सूर्याजवळ जाण्याची हिम्मत !

कळस's picture
कळस in काथ्याकूट
20 Aug 2009 - 8:51 pm
गाभा: 

आज दुपारी १३:३० च्या सुमारास हिन्जवडीतून (पूण्यातूनही ) खालील विस्मयकारक चित्र दिसले.
यात सूर्याभोवती मोठी रिंग दिसली. आणी मोबाईलवरुन घेतलेल्या फोटोत सूर्याजवळ एक छोटासा गोळा दिसला. हे सर्व काय असावे याचा कोणी खुलासा करु शकेल काय ?

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

20 Aug 2009 - 8:59 pm | शैलेन्द्र

सुर्याला स्वाइन फ्लु?

टारझन's picture

20 Aug 2009 - 10:17 pm | टारझन

कुठलीतरी 'मोतीबिंदूची' केस दिसते आहे :)

-(बिंदु) टारझन

अनामिक's picture

21 Aug 2009 - 3:27 am | अनामिक

ठ्या...
=)) =)) =)) =))
टार्‍याचं डोकं लै भूंगाट पळून र्‍हायलंय ब्वॉ!!

-अनामिक

शैलेन्द्र's picture

21 Aug 2009 - 9:34 am | शैलेन्द्र

ह्म्म्म...

मला वाटल सुर्याने मास्क लावला का पुण्यावरुन जाताना...

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 9:36 am | विशाल कुलकर्णी

त्याचा शरद पवार झालता, माणकोजी खाऊन खाऊन गाठ आलीय झालं. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

नितिन थत्ते's picture

20 Aug 2009 - 9:14 pm | नितिन थत्ते

मोबाईल बदलून घ्या. ;)

असो भोवतीची रिंग ही चंद्राच्या खळ्याप्रमाणे वाटते. ढगांच्या विशविशीत थरातून तसे दिसू शकते. गोळा कसला हे कदाचित अवखळकर-पाटीलबै सांगू शकतील.

नितिन थत्ते

अमेरिकन त्रिशंकू's picture

20 Aug 2009 - 9:57 pm | अमेरिकन त्रिशंकू

नक्की यूएफओ असणार. ;-)

विरळ ढगांमुळे आणि वातावरणामुळे असे दिसते...

आदिती खूप छान सांगू शकेन याचे १००% कारण ... ह्या विषयांत तिचा हातखंडा आहे

- सागर

ज्ञानेश...'s picture

20 Aug 2009 - 10:08 pm | ज्ञानेश...

सांगा राव कुणीतरी... :O

"Great Power Comes With Great Responsibilities"

Dhananjay Borgaonkar's picture

20 Aug 2009 - 10:42 pm | Dhananjay Borgaonkar

खगोलशास्त्रज्ञ (विक्षीप्त) आदिती याच तुमच्या प्रश्णाच उत्तर देउ शकतील.

निमीत्त मात्र's picture

20 Aug 2009 - 11:11 pm | निमीत्त मात्र

तुम्हाला भास झालेला दिसतो. सूर्याची पार्श्वभूमी काळी दिसत आहे. रात्री सूर्य दिसत नाही मग ही पार्श्वभूमी काळी कशी काय?

रवि's picture

21 Aug 2009 - 2:08 am | रवि

या प्रकराला sun halo असे म्हणतात. वातावरनातिल (ढगांमधील) बर्फाच्या स्फटिकांमुळे हे घडते.
moon halo हा असाच पन जास्त ओळखिचा प्रकार आहे. जो सुर्यप्रकाशाऐवजी चन्द्रप्रकाशामुळे बनतो. moon halo बर्‍याचवेळा पहण्यात येतो.
तो जो प्रखर दुसरा गोळा आहे तो भिंगासमोर कुठलाही प्रखर स्त्रोत असला की दिसतो. बर्‍याचवेळा फोटोंमधे असे दिसुन येतो. तो एकप्रकारचा भिंगदोष (lens-defect) आहे. त्याला ghost image असे म्हणतात.
सुर्य व चंद्र दोन्हींमुळे घडनारा असाच आनखी एक प्रकार म्हनजे इंद्रधनुष्य जे सुर्यमुळे दिसते. तर moon bow/moon rainbow चंद्रप्ऱकाशामुळे तयार होते.

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2009 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही असंच वाटत आहे. ghost image असण्याचीच शक्यता जास्त वाटत आहे.

सूर्याच्या मागे रात्र का दिसत आहे असा वर प्रश्न विचारला आहे. त्याचं स्पष्टीकरणः सूर्याच्या मागे रात्र नाही आहे, पण सूर्याच्या प्रकाशाच्या तुलनेत पार्श्वभूमीकडून येणारा प्रकाश फारच कमी आहे त्यामुळे असं दिसत आहे. आत्ता सुनील यांच्या खवमधे जो फोटो लावला आहे त्यात समुद्रकिनारा, माणसं खूपच काळपट दिसत आहेत त्याचंही हेच कारण आहे.

लोकांचा माझ्याविषयी फारच गैरसमज झालेला दिसत आहे, मी खगोलशास्त्रात सर्वज्ञ आहे इ.इ. माझं मत, मी सर्वाज्ञ (सर्व+अज्ञ) आहे.

अदिती

विकास's picture

21 Aug 2009 - 6:37 pm | विकास

चला आता काळजी नको ;) अदितींचे यावर भाष्य वाचून काळजी दूर झाली. नाहीतर वाटले की सुर्यावर पण ग्लोबल वॉर्मिंग झाले की काय.

>>मी सर्वाज्ञ (सर्व+अज्ञ) आहे.<<

हे स्वतःबद्दल म्हणणे (असे वाटणे) कदाचीत नावातील "विक्षिप्त" या भागाशी संबंधीत असावे. :)

विजुभाऊ's picture

21 Aug 2009 - 9:37 am | विजुभाऊ

मोबाईलच्या भिंगाच्या( लेन्स) काचेमुळे ती छोटी गोष्ट दिसत आहे.
हबल टेलीस्कोप मध्ये सुद्धा असा एक दोश राहून गेला होता. तो नन्तर अ‍ॅडीशनल भिंग लावून दुरुस्त केला होता.
सूर्याच्या जवळ च्या गोष्टी पहायच्या असतील तर वेल्डिंग करतानाचा चष्मा /काच वापरून ते दृष्य एन्लार्ज केले तर सूर्याच्या पृष्ठभागातून निघणार्‍या ज्वाळाही दिसु शकतात
प्रश्नः उजाड विहीरीच्या तळाला जेथे सूर्य प्रकाश पोहोचु शकत नाही तेथून पाहिल्यास दिवसाही तारे दिसु शकतील का? असल्यास हे कसे शक्य होते? नसल्यास का नाही?

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

शैलेन्द्र's picture

21 Aug 2009 - 10:17 am | शैलेन्द्र

तिथुन वर यायची सोय नसेल तर नक्कि दिसु शकतिल.

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2009 - 12:18 pm | कानडाऊ योगेशु

जेथे सूर्यप्रकाशही पोहोचु शकणार नाही तिथे तार्यांचा मिणमिणणारा प्रकाश कसा पोहोचेल?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Aug 2009 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इजाभौ, तुमच्या विहीरीच्या शेजारी उभं राहून सूर्य अस्ताला गेल्या गेल्या पुढच्या सेकंदाला जे तारे दिसत असतील, ते तारे विहीरीच्या तळातून दिसतील.

बादवे, विहीर कोरडी आहे का? विहीरीत उडी मारणार का पायर्‍या वापरणार?

अदिती

झकासराव's picture

21 Aug 2009 - 2:11 pm | झकासराव

आजच्या लोकसत्ताच्या पुणे वृतांत मध्ये असलाच फोटु आणि त्याची बातमी आली आहे. ते खळं असल्याचा उल्लेख आहे. ती बातमी लोकसत्ताच्या नवीन सायटीवर जाउन शोधण्याचा प्रयत्न केला.
नाही सापडली.