अनुवाद

लक्ष्मणसुत's picture
लक्ष्मणसुत in जे न देखे रवी...
23 Jul 2009 - 8:40 pm

आपण सर्वजण नेहमीच 'Photo' या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद करताना 'छायाचित्र' असा शब्दप्रयोग करतो. परंतु 'Photo' घेण्यासाठी (काढण्यासाठी) प्रकाशाचा वापर होतो. म्हणजे प्रकाशच नसेल तर 'Foto' काढताच येणार नाही. मग 'Photo'चा मराठी अनुवाद करताना 'प्रकाशचित्र' असाच व्हायला पाहिजे, असे माझे मत आहे. यावर जरूर विचार व्हावा.

शुद्धलेखनछायाचित्रण

प्रतिक्रिया

mahalkshmi's picture

25 Jul 2009 - 12:11 am | mahalkshmi

खरे आहे .प्रकाशचित्र हा शब्द बरोबर आहे तुमचा.
तरीपण मला असे वाटते की मुळ ज्या भाशेतुन तो शब्द आलेला आहे ,त्याच भाशेत तसाच्या तसाच वापरला तर काय हरकत आहे?आपण टेबल,कप्,शर्ट्,फ्रीज्,टीव्ही,आणी असे हजारो शब्द इन्ग्लीश भाशेतील वापरतो.मग फोटो असेच म्हट्ले तर बिघड्ते काय?