जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
24 Aug 2009 - 12:57 am

राम राम मंडळी,

तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो...

परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक!

आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्‍या होणार्‍या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो. सकाळी अगदी सात्विक ब्राह्मणी मोदकांचं जेवण जेवून गणेशोत्सव साजरा केला, संध्याकाळी मोहम्मद अली रस्त्यावर झकासपैकी मटणकबाब, हलीम आणि मुस्सुलमानी मिठाया हाणून जिवाचा मोहम्मद अली रस्ता आणि रमजानही साजरा केला.. ! :)

त्याचीच ही काही प्रकाशचित्र!

१) रात्रीच्या टायमाला गजबजलेला महम्मद अली रस्ता...

२) खादाडी...

३) ही फिरनी, गुलाबजामून, आणि कालाजामून. चापले मस्तपैकी! :)


४) हे मालपुव्याचं पीठ.

आणि हा आमचा रहीम प्रतापगढी. मालपुवा तळत आहे. हा तळलेला मालपुवा नंतर पाकात टाकतात. आज काय साला मालपुवा झाला होता म्हणून सांगू! तोंडात अक्षरश: विरघ़ळत होता! हाणला मन लावून! :)

५) हा आमचा रफिक भाई कन्नौरी अत्तरवाला. त्याची आमची पुरानी जानपछान. अगदी रौशनीच्या टायमापासून! हलका पाऊस पडला होता त्यामुळे रमजानची मुबारक बात द्यायला आलेल्या तात्याला तो केवड्याच्या अत्तराचा फाया बनवून भेट म्हणून देत आहे! :)

६) हा आमचा मुसाफिरभाई पानवाला. पुरानी जानपछानीतला! तात्या समोर दिसताचक्षणी, आमचे गुरुजींच्या - भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर झकासपैकी बनारसी १२० पान जमवून देऊन चुन्याची दांडी पुढ्यात धरणारा!


इथे शब्द संपतात....!

७) पानाचा तोबरा भरतांना तात्या अभ्यंकर. जीवन त्यांना कळले हो! :)


मिठाई झाली, अत्तर झालं, पानही झालं! आता पुढचं विचारू नका, ते विचारणं बरं नव्हे! ;)

-- तात्या अभ्यंकर.

संस्कृतीपाकक्रियामौजमजाप्रकटनमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

टुकुल's picture

24 Aug 2009 - 1:16 am | टुकुल

झक्कास !!!...
लेख आणी चित्रे बघता बघता संपली..

अवांतरः तोंडात पान आणी बगलेत बटवा??

--टुकुल

मीनल's picture

24 Aug 2009 - 4:09 am | मीनल

हे सर्व खाद्य पदार्थ माउथ वॉटरिंग आहेत. नो डाऊट.
पण या टायमाला भारतातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो पहायचे आहेत.
मीनल.

प्राजु's picture

24 Aug 2009 - 5:50 am | प्राजु

मलाही दगडूशेठ हलवाई, लाल बाग चा राजा,श्री सिद्धीविनायक.. अशा आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो पहायचे आहेत. कोणी घेतले असतील तर इथे चि़कटवावेत.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

काळा डॉन's picture

24 Aug 2009 - 7:05 am | काळा डॉन

ओहोहोहोहो.... क्या बात है तात्या!! काय एकदम पाना खायो सैंया हमार... ;)

पुढचं विचारत नाही बाबा, मंगलमुर्ती मोरया!!!! :)

समंजस's picture

24 Aug 2009 - 10:38 am | समंजस

वा! सुंदर वर्णन तात्या!
या वेळेस मोहम्मद अली रस्त्यावर जाण्याचा विचार करतच होतो :)
आता हे सर्व वाचल्या वर केव्हा जातो हीच घाई झाली आहे. =P~

(खादाड..) समंजस

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2009 - 10:51 am | प्रभाकर पेठकर

संध्याकाळी मोहम्मद अली रस्त्यावर झकासपैकी मटणकबाब, हलीम आणि मुस्सुलमानी मिठाया हाणून जिवाचा मोहम्मद अली रस्ता आणि रमजानही साजरा केला..

फिरनी, मालपुवा, हलीम, मटन कबाब आणि ***** पान मजा करा लेको. जातोच आहे मी मस्कतला ईद मनवायला.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अवलिया's picture

24 Aug 2009 - 10:53 am | अवलिया

वा ! मस्त रे तात्या !

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

विशाल कुलकर्णी's picture

24 Aug 2009 - 11:17 am | विशाल कुलकर्णी

वा वा तात्या, मस्तच !

न्हाय, न्हाय फुडचं नाय इचारनार बाप्पा ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भोचक's picture

24 Aug 2009 - 12:35 pm | भोचक

वा. तात्या मजा केलात यार तुम्ही. आम्ही गणरायाच्या पहिल्या दिवशीच भीमराव पांचाळेंच्या मैफलीचा आनंद लुटत होतो. समोर भीमराव नि पुढ्यात दाद देणारे आम्ही. तिथेही मजा आला राव.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2009 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते

अमा, तात्याअलीखाँ साहब, मजा आ गया पढकेही. फोटू भी एक से एक.

بِپِن كارِیاكرتے

सूहास's picture

24 Aug 2009 - 3:13 pm | सूहास (not verified)

पुण्याच्या मोमीनपुराची आठवण झाली...

आज रात्री जाणारच..

सू हा स...

sneharani's picture

24 Aug 2009 - 4:09 pm | sneharani

Khup maja kelit ho kal.मालपुवा khayacha aahe. bolavnar ka?

विसोबा खेचर's picture

24 Aug 2009 - 4:18 pm | विसोबा खेचर

मालपुवा khayacha aahe. bolavnar ka?

कोण स्नेहाराणी ना? हो........, बोलवीन की! अगदी खुशीनं! :)

कधी जायचं बोल!

स्वगत : ही स्नेहाराणी कुणी स्त्री सभासद नक्कीच नसावी! :?

(ह घ्या)

आपला,
तात्याराजा! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2009 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, खाद्यपदार्थांचे फोटो भारी !

मिठाई झाली, अत्तर झालं, पानही झालं! आता पुढचं विचारू नका, ते विचारणं बरं नव्हे!

ठाण्यात लावणी-बिवणीची खास कार्यक्रम असतील, तेव्हा एकाद्या दोन लावण्या ऐकायला तर नसतील गेले तात्या...?

-दिलीप बिरुटे
(तात्यांचा पंखा )

नंदन's picture

24 Aug 2009 - 4:35 pm | नंदन

फोटू लै भारी. एकंदर माहौल चारमिनारजवळच्या बोळांची याद दिलवून गेला. आता पुढच्या खेपेला बडे मियाँनंतर मालपुवा, फिरनी खायला इथे वाट वाकडी करायला हवी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

24 Aug 2009 - 4:48 pm | चतुरंग

तात्याखाननी मज्जा केलेली आहे आणी इतके गोड पदार्थ एका रात्रीत हाणून मला जाम जळवलेलं आहे!
(मला नगरला शबाना शेखच्या घरी खाल्लेल्या शीरखुरम्याची आद आली.)

(शेख)चतुरंग

sneharani's picture

24 Aug 2009 - 5:10 pm | sneharani

काय तात्या maja karatay ho aamachi.tumchi mulagi na me?

विसोबा खेचर's picture

24 Aug 2009 - 5:29 pm | विसोबा खेचर

tumchi mulagi na me?

ऑ??

मी तुला कधी खाजगीत किंवा जाहीरपणे मुलगी वगैरे मानल्याचं मला आठवत नाही!

जाऊ द्या! हा विषय मी इथेच सम्पवतो..! :)

पुढील संवादाकरता व्य नि किंवा खरडीचा वापर करावा...

तात्या.

टारझन's picture

25 Aug 2009 - 12:24 am | टारझन

tumchi mulagi na me?

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
असो , बाकी खरडवहीत जाऊन हसेन म्हणतो

आयला तात्याला आम्ही गणपती समजत होतो .. तात्या तर हणूमाण !

डार्विन च्या सिद्धांता नुसार हनुमानाचेही असेच काहीसे पुरावे रामायणात पहायला मिळतात !
असो .. बाकी पुरावे खरडवहीत पाहिन म्हणतो

आपला
हल्ली खुप खुप प्रतिसाद उडालेला
टारझन
(पळा आता ... .तात्याचे फटके खायच्या आत)

प्रतिसाद पॉवर्ड बाय मोणॅको, इतका हलका .. की लगेच उडतो !

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Aug 2009 - 5:25 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाह उस्ताद!

संदीप चित्रे's picture

24 Aug 2009 - 11:50 pm | संदीप चित्रे

तुझा गणगोत अशक्य आहे !!!
फोटोंसाठी धन्स म्हणजे लाख लाख धन्स !

विकि's picture

25 Aug 2009 - 12:33 am | विकि

मजा आया मोहम्मद अली रस्ता कू देखके. तुने शिख-कबाब,उसके साथ पुदीना पत्ता उधरकी चाय , बिर्यानी नही दिखाया कायको रे !
आप सबका
टपोरी भाई विकि

विकास's picture

25 Aug 2009 - 5:02 am | विकास

फोटो एकदम आकर्षक (tempting)आहेत.

भरपेट खाऊन तोंडामधे तोबरे ज्यांनी भरले हो, खाणे त्यांना कळले हो! :-)

"जिवाचा मोहम्मद अली रस्ता..." हा "जसवंतच्या मोहम्मद अली जीना" पेक्षा नक्कीच छान आहे ;)

ऋषिकेश's picture

25 Aug 2009 - 10:36 am | ऋषिकेश

वा वा वा चविष्ट फोटो :)

ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "खईके पान बनारस वालाऽऽ...."