हे मी जो पोलाद कारखाना चालवितो त्यातील विनाखंड ओतकाम (Continuous Casting) करणार्या मशीनवरील छायाचित्र आहे. (पाच स्ट्रँड्स असले तरी चित्रात चारच स्ट्रँड्स दिसत आहेत.) अशी आणखी छायाचित्रे पहायला आवडत असेल तर प्रतिक्रिया, पोस्टहापिस किंवा खरडवही द्वारा कळवा. मला उगीच अशा चित्राद्वारे आपल्याला बोअर करायचे नाहीं. पण दुरून पोलाद कारखाने गोंडस दिसतात म्हणून लिहिले आहे.
इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, लेडल फर्नेस, कंटीन्युअस कास्टिंग व हॉट रोलिंग असे विभाग आहेत.
सुधीर काळे
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 8:08 am | प्रभाकर पेठकर
इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, लेडल फर्नेस, कंटीन्युअस कास्टिंग व हॉट रोलिंग असे विभाग आहेत.
नावांनी अर्थ कळत असला तरी त्या-त्या विभागचे प्रत्यक्ष कार्य आणि महत्त्व ह्याचा थांग लागत नाही. छायाचित्रांसोबत माहिती (शक्यतो मराठीत) असेल तर ज्ञानात भर पडेल.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
7 Sep 2009 - 8:37 am | सुधीर काळे
इलेक्ट्रिक आर्क फर्नेस ३-फेस (phase) विजेवर चालते. ७०० वोल्ट व ५०,००० अँपियर या प्रचंड विद्युतशक्तीने या फर्नेस (भट्टी)मध्ये भंगार वितळवले जाते. 'लेडल' (Ladle) म्हणजे पोलाद ज्यात ओततात ती बादली (डाबू). आमची बादली ८० टनाची आहे. लेडल फर्नेसममध्ये पोलादरसाचे (liquid steel) शुद्धीकरण, योग्य तपमानापर्यंत तापविणे व योग्य रासायनिक पृथक्करण आणणे या प्रक्रिया केल्या जातात. Continuous Casting मशीनमध्ये पोलादरसाच्या बिलेट (कांब्या) बनतात (१२० मिमि *१२०मिमि*९ मीटर लांब). एका ८०टनी बादलीतून अशा ७५-८० कांब्या तयार होतात.
हॉट रोलिंगमध्ये १२० मिमि कांब्यांचे ९ मिमि ते ३६ मिमिच्या सळ्यांमध्ये रूपांतर होते.
आणखी माहिती हवी असल्यास मी आनंदाने देईन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 8:43 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म...! आता जास्त मजा येऊ लागली आहे.
धन्यवाद.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
7 Sep 2009 - 8:42 am | अनिरुध्द
असेच म्हणतो. 'शहाणे करूनी सोडावे मिपाजन' आणि तेही मायबोलीतूनं. तेवढीच ज्ञानात भर पडेल.
7 Sep 2009 - 8:45 am | सुधीर काळे
जरूर. विचाराल तसे लिहीन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 8:50 am | विसोबा खेचर
जबरा फोटू!
तापमान साधारण किती असतं हो?
अवश्य पाहायला आवडतील...
आपला,
(पोलादप्रेमी) तात्या.
7 Sep 2009 - 9:04 am | सुधीर काळे
साधारणपणे १६०० (सोळाशे) डिग्री सेंटिग्रेड
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 9:15 am | विसोबा खेचर
बाब्बौ!
तात्या.
7 Sep 2009 - 9:08 am | फारएन्ड
मस्त! टेल्को च्या फाउंड्रीमधे असे ओतताना आजूबाजूला सांडणार्या द्रवाच्या शेकडो फुलबाज्या उडाल्यासारखे दृष्य बघितले होते त्याची आठवण झाली.
7 Sep 2009 - 9:31 am | पाषाणभेद
मस्त आहेत छायाचित्रे. अजूनही येवू द्या. तुमचाच कारखाना असल्याने ज्या ठिकाणची छायाचित्रे ईतर सामान्य भेट देणारे काढू शकत नसतील किंवा ज्या विभागात जावू शकत नसतील तेथील छायाचित्रे दिलीत तर अजूनही मजा येईल. (अर्थात प्रायव्हसी व सुरक्षेचा विचार तुम्ही करू शकतात.) बाकी ईंडस्ट्रीयल छायाचित्रण हा पण एक प्रोफेशन आहे. मला त्यात आवड आहे पण मी ईतरांच्या कंपन्यांची छायाचित्रे कशी काढू? असो. तुर्तास वेब वरील ईतरांची छायाचित्रे बघून दुधाची तहान ताकावर भागवतो.
बाकी आपण आता छायाचित्रे धाग्यात चिकटवण्यात चांगलेच कौशल्य मिळवलेले दिसते. (काळेप्रणाली काही दिसत नाही पण! )
-----------------------------------
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
7 Sep 2009 - 9:43 am | प्रमोद देव
काळेसाहेब, कच्चे लोखंड किंवा भंगार ते निरनिराळ्या स्वरूपातले तयार पोलाद उत्पादन कसकसे होते,त्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात हे सगळे सविस्तर आणि छायाचित्रांसहित सोप्या मराठीत लिहा. एकाच लेखात हे सगळे जर जमणार नसेल तर ह्याची एखादी लेखमाला झाली तरी हरकत नाही.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Sep 2009 - 10:05 am | मदनबाण
अगदी असेच म्हणतो...
मदनबाण.....
लडाख सीमेवर चीनची घुसखोरी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=596...
सिमेपर्यंत टँक पोहचण्यासाठी रस्ते आहेत का आपल्या देशात? यावर सध्या विचार करतोय...
7 Sep 2009 - 9:44 am | झकासराव
काळे साहेबांचा कारखाना बघायला गेल पाहिजे. :)
आम्ही शाळेत असताना शाळेने एक दिवसाच्या सहलीत बरेच कारखाने (शिरोली एम आय डी सी मधील) दाखवले होते.
त्यात कोल्हापुर स्टील (कास्टिन्ग) पासुन रबरी चप्पल बनवणारा कारखाना देखील पाहिलाय.
पण त्यावेळी फारशी अक्कल नव्हती. (आताही नाहिये पण थोडीशी तांत्रीक माहिती आहे)
कुठे आहे हा कारखाना?
7 Sep 2009 - 9:52 am | प्रमोद देव
त्यासाठी तुम्हाला जकार्ताला जावे लागेल.
जाताय काय? ;)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Sep 2009 - 10:13 am | पाषाणभेद
तुमाला जकात नाका म्हनायच काय वो?
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
7 Sep 2009 - 10:21 am | प्रमोद देव
आता कळलं का रे दफो? :)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Sep 2009 - 10:35 am | पाषाणभेद
तुमाला इंडो नेसूया म्हनायच काय वो? आन ह्ये कोनत्या मिलचं धोतराच पान हाये? मोरारजी, स्वान ह्या कंपन्या तर बंद पडल्या नव्ह? का चिनी लोकं पन धोतरं बनवू र्हायलेत आताशा?
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
7 Sep 2009 - 12:14 pm | झकासराव
अर्रर्र!!!
जकार्ता फार लांब आहे. :(
नाही जाता येणार.
7 Sep 2009 - 2:09 pm | सुधीर काळे
दफोसाहेब,
अर्थ कळला नाहीं. धोतर-साडी कुठून आली बॉ?
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
9 Sep 2009 - 7:42 am | सुधीर काळे
आमचा कारखाना इंडोनेशियाची राजधानी "जकार्ता" येथे आहे. मुंबई-सिंगापूर पाच तासांची फ्लाईट व त्यानंतर सिंगापूर-जकार्ता १तास २० मिनिटाची फ्लाईट. जकार्ताच्या पूर्व भागात 'पुलोगाडुंग' या उपनगरात हा कारखाना आहे.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 10:18 am | अमोल केळकर
काळे साहेब,
नोकरी आहे का हो तुमच्याकडे?
एक्स्पोर्ट मार्केटिंगचा ३ वर्षाचा अनुभव आहे ( स्टील कंपनी)
कळवल्यास बायोडेटा पाठवून देतो.
धन्यवाद
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Sep 2009 - 10:47 am | निखिलराव
काळे साहेब,
नोकरी आहे का हो तुमच्याकडे?
Industrial Purchase चा ७ वर्षाचा अनुभव आहे .
कळवल्यास बायोडेटा पाठवून देतो.
धन्यवाद
निखिल
7 Sep 2009 - 12:50 pm | sneharani
अजूनही येवू द्या.
7 Sep 2009 - 2:27 pm | सन्दिप नारायन
छान फोटो आहे व खालील माहीती छान आहे. दुरून पोलाद कारखाने गोंडस दिसतात हे बरोबर आहे पण तेथे धुर व धुळ , हीट कीती याची
AC मध्ये काम करणार्याना काय कल्पना .
सन्दिप नारायन