मुंबई-मँगलोर विमान प्रवास

चंबा मुतनाळ's picture
चंबा मुतनाळ in काथ्याकूट
10 Jul 2009 - 10:18 am
गाभा: 

आत्ताच cnn-ibn वर बातमी वाचली की एयर इंडियाच्या मुंबई-मँगलोर फ्लाईटमधून ३ जादा प्रवाशांनी प्रवास केला. एका बाईला कॉकपिट्मधे मागल्या सीट वर, तर दोन प्रवाशाना कर्मचार्यांच्या जंपसीटवर सोय केली.

हे कसे साध्य करण्यात आले हे अजून कळलेले नाही परंतु ह्या प्रकरणात बरेच सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले ह्याबद्दल शंकाच नाही.

जर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते, तर प्रवाशाना नुकसान भरपाई मिळाली असती का? एका आंतरराष्टीय विमान कंपनी कडून हे अपेक्षीत नाही.

उद्या श्ट्यांडींग प्याशींजर पण घ्यायला लागतील हे लोक!

-चंबा

बातमीचा दुवा">

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 10:27 am | नितिन थत्ते

दरवाजात उभे राहून किंवा टपावर बसून प्रवास करता येईल तो सुदिन...लवकरच येवो.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jul 2009 - 12:32 pm | ब्रिटिश टिंग्या

रायन एअर लवकरच ष्टँडिंग सुरु करतायेत.....

छोटा डॉन's picture

10 Jul 2009 - 12:50 pm | छोटा डॉन

काय हो लॉर्डसाहेब, चक्क "फुक्कट प्रवास" अशी सुविधा देणारी कोणती एअरलाईन्स आहे का ?
उगाच आपली चौकशी हो , माहित असावे म्हणुन ...

------
( उत्सुक ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jul 2009 - 1:33 pm | ब्रिटिश टिंग्या

एवढा उतावीळपणा बरा नाही!
फुकटात प्रवास करायचा असेल तर विमानाऐवजी चपला घाला अन् चालु पडा!

- टिंग्या मल्ल्या

सुनील's picture

10 Jul 2009 - 10:50 am | सुनील

ह्या प्रवाश्यांच्या बोर्डिंग पासावर काय सीट नुंबर लिहिले होते? काही कल्पना आहे?

सगळ्याच कंपन्या इकॉनॉमी वर्गातील प्रवाशांचे ओवर बूकींग करतात, हे खरे. पण त्यांची सोय वरच्या वर्गात लाऊन दिली जाते. इथे, मला वाटते, वरचा वर्गदेखिल भरलेला असावा.

बाकी, स्ध्याच्या परिस्थितीत, विमान कंपन्यांना (अर्ध्या दरात) स्टॅन्डिन्ग प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळावी, असे वाटते. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

10 Jul 2009 - 11:06 am | मदनबाण

अरे इ का ?..हमको लगा आपने अपने मुंबई-तोक्यो इस सफर पर लिखा होगा... इ ठिक नाही...चंबाभय्या आपने हमुको निरास कर दिया.

(मदन बिहारी)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

विंजिनेर's picture

10 Jul 2009 - 11:06 am | विंजिनेर

सारख्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या त्या तिकिटबुकींग क्लार्कला स्वतःच्या थकलेल्या पगाराची चिंता यक्स्ट्रा प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा जास्त असणार....

बाकी क्लर्कचे जाउद्या हो पण कंडक्टर सुद्धा झोपा काढत होता की काय नकळे? निदान त्यानी तरी इकडे लक्ष द्यायचे..

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

यशोधरा's picture

10 Jul 2009 - 11:54 am | यशोधरा

>>एका बाईला कॉकपिट्मधे मागल्या सीट वर, तर दोन प्रवाशाना कर्मचार्यांच्या जंपसीटवर सोय केली.

:O :T

छोटा डॉन's picture

10 Jul 2009 - 12:06 pm | छोटा डॉन

हा हा हा, बातमी वाचुन मज्जा वाटली.
बहुतेक ती आमची फेव्हरिट एअरलाईन्स असेल ( आम्ही नाव नाय सांगणार ज्जा ) , त्यांनी आम्हाला बहुतेकवेळा प्रवासादरम्यान शीट सोडुन इकडे तिकडे फिरताना पाहिले असेल व मग अशा स्थितीत "बसायला जागा आवश्यकच असते असे काही नाही" हे त्यांनी ठरवले असेल, त्यात काय आश्चर्य ?
आयला १-१.३० तासाचा प्रवास, त्यात कशाला बसायला जागा हवी ?
एवढे महागडे तिकिट काढायचे ते एका जागी ढिम्म बसायला का ?
छे, आपल्या तत्वात नाही बसत हे ...

>>प्रवाशांची सुरक्षितता
=)) =))
हे काय आणि नवे खुळ काढलेत ? ते काय असते ?
आयला हुच्चभ्रु लोकं असली काहितरी टुम काढतात व त्याचा त्रास आमच्यासारख्या सर्वसामान्य जन्तेला भोगावा लागतो, साफ निषेध ह्याचा ...

असो, बातमी अंमळ गंमतशीर आहे ...

------
( चौथ्या शीटवरचा ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

दिपाली पाटिल's picture

10 Jul 2009 - 12:09 pm | दिपाली पाटिल

बापरे,आधी च एअर इंडिया च्या बोंबा आहेत आणि हे काय भलतंच्.. :O

दिपाली :)

अवलिया's picture

10 Jul 2009 - 12:12 pm | अवलिया

नशीब पायलटला उभे राहुन विमान चालवा असे म्हणत नाहीत अजुन...

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

पाषाणभेद's picture

10 Jul 2009 - 12:22 pm | पाषाणभेद


आमच्या कंपनी ने एक नवीन प्रॉडक्ट लाँन्च केले आहे. त्यात उभे राहून प्रवासात झोप पण घेता येते. नुकतेच आम्ही ते एरंडिया या विमान कंपनीला सप्ल्याय केले आहेत.
यात जागा कमी लागते. पवाश्याला पैसे कमी पडतात. कंपनीचा फायदा होतो.

आता ते "शिष्ट" या "तुंबई" (तुंबलेली) या शहरातील वाहतूक करणार्‍या कंपनीलापण देणार आहोत.

गरजूंनी याबाबत अधीक माहीती हवी असल्यास संपर्क करावा.
आमची शाखा कुठेही नाही.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

चिरोटा's picture

10 Jul 2009 - 12:54 pm | चिरोटा

ह्या प्रवाश्यांच्या बोर्डिंग पासावर काय सीट नंबर लिहिले होते? काही कल्पना आहे?

बातमीनुसार बोर्डिंग पास ,त्यावरचा सीट नंबर ह्या सगळ्याचे संगणकीकरण करणे आवश्यक असते.सगळ्या सीट भरल्या की बोर्डिंग पास छापला जात नाही. एयर इंडियाने संगणकीकरण केले आहेच्.पण जास्त माणसे कोंबण्यासाठी तात्पुरता संगणक बंद ठेवला होता.ह्या गैरप्रकाराला सगळ्यानीच- कर्मचारी,पायलट ह्यांनी संमत्ती दर्शवली असणार.
सरकारीच कंपनी आहे- तेव्हा सगळेजणच सांभाळून घेतील एकमेकांना.
DGCA चा प्रतिसाद ठोस कारवाई करु असा नाही आहे."Action can be taken/this is illegal' अश्या प्रकारच्या विधानांवरुन प्रकरण झाकले जाईल असेच दिसतय.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

चंबा मुतनाळ's picture

10 Jul 2009 - 1:08 pm | चंबा मुतनाळ

बातमीत आहे की संगणकाने पास देणे बंद केल्यावर अतिरिक्त बोर्डींग पासेस हाती लिहून दिले!!

-चंबा

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 4:40 pm | चतुरंग

हे लोक कोण होते? त्यांना अशा प्रकारचा प्रवास का करु दिला?
कॉकपिटमध्ये घेतलेला पॅसेंजर तर सर्वात धोकादायक ठरु शकतो.
९/११ आणि २६/११ सारख्या घटनांनंतरही इतका भोंगळपणा सरकारी विमानकंपनी दाखवीत असेल तर देवसुद्धा आपले रक्षण करु शकणार नाही! :(
आणि इतर प्रवाशांनी तरी ह्याला जोरदार आक्षेप घेतला की नाही? बहुदा नसावाच! आपल्याला सीट मिळाली ना मग झाले!!

(स्वार्थी)चतुरंग

महेश हतोळकर's picture

10 Jul 2009 - 4:58 pm | महेश हतोळकर

अपहरण करणारे अतीरेकी वेगवेगळ्या क्लृप्त्य लढवतात कॉकपीट मध्ये शिरण्यासाठी. आणि इथे फ्री एंट्री!

---------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
---------------------------------------------------

विनायक प्रभू's picture

10 Jul 2009 - 5:02 pm | विनायक प्रभू

रेल्वेत भय्या लोक 'कामायनी' एक्स्प्रेस मधे संडासात प्रवास करतात ती पण स्थिती येईल.

मस्त कलंदर's picture

10 Jul 2009 - 5:09 pm | मस्त कलंदर

नाहीतरी प्रसार माध्यमांना बातम्यांना अतिरंजित करण्याची सवय आहेच...

या बातमीतली खरी गोष्ट अशी.. की प्रत्येक विमानात किमान दहा क्रू मेंबर्स साठी बसण्याची व्यवस्था असते. नि सहसा विमानात ५-६ च क्रू मेंबर असतात.. इमर्जन्सीच्या वेळेस विमानातल्या सीट्स संपल्यातरी या जागा कॅप्टनला विनंती केल्यावरून मिळू शकतात.. नि हे नियमानुसार होते.. यात आपल्याला अर्धी बातमी दिल्याने आपण असा काथ्याकूट करतो...

सध्या पऊस रिमझिम पडत असेल.. तरी खूप पाणी साचल्याचे फोटो नि विडिओ दाखवतात.. नि रोज घरचे काळजीने फोन करतात... अशी कितीतरी उदाहरणे रोजचीच आहेत..
एकदा एका महाविद्यालयात टी शर्ट घालून आलेल्या मुलांना प्रवेश दिला नव्हता नि यावर मुंबई मिररने अगदी चांगला टी-शर्ट घातलेल्या मुलांच्या फोटोसोबत ही बातमी प्रसिद्ध केली होती नि सगळ्यानी आरडाओरडा केला होता... खरी गोष्ट तेव्हाही वेगळीच होती...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

महेश हतोळकर's picture

10 Jul 2009 - 5:15 pm | महेश हतोळकर

आहो पण कॉकपीट मधल्या प्रवाशाचे काय? ही बाब गंभीर नाही का?

-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

मस्त कलंदर's picture

10 Jul 2009 - 9:18 pm | मस्त कलंदर

आहो पण कॉकपीट मधल्या प्रवाशाचे काय? ही बाब गंभीर नाही का?

ही बाब खरेच गंभीर आहे.. मी माझा आधीचा प्रतिसाद एअर इंडिया मध्ये नोकरीला असलेल्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीच्या आधारे दिला होता.. त्यात जरी तथ्य असले, तरी नुकत्याच टीव्ही वर ५ लोकांना निलंबित केल्याची बातमी आहे.. म्हणजे प्रकरण गंभीर आहेच..
मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की प्रसारमाध्यमे दाखवतात ते सारं खरं नि गंभीर नसतं!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

10 Jul 2009 - 8:45 pm | रेवती

उद्या श्ट्यांडींग प्याशींजर पण घ्यायला लागतील हे लोक!

विमान कंपनीवाले घेतील हो स्टँडींग पॅसेंजर्स पण ते बसलेल्या लोकांना म्हणतीलच,"जरा सरकून घ्या थोडं, पोराला/म्हातार्‍यांना बसायला जागा द्या.";)

रेवती

प्राजु's picture

10 Jul 2009 - 9:25 pm | प्राजु

बापरे!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागा पकडावी लागेल..एकच प्रॉब्लेम आहे त्या खिडक्या खूप उंच असतात आणि बंद असतात..

दगडाचा दुहेरी वापर करता येऊ शकेल.

-(शिर्डी, कार्ला कोल्हापूर च्या यष्ट्यांमधे जागा पकडण्यात प्रवीण) एक

स्वाती२'s picture

10 Jul 2009 - 10:49 pm | स्वाती२

एअर इंडियाने नियम धाब्यावर बसवले हे खरे पण त्याना तसे करायला प्रवाशांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ दिली त्याचे काय?