजेरियामध्ये) जवळजवळ ९ महिने भरपूर आंबे मिळायचे.. पण त्यांची तुलना इथे करणे म्हणजे 'पु.लं.'च्या भाषेत 'गांडूळाला शेष म्हणन्यासारखेच आहे'
ह्या धाग्याच्या अनुषंगाने आपणही माहितीत थोडी भर घालावी ही नम्र विनंती..
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी ताज्या कैरी पाडून आजीच्या हातून त्याला तिखट-मीठ-तेल लावून जेवणावर बचकाभर खाल्लेल्याच्या आठवणी जाग्या होतात..
सुट्टी संपत आली की आजीची आंबे-फणसाची 'साठे' (आंबा-पोळी, फणस-पोळी) करतेवेळी होत असायची ती लगबगही आठवते..
ह्या आठवणी अजूनही हळव्या करून जातात..
-
हुंड्यात हापूस आंब्याची झाडे मागण्याच्या विचारात असणारा..
कोकणी फणस
8 Oct 2009 - 8:10 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्याकडे रातांबा कोकमालाच म्हणतात. त्याचा उच्चार रातांबीचं झाड असा असतो. म्हणजे झाडाला रातांबीचं झाड म्हणतात. त्याची लाल फळं पाडवून ती फळं फोडून त्यापासून आमसोलं करतात.
पुण्याचे पेशवे
8 Oct 2009 - 6:20 am | श्रीकृष्ण सामंत
आंब्यात आंबा देवगडचा.रत्नागिरी आंबा म्हटलं तरी तो देवगडचाच अश्या उद्देशाने म्हटलं जातं.
पातळ साल,केशरी रंग,भरपूर गर,आंबा चांगला पिकला म्हणजे त्याच्या सालीला सुरकुत्या पडतात,एक वेळ "एलिझाबेद परफ्युम" लपवूं शकाल पण देवगडचा हापूस अश्यक्य.नाकाजवळ आंबा आणल्यावर सुगंध दरवळतोच शिवाय डोळे चमकतात,तोंडात लाळ येते,पोटात भूक वाढते,आणि खाऊ का गिळू असं वाटतं.
मी कोकणातलो म्हणून देवगडच्या आंब्याचे गुण गातंय!
काय समजल्यात?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
8 Oct 2009 - 9:53 am | चिरोटा
बरोबर. १९८१ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता.देवगड रत्नागिरी जिल्ह्याचाच भाग होता. नविन जिल्हा झाल्यावर देवगड हापुस बाजारात येवू लागला. २० वर्षापुर्वीपर्यंत लाकडी पेटीतून आंबे येत. परळ बस स्थानकातून आंब्याची पेटी एस टी वरुन उतरवताना बघणे हा सुट्टीच्या दिवसांतला एक भाग असायचा.खिळे ठोकून बनवलेली पेटी उघडणे ही एक डोकेदुखी असायची.आता जाड पुठ्ठ्यांच्या पेट्या असल्याने पेटी उघडून पटकन आंबे खाता येतात.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न