मुंबईतील बोरीवलीच्या नॅशनल पार्कात मॉर्निंग वॉकचा आस्वाद घेणारे काही तरूण... :-)
अधिक प्रकाशचित्र माझ्या प्रतिबिंब अनुदिनीवर!
धन्यवाद!
मुंबईतील बोरीवलीच्या नॅशनल पार्कात मॉर्निंग वॉकचा आस्वाद घेणारे काही तरूण... :-)
अधिक प्रकाशचित्र माझ्या प्रतिबिंब अनुदिनीवर!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
12 Sep 2009 - 12:42 pm | दशानन
अरे वाह !
एकदम ग्रिटिंग कार्ड असावे असे छायाचित्र :)
कुल !
12 Sep 2009 - 1:08 pm | प्रभो
अरे वाह !
एकदम ग्रिटिंग कार्ड असावे असे छायाचित्र :)
कुल !
12 Sep 2009 - 12:43 pm | श्रावण मोडक
सुस्वागतम!
छायाचित्राबद्दल बाकी काहीही लिहित नाही. कारण ते सुरेखच आहे.
13 Sep 2009 - 11:07 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
12 Sep 2009 - 12:45 pm | मदनबाण
वरील फोटोत कुठले सॉफ्टवेयर वापरुन बदल केले आहेत का ?
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
12 Sep 2009 - 12:48 pm | लवंगी
मॉर्निंग वॉकचा मूड बनला बघ हे चित्र बघून
12 Sep 2009 - 1:02 pm | सोनम
फोटो खूपच सुदंर आहे. :) :) :)
वरील फोटोत कुठले सॉफ्टवेयर वापरुन बदल केले आहेत का ?
:? :? :?
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
12 Sep 2009 - 1:02 pm | टारझन
अरे वा ? केवळ अप्रतिमच की !!
-(तरुणीप्रेमी) टारोबा व्हल्गर
12 Sep 2009 - 3:28 pm | सहज
सकाळचे कोवळे उन अतिशय मस्त आले आहे फोटोमधे!
12 Sep 2009 - 4:10 pm | राघव
असेच म्हणतो.
खूप सुंदर फोटो. येऊ देत अजून.
राघव
12 Sep 2009 - 6:08 pm | विसोबा खेचर
सुरेख फोटू...!
12 Sep 2009 - 6:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुं द र ... तुमच्या ब्लॉगावरचे इतर काही फोटोही पाहिले ... अधिकच सुंदर.
अदिती
12 Sep 2009 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते
एकदम बेष्टं... अजुन शब्द काय सापडेना!!!
बिपिन कार्यकर्ते
12 Sep 2009 - 8:14 pm | sujay
क्लास्स फोटू !!
ब्लॉगावरचे बाकी फोटो पण लई भारी , होमपेज वरचा तर अप्रतीम.
सुजय
13 Sep 2009 - 12:23 am | प्राजु
फारच सुरेख फोटो आहेत तुम्ही काढलेले.
सगळेच खूप आवडले. हाजीअली चा सुर्यास्ताचा फोटो फारच आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Sep 2009 - 1:09 am | शाहरुख
फोटो क्लासच आहेत..
आपण फोटोग्राफीबद्दल लिहावे ही विनंती.
13 Sep 2009 - 1:51 am | टुकुल
फोटु तर एकदम मस्त...
आपल्या ब्लॉगावरचे इतरही फोटो पाहिले ... तुम्ही फोटोग्राफीबद्दल लिहावे हि विनंती..
--टुकुल
13 Sep 2009 - 2:03 am | चतुरंग
छायाचित्रकलेबद्दल लेखन करु शकाल का? एक विनंती.
चतुरंग
13 Sep 2009 - 12:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
मिपावरच्या कंपूबाजांनो, अभिजीतला लेखन करण्याची एकदिलाने विनंती करू या!
अदिती
13 Sep 2009 - 1:04 pm | भडकमकर मास्तर
प्रत्येक फोटोशेजारी चित्राबद्दल थोडे लिहिले आहे ते खूप छान आहे...
अधिक सविस्तर खरंच लिहा..
वाचण्यास उत्सुक आहे...
इतक्या छान फोटोंबद्दल धन्यवाद...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
13 Sep 2009 - 3:38 pm | सहज
छायाचित्रकलेबद्दल लेखन करु शकाल का? एक विनंती.
प्लीज!
13 Sep 2009 - 3:43 pm | बिपिन कार्यकर्ते
फोटो, ब्लॉग्ज, सगळेच उत्कृष्ट!!! लेखन करावे ही विनंती.
बिपिन कार्यकर्ते
13 Sep 2009 - 2:45 am | स्वाती२
कसले खास फोटो आहेत! खूप आवडले.
13 Sep 2009 - 5:15 am | घाटावरचे भट
सुरेख फोटू!!
13 Sep 2009 - 12:16 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्र पाहुन डोळ्यांचे पारणे फिटले. अभिनंदन.
अशी सुंदर छायाचित्र आपल्यालाही काढता यावीत असे खूप वाटते. असे वाटणारे माझ्यासारखेच मिपावर अनेक सदस्य असतील. त्यांना काही मार्गदर्शन आपल्याकडून व्हावे अशी इच्छा आहे.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
13 Sep 2009 - 9:59 pm | अभिजा
धन्यवाद लोक्स! तुमच्या मनःपूर्वक अभिप्रायांमुळे आणि प्रोत्साहनामुळे आनंद झाला. :-)
इथे नित्यनेमाने फोटोज शेअर करायला आवडेल मला! ब-याच मित्रांनी मला फोटोग्राफीविषयी लेखनाची विनंती केली आहे. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो, की छायाचित्रणकले विषयी मी काही अधिकारपूर्वक लिहावे इतके ज्ञान अजून मला प्राप्त झाले नाही (असे माझे प्रांजळ मत आहे). एकमेकांच्या फोटोंबद्दल विचारांचे आदान-प्रदान जरूर होईल. त्यातूनही मला बरेच काही शिकायला मिळेल अशी खात्री वाटते. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार! :-)
13 Sep 2009 - 11:22 pm | अजय भागवत
तुमच्या अनुदिनीवरीलही फोटो पाहिले...किमयागारच आहात तुम्ही!
14 Sep 2009 - 12:26 pm | अभिजा
अजय, धन्यवाद! किमया निसर्गाची! आपण फक्त साक्षीदार! :-)
14 Sep 2009 - 8:01 am | सूर्य
फोटो खुपच मस्त आहेत. किती आवडले ते शब्दात व्यक्त करता येत नाहीये.
फोटो काढताना कसा काढला. त्यानंतर त्यावर काही संस्करण केले का. याबद्दल जमल्यास थोडी माहिती द्यावी अशी विनंती करतो.
-सूर्य
14 Sep 2009 - 12:30 pm | अभिजा
सूर्य, धन्यवाद! फोटो काढताना कसा काढला, हे फोटो शेअर करताना सांगण्याचा प्रयत्न करेन. संस्करण हे कोणत्याही फोटोवर व्हावेच लागते. पूर्वी जे डार्करूममध्ये करायचे ते आता संगणकात करतात एवढेच!