वाटेवर मी तुझ्या लावले
दोन फटके गालावरले
ह्रदयातून मग लक्ष लागले
फटके खाऊनी गाल सुजले?
जोरात ठेवला हात तिथे मी
तुझ्या चुकीला शिक्षा किती ?
धोत्र्याची फूले द्यावी तू मला?
हाणायला मग कसली भिती?
लुब्रा मेला टोमणे मारतो
समजतो मला खुळी
शीळ घालीत प्रीत मागतो
विसरतो की मी न भोळी ?
मोका मिळता मग उचलली
पादत्राणे दोन हलकी
गंध देउनी क्रोधभराने
वाजवूनच ठेवीली खाली
तू मेल्या तरीही तसाच
हलकट आणि बाईल वेडा
छळीसी कितीकां तसाच
वाटे हाणाव्या दोन फडाफडा.
मैत्रीणी टपल्या असती किती
त्रस्त होऊनी तुला मारण्या
रे बावळ्या वेश कावळ्या
पैजार शस्त्रे घेऊनी हाती
प्रतिक्रिया
21 Jul 2009 - 6:06 pm | विनायक प्रभू
कोन म्हनायचा वो नायक ह्या कवितेचा?
21 Jul 2009 - 6:13 pm | नितिन थत्ते
नायक विजुभाऊ असतील काय? :?
(विजुभाऊ ह. घ्या)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
21 Jul 2009 - 6:21 pm | अवलिया
असतील म्हणजे काय ? तेच आहेत.
(विजुभाउ अजिबात हलके घेवु नका आणि येवु द्या जोरदार काहीतरी ;) )
--अवलिया
21 Jul 2009 - 7:48 pm | पुष्कराज
साधारण विडंबन कवितेच्या जवळ जाणार असाव नई ?
21 Jul 2009 - 7:54 pm | llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणतो.
विडंबन नाही आवडले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Jul 2009 - 3:02 pm | विश्वेश
वाटेवर मी तिच्या ठेवली
न भरलेली दोन बिले
ह्रदयातून मग लक्ष लागले
पाकिट किती हलके झाले ?
आनंदाने तिने उचलली
रस्त्यावरची दोन बिले
पेड़ शिक्का न दिसता
मला शोधण्या नजर फिरे