दिवाळीचे दिवस होते. हा लवकर म्हणजे ११ वाज़ता अन्घोळ करुन देवळात जातो म्हणुन नविन कपडे घालुन बाहेर पड्ला होता. आद्ल्या दिवशीच जाउन सगळी खरेदी करुन झाली होती. मी अन्घोळ करुन बाहेर आले, डस्टबिनमधे कहितरी टाकायला गेले तर एक किमतीचे लेबल दिसले, मी ते उचलुन पहिले त्यावर रु. ७५०/- लिहिले होते. मी खुप विचार केला कि खादीभान्डार मधुन ७५०/- चे तर काल काही घेतले नाही. मग ह्याचे कपाट उघडून पाहिले. तर आजच्याच तारखेचे बिल असलेली खादीभान्डारची पिशवी दिसली, आत एक सुन्द्रर झब्बा होता. काय ते लक्शात आले. हा घरी आला, मी काही न बोलता झब्बा समोर टाकला. चेहरा पाहाण्य़ासारखा झाला होता. मी म्हणाले काल काय ते घेवुन झाले होते ना, मग आज परत का? म्हणाला उद्या सान्गणाऱच होतो. 8|
एक दिवशी गॅसवर चहा करायला ठेवलान आणी चक्क कुलुप लावुन निघुन गेला. घरात चहा उकळुन कोळसा झाला. घरातुन धुर बाहेर येउ लागला. शेजारचे घरात आग लागली असे समजुन कुलुप तोडायला निघाले होते, तेव्ढ्यात हे पात्र कुठुन ते आल न घर उघड्लेन. मी येइपर्यन्त पातेली लपवुन झाली होती. मी घरी आले तोवर शेजारची खालीच भेट्ली, आणी घडलेला व्रुतान्त तिने मला सान्गितलान. घरात शिरताच वेगळाच दर्प मला जाणवला पण धुप, उदब्त्या लावुन तो लपवायचा प्रयन्त केला गेला होता. मी जोरातच पातेले कुठे आहे विचारले मग गुपचुप माळ्यावर टाकलेले पातेले खाली आले. दुध तर अनेकदा ओतु जाते. ऒटा ऒला असला कि समजावे आज दुध ओतु गेलय न गॅसला अन्घोळ घालुन झालीये. ~X(
एकदा ह्याला मी नको असलेल्या फ़ाइल्स डिलीट केल्या की कम्पुटर फ़ास्ट होतो असे सान्गीतले. घरी आले, हा शान्त टीवी पहात बसला होता. मी विचार केला चला आपण जरावेळ सर्फ़िन्ग करुयात. पण कम्पुटर चालुच होइना. ह्याला विचारले काय झाले असेल तर ह्या दुर्लक्श करु लागला. मला लक्शात आले कि हे ह्याचेच उद्योग आहेत, मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय. मग म्हणाला तु म्हणाली होतिस तसेच होत्या नव्ह्त्या त्या सगळ्या फ़ाइल्स डिलीट केल्या. ह्म्म म्हणजे सिस्टम फ़ाइल्स पण डिलीट झाल्या होत्या तर. :T
नशीब म्हणजे किति असावे ह्याचे ओफ़्फ़िस वानखेडे स्टेडीयममधे नॉर्थ स्टॅण्ड खाली होते. हा दुपारी जेवायला येइ. हा मस्त जेवुन अर्धा तास झोप काढुन ओफ़्फ़िसला जात असे. आणी ६ ला ओफ़्फ़िस सुट्ले कि ६.१० ला घरात असे. मी एकदा बोलले एवढा वेळ असतो, जरा कामे करत जा. ह्याने दुसर्याच दिवशी होते नव्ते ते सगळे कपडे मशीनला लावले. रन्ग जाणारे पण त्यातच अस्ल्याने धुवुन निघालेले कपडे परत अन्गाला लावता आले नाहित. एकदा देवान्ची पुजा करायला लावली. पुजा झाल्यावर देव वाटेल तसे ठेवले होते, एक्मेकान्च्या अन्गावर काय न काय, बाळ्क्रुश्ण तर निर्माल्यामधे मिळाला. :
कोणी आले की ह्याला उत येतो, लगेच म्हणतो, जरा चहा कर, कॉफी कर. मित्र म्हणजे ड्झनावारी येतात. कप बशानी सिन्क भरुन जाते. रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही. ऎवढे असुनही मी काही बोलले कि म्हणतो, जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला................... :D
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7348
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
ध्यान
हा हा हा
In reply to ध्यान by विनायक प्रभू
अरेरे..
हसुन - हसुन पोटात दुखतय माझ्या,,,,,,,,,,
प्रसन्न ग
In reply to हसुन - हसुन पोटात दुखतय माझ्या,,,,,,,,,, by शार्दुल
अग बाई ,,,,,,,,,चुकलं माझं,,,प्रसन्न ,,,,प्रस,,,,.,,प्रसन्न
In reply to प्रसन्न ग by पर्नल नेने मराठे
हसुन - हसुन पोटात दुखतय माझ्या,,,,,,,,,,
In reply to हसुन - हसुन पोटात दुखतय माझ्या,,,,,,,,,, by शार्दुल
ह्म्म...... अव
वाह चुचुताई चांगली आहे की ध्यानधारणा!
वाह ! लेख
मस्त ग चुचु.
मस्त
In reply to मस्त ग चुचु. by सायली पानसे
चुचु अगं
हा लेख
हा हा
व्वा,
नक्कि
In reply to व्वा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवं बाई
In reply to नक्कि by पर्नल नेने मराठे
थत्ता अनि
In reply to नक्कि by पर्नल नेने मराठे
तु लिहीग,,,,,,,,,, मस्तच लिहीलस,,,!!!
In reply to नक्कि by पर्नल नेने मराठे
बाकरवडी
In reply to नक्कि by पर्नल नेने मराठे
वा !!! क्षणभर वाटल आमच्या बधुराजा॑चच कौतुक चाललय की काय आमच्या
मराठे
मी म्हणाले
सांभाळून
सह्ही !!!
मला मराठेकाकांबद्दल सहानुभूती आहे!
.
सुंदर ते ध्यान...
धन्यवाद, पु
In reply to सुंदर ते ध्यान... by मस्त कलंदर
नवर्याचे
मस्त लिहीलयस
छान