बालमजूर

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
15 Jun 2009 - 11:56 am

हाय नशिबा माझी कहाणी
बालमजूर मी, बाल्यावस्थेची समाधी
बापाची माया लुटली जुगारी
मायची मारझोड उघड्या नजरी
आक्रंदती काळीज ममतेसाठी
ममताही मायची दव्यातच उरली
तिन्ही पोटचा मी भार वाही
देवही ना प्रसन्न उपाशी पोटी
शिक्षण ना चव हलव्याची
मालकाच्या लाथा अन तुकडा पदरी
कोवळे शरीर चिकटतसे सापळी
लाल रक्त जळून भिने काळ्या रंगी
खेळ, बागडण्यास ना त्राण अंगी
मायच्या जखमेची चिंता सदा उरावरी.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

15 Jun 2009 - 8:10 pm | संदीप चित्रे

आजूबाजूला बघायला लावणारी कविता !
संवेदनशीलता अशीच राहो या शुभेच्छा आणि ज्या दिवशी बालमजूरी पूर्णपणे बंद होईल तो सुदिन.

जागु's picture

16 Jun 2009 - 10:45 am | जागु

धन्यवाद संदिप. अजुन अशी खुप परिस्थीती झापडं उघडून पाहण्यासारखी आजुबाजूला दिसते.