लाल भोपळ्याची बाखर भाजी

रेवती's picture
रेवती in पाककृती
23 Jun 2009 - 7:22 am

साहित्य: लाल भोपळा अर्धा किलो, मूठभर तूरडाळ भिजवलेली, अर्धा छोटा चमचा मेथीदाणे,
किसलेले सुके खोबरे भाजून कुस्करून अर्धा ते पाऊण टे.स्पू.,कच्च्या चारोळ्यांची भरड पूड अर्धा टे. स्पू.,
खसखस भाजून कुटलेली अर्धा टे. स्पू., लाल तिखट, मीठ व गूळ चवीनुसार, फोडणीसाठी तेल,
पाव वाटी गरम पाणी, फोडणीचे सामान, थोडी कोथिंबीर चिरून.

कृती: साले काढून लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी कराव्यात.
कढई गरम झाल्यावर त्यात छोटा डाव तेल घालावे.
मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करावी. त्यातच मेथीदाणे घलावेत.
ते तांबूस झाल्यावर आता भिजलेली तूरडाळ घालून बोटचेपी शिजवावी.
यानंतर भोपळ्याच्या फोडी घालून ढवळावे. एक वाफ आल्यावर पाववाटी गरम पाणी घालावे
व कुस्करलेले खोबरे, चारोळ्यांची पूड, खसखशीची पूड, तिखट, मीठ, गूळ घालावे.
आता भाजी अलगदपणे हलवावी.
अजून एक वाफ द्यावी. नंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे.

शिजल्यानंतर भोपळ्याच्या फोडी लगेच कुस्करतात म्हणून जपून हलवाव्यात.
गरम पाणी अगदी पाव वाटी किंवा कमी लागते.
ही पाककृती माझ्या ती. आजेसासूबाईंकडून समजली.
त्यांनी हावभावांसह, तल्लीन होऊन भाजीची कृती सांगितली होती. :)
त्यानंतर मला माझ्याकडील पुस्तकातही सापडली.


रेवती

प्रतिक्रिया

सहज's picture

23 Jun 2009 - 7:31 am | सहज

मस्तच दिसतेय. करुन बघणार.

तूरडाळ, भोपळा शिजायचा अंदाज नीट नसल्याने भोपळा, तुरडाळ जरासे प्रेशरकुकर मधुन आधी शिजवुन घेतले तर बरे पडेल का?

धन्यु.

रेवती's picture

23 Jun 2009 - 7:58 am | रेवती

भिजवलेली असल्याने तूरडाळ एका वाफेत बोटचेपी होते. नंतर भोपळ्याबरोबर शिजते. भोपळा दोन ते तीन वाफांमध्ये शिजायला हरकत नाही. प्रेशर कूकर अज्जिबात नको, त्याने सगळा लगदा तयार होइल. लाल भोपळ्याऐवजी बटरनट स्क्वॉश वापरला तरी चालेल.

रेवती

क्रान्ति's picture

23 Jun 2009 - 8:10 am | क्रान्ति

पाकृ. फोटोवरून बटाट्याच्या भाजीसारखी दिस्तेय. खूप छान.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

चकली's picture

23 Jun 2009 - 8:19 am | चकली

खरं तर भोपळा फारसा आवडत नाही पण फोटो बघुन करावीशी वाट्टेय :) नक्की करून पाहीन हि भाजी

चकली
http://chakali.blogspot.com

घाटावरचे भट's picture

23 Jun 2009 - 11:18 am | घाटावरचे भट

वा! आमच्या आईसाहेबही अशीच भाजी करतात. त्याची आठवण होऊन जीव कासावीस झाला...

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2009 - 11:20 am | स्वाती दिनेश

मस्त भाजी आणि फोटू तर... अहाहा... :)
स्वाती

शाल्मली's picture

23 Jun 2009 - 2:47 pm | शाल्मली

लाल भोपळ्याची म्हणजे माझी अगदी आवडती भाजी!
पण अश्या प्रकारची तूरडाळ घालून कधी खाल्ली नाही.
फोटो मस्त. :)

--शाल्मली.

जागु's picture

23 Jun 2009 - 3:17 pm | जागु

वा फोटो आणि रेसिपी दोन्ही छान.

प्राजु's picture

24 Jun 2009 - 6:56 am | प्राजु

दोन्ही छान आहे.
मी डाळ आणि चारोळ्या, खसखस नाही घालून केली कधी . आता नक्की करेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

24 Jun 2009 - 12:31 am | धनंजय

ही पाकृ कमलाबाई ओगलेंच्या पाकृपेक्षा सोपी वाटते, आणि दिसायला एकदम मस्त. चवीला छान असणारच.

करून बघतो.

चित्रा's picture

24 Jun 2009 - 12:35 am | चित्रा

चारोळ्या, खसखस वगळता अशीच मी ही भाजी करते. चारोळ्या आणि खसखशीने छान चव येईल.

विसोबा खेचर's picture

24 Jun 2009 - 6:52 am | विसोबा खेचर

रेवतीवैनी,

ह्या टायमाला आम्हाला माफ करा. पाकृला दाद देऊ शकत नाही कारण आम्हाला भोपळाच आवडत नाही! :(

आपला,
(टुणूक टुणूक) तात्या.

नूतन सावंत's picture

1 May 2015 - 10:16 am | नूतन सावंत

भोपळयाच फोडी सालासकट केल्यास मोडत नाहीत.