"आमचे ध्यान"

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
17 Jun 2009 - 1:16 pm

दिवाळीचे दिवस होते. हा लवकर म्हणजे ११ वाज़ता अन्घोळ करुन देवळात जातो म्हणुन नविन कपडे घालुन बाहेर पड्ला होता. आद्ल्या दिवशीच जाउन सगळी खरेदी करुन झाली होती. मी अन्घोळ करुन बाहेर आले, डस्टबिनमधे कहितरी टाकायला गेले तर एक किमतीचे लेबल दिसले, मी ते उचलुन पहिले त्यावर रु. ७५०/- लिहिले होते. मी खुप विचार केला कि खादीभान्डार मधुन ७५०/- चे तर काल काही घेतले नाही. मग ह्याचे कपाट उघडून पाहिले. तर आजच्याच तारखेचे बिल असलेली खादीभान्डारची पिशवी दिसली, आत एक सुन्द्रर झब्बा होता. काय ते लक्शात आले. हा घरी आला, मी काही न बोलता झब्बा समोर टाकला. चेहरा पाहाण्य़ासारखा झाला होता. मी म्हणाले काल काय ते घेवुन झाले होते ना, मग आज परत का? म्हणाला उद्या सान्गणाऱच होतो. 8|

एक दिवशी गॅसवर चहा करायला ठेवलान आणी चक्क कुलुप लावुन निघुन गेला. घरात चहा उकळुन कोळसा झाला. घरातुन धुर बाहेर येउ लागला. शेजारचे घरात आग लागली असे समजुन कुलुप तोडायला निघाले होते, तेव्ढ्यात हे पात्र कुठुन ते आल न घर उघड्लेन. मी येइपर्यन्त पातेली लपवुन झाली होती. मी घरी आले तोवर शेजारची खालीच भेट्ली, आणी घडलेला व्रुतान्त तिने मला सान्गितलान. घरात शिरताच वेगळाच दर्प मला जाणवला पण धुप, उदब्त्या लावुन तो लपवायचा प्रयन्त केला गेला होता. मी जोरातच पातेले कुठे आहे विचारले मग गुपचुप माळ्यावर टाकलेले पातेले खाली आले. दुध तर अनेकदा ओतु जाते. ऒटा ऒला असला कि समजावे आज दुध ओतु गेलय न गॅसला अन्घोळ घालुन झालीये. ~X(

एकदा ह्याला मी नको असलेल्या फ़ाइल्स डिलीट केल्या की कम्पुटर फ़ास्ट होतो असे सान्गीतले. घरी आले, हा शान्त टीवी पहात बसला होता. मी विचार केला चला आपण जरावेळ सर्फ़िन्ग करुयात. पण कम्पुटर चालुच होइना. ह्याला विचारले काय झाले असेल तर ह्या दुर्लक्श करु लागला. मला लक्शात आले कि हे ह्याचेच उद्योग आहेत, मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय. मग म्हणाला तु म्हणाली होतिस तसेच होत्या नव्ह्त्या त्या सगळ्या फ़ाइल्स डिलीट केल्या. ह्म्म म्हणजे सिस्टम फ़ाइल्स पण डिलीट झाल्या होत्या तर. :T

नशीब म्हणजे किति असावे ह्याचे ओफ़्फ़िस वानखेडे स्टेडीयममधे नॉर्थ स्टॅण्ड खाली होते. हा दुपारी जेवायला येइ. हा मस्त जेवुन अर्धा तास झोप काढुन ओफ़्फ़िसला जात असे. आणी ६ ला ओफ़्फ़िस सुट्ले कि ६.१० ला घरात असे. मी एकदा बोलले एवढा वेळ असतो, जरा कामे करत जा. ह्याने दुसर्याच दिवशी होते नव्ते ते सगळे कपडे मशीनला लावले. रन्ग जाणारे पण त्यातच अस्ल्याने धुवुन निघालेले कपडे परत अन्गाला लावता आले नाहित. एकदा देवान्ची पुजा करायला लावली. पुजा झाल्यावर देव वाटेल तसे ठेवले होते, एक्मेकान्च्या अन्गावर काय न काय, बाळ्क्रुश्ण तर निर्माल्यामधे मिळाला. :<

कोणी आले की ह्याला उत येतो, लगेच म्हणतो, जरा चहा कर, कॉफी कर. मित्र म्हणजे ड्झनावारी येतात. कप बशानी सिन्क भरुन जाते. रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही. ऎवढे असुनही मी काही बोलले कि म्हणतो, जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला................... :D

जीवनमान

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

17 Jun 2009 - 1:19 pm | विनायक प्रभू

अरेरे.
ध्यानाचे काही खरे नाही.
एक चुचु अख्ख्या मिपाचे दही करते.
ध्यानाच्या नशिबात चुचु,आई,व बहीण.
अरेरे

घाटावरचे भट's picture

17 Jun 2009 - 6:22 pm | घाटावरचे भट

गुर्जी... स्ट्रेट डाऊन द ग्राऊंड!!

बाकी लेख आवडला. पुलंनी म्हटलंच आहे "कुठल्याही 'पतिप्रमादप्रसिद्धीपरायण' स्त्री प्रमाणे...." वगैरे वगैरे... ;)

अनंता's picture

17 Jun 2009 - 1:25 pm | अनंता

हा जो कुणी आहे त्याची मला दया येते.
सारखी डाफरणारी माणसं मला आवडत नाहीत.
माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोचवा.

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

=)) भारीच लिही लस्स्स्स्स्स्स्स,,, प्रसाद ला पण दे वाचायला म्हणजे तो परत एकदा म्हणेल,,, "जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीन" =))

नेहा

पर्नल नेने मराठे's picture

17 Jun 2009 - 1:34 pm | पर्नल नेने मराठे

प्रसन्न ग ~X(
चुचु

भारीच लिही लस्स्स्स्स्स्स्स,,, प्रसन्न ला पण दे वाचायला म्हणजे तो परत एकदा म्हणेल,,, "जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीन" =))

नेहा

माधुरी दिक्षित's picture

17 Jun 2009 - 1:38 pm | माधुरी दिक्षित

ह्म्म......
अवघड आहे ग चुचु =))

जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला...................

खरे तेच बोलला ना? ;-)

भोंडल्याला एक गाणे म्हणतात ते बहुतेक तुम्हाला खूप आवडत / पटत असावे.

अवांतर - पहिल्या लेखाच्या मानाने ठिक्ठाकच असो अजुन येउ दे.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jun 2009 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

वाह ! लेख वाचुन प्रसन्न वाटले.

तुमच्या ध्यानाची तुमच्या विषयीची मते वाचायला अजुन मौज वाटेल. उद्या येताना लिहुन घेउन या.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सायली पानसे's picture

17 Jun 2009 - 2:52 pm | सायली पानसे

:-) :-) :-))

चिरोटा's picture

17 Jun 2009 - 3:25 pm | चिरोटा

लेख की 'ध्यान'? :)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

निखिल देशपांडे's picture

17 Jun 2009 - 3:01 pm | निखिल देशपांडे

चुचु अगं असतात काही काही लोक विसरभोळे त्यात येवढे काय झाले गं....

आता बिचार्‍या मराठे काकांना वाटले असेल घ्यावा एक अजुन खादिचा झब्बा. घेतला त्यांनी.... त्यात त्यांच काय चुकल गं... तुला घाबरुन सांगितले नसेल त्यांनी. कदाचित त्यांचा आवडिचे कपडे तु घेवु दिले नसतिल म्हणुन परत घेतला असेल झब्बा.

आता चहा ओतु जाणे ही खुप कॉमन गोष्ट आहे. बराच जणांचा जातो ओतु..... माझ्या घरी पण असे झाले आहे बर्‍याच वेळा नाही लक्षात रहात कधी कधी. त्यात परत तुला किती घाबरतात काका ते बघितलस का??? सगळे भांडे लपवुन ठेवले होते त्यांनी. त्यात उदबत्त्या लावुन वास घालवायचा प्रयत्न केला. कदाचित तुला आल्यवर त्रास होवु नये म्हणुन केला असेल.

आता तुच सांगितलेस त्याला कर फाईल डिलीट केल्या त्याने... होते कोणा कोणा कडुन... कालच माझ्या एका सहकर्मचार्‍याने सर्वर ची प्रोफाईल फाईल काढुन टाकली आणि मग रडत बसला सर्वर चालु होते नाही म्हणुन..
कपडे रंगित आणी पांढरे वेगळे काढणे हा गोंधळ बर्‍याच जणांचा होतो. नविन कपडा आणल्या नंतर तर त्याचा रंग जाणार का नाही हे कळतच नाही

रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही, जाउ दे माझ्या मित्रा चा किस्सा ऐक एकदा तो बाजारात गेला... काहि तरी सामान घेतले... अचानक मी भेटलो त्याला तर माझ्या सोबत गप्पा मारायला शेजारच्या हॉटेलात आला. चांगल्या दिड दोन तास गप्पा झाल्यावर आम्ही आपाआपल्याघरी परत गेलो. रात्री त्याचा फोन " निखिल तुझ्या मुळे आज मी माझ्या बायकोला बाजारात विसरुन आलो" असे तर करत नाही ना तुझा नवरा.

जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण
एकुणच मराठे काकांना बेनिफिट ऑफ डाऊट दिले पाहिजे
चांगला नवरा भेटला आहे तर उगिच त्याला ध्यान म्हणतेस... बिचारा किती घाबरुन राहातो तुला....
काय माहीती तुझ्या बद्दल तो पण कुठे तरी असेच लिहित असेल.
==निखिल

नितिन थत्ते's picture

17 Jun 2009 - 3:15 pm | नितिन थत्ते

हा लेख चुचुकाकूंच्या नावाने 'ध्याना'नेच लिहिलेला दिसतो. कालचाही. ( तरीच म्हणतोय चुचुकाकू मराठी कशा लिहायला लागल्या?)

खराटा
(रंग माझा वेगळा)

मदनबाण's picture

17 Jun 2009 - 3:16 pm | मदनबाण

:S
हा हा हा...येउध्या अजुन असेच एक एक किस्से...
आता नीट टंकता आहात ते पाहुन आणि वाचुन आनंद झाला. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 3:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:S
व्वा, सुंदर लेख आणि संबंधित चर्चा. जियो चुचु. :S

पर्नल नेने मराठे's picture

17 Jun 2009 - 3:37 pm | पर्नल नेने मराठे

#o नक्कि सगळ्याना आवद्तेय ना लिहिलेल
मी माझी थट्टा कर्ताय :|
[( चुचु

मदनबाण's picture

17 Jun 2009 - 3:42 pm | मदनबाण

:|
अवं बाई काळजी कशाला करतायसा ...ह्म्म?
तुम्ही "नीट" लिवल म्हणजे झाल.

अतिअवांतर :-- येथे कोणीही "नीट" या शब्दाचा "वेगळा" अर्थ काढु नये. ;)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jun 2009 - 3:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:S थत्ता अनि तुझि कभि नै!! #:S
नशिबाने केली ती काय कमी आहे की आम्ही करु! L)

(साभार एका आंतरजालीय 'मित्रा'कडून! आंतरजालावर कोणीही कुणाचे काहीही नसते याची जाणीव आहे.)

नेहा

बाकरवडी's picture

17 Jun 2009 - 4:50 pm | बाकरवडी

=)) =)) =))

:B :B :B बाकरवडी :B :B :B

वा !!! क्षणभर वाटल आमच्या बधुराजा॑चच कौतुक चाललय की काय आमच्या वै॑नीकडुन !!
<<<रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही>>>
एकदा महाराज कार ऑफीसमध्ये ठेवुन बसने घरी आली होते. नवीनच कार घेतली होती तेव्हा.आणी म्हणे लक्षात नाही राहील..लग्नाआधी ठीक होता त्यान॑तर ......काय सा॑गायच...

सुहास

बाकरवडी's picture

17 Jun 2009 - 4:56 pm | बाकरवडी

=)) =)) =))

मराठे आजोबांनी जर हा लेख वाचला तर ते तुला विमानातून ढकलून देतील खाली !!!!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

मराठमोळा's picture

17 Jun 2009 - 6:10 pm | मराठमोळा

मी म्हणाले काल काय ते घेवुन झाले होते ना, मग आज परत का?
मी जोरातच पातेले कुठे आहे विचारले मग गुपचुप माळ्यावर टाकलेले पातेले खाली आले.
मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय
मी एकदा बोलले एवढा वेळ असतो, जरा कामे करत जा

अरेरे बिचारं ध्यानं. ~X( :S :(

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती's picture

17 Jun 2009 - 6:26 pm | रेवती

सांभाळून रहा गं बाई!;)
अजून बायकोला विसरले नाहीयेत मराठेकाका......हे नशिबच म्हणायचं तुझं! त्यांच्यामुळेच ना तुला आज संधी मिळाली हा लेख लिहायची? आता तक्रार करू नकोस नाहीतर सिंकभर भांडी लख्ख घासायला लागतील.;)
एकूणच गोष्टं मस्त मस्त.

रेवती

अनिल हटेला's picture

17 Jun 2009 - 6:49 pm | अनिल हटेला

मस्तच लिहीताये की तुम्ह्वी......
ध्यानाबद्दल छानच लिहीलत...
मला अशी शंका का बरं येतेय की हा लेख ध्यानाकडूनच टंकून घेतलाये तुम्ही....;-)

उत्तमोत्तम लेख येउ द्यात ....:S

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

किती जाचातून जात आहेत बिचारे, असो हळूहळू जातील हेही दिवस!! माझ्यातर्फे मराठेकाकांना शुभेच्छा!!

(ध्यानस्थ)चतुरंग

अवलिया's picture

18 Jun 2009 - 6:36 am | अवलिया

:S

चुचुलिया

मस्त कलंदर's picture

17 Jun 2009 - 7:35 pm | मस्त कलंदर

सुंदर ते ध्यान...
उभे/बसले कुठेतरी...
चुचुच्या रागाला...
घाबरोनिया.... :))

मस्त लेख चुचु.. फक्त पूर्ण लेख "नीट" लिहायचं मनावर घ्याना.. म्हणजे मागचा लिहिला होता तसा.. यात मात्र शेवटी शेवटी चिकाटी कमी पडलेली दिसतीये.. बाकी पराशी [ध्यानाचं तुझ्याबद्दलचं मत जाणून घेण्याच्या इच्छेबाबतीत] सहमत!!! ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

पर्नल नेने मराठे's picture

17 Jun 2009 - 7:41 pm | पर्नल नेने मराठे

धन्यवाद,
पुढल्यावेळी नक्की लक्शात थेवेन ;;)
चुचु

टारझन's picture

17 Jun 2009 - 8:53 pm | टारझन

नवर्‍याचे मनोगत चुचुनं लिहीलंय का ? असो !!

-कर्णल टार्झन कराटे

समिधा's picture

17 Jun 2009 - 10:20 pm | समिधा

काय गं नवर्‍याला किती धाकात ठेवलयस...
बिचारे भाऊजी काही चुकल तर धडधडीत सांगु पण शकत नाहीत तुला.:)

बघ हो एक दिवस चिडुन घरी सफरचंद आणायचे बंद करतील मग तुला ते ही खायला मिळणार नाही ;)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

क्रान्ति's picture

18 Jun 2009 - 8:16 am | क्रान्ति

आहे ग चुचुताई! मस्त लिहिलंस.

=D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा