प्रति,
उदय गंगाधर सप्रे,
8, मणिपुष्प ,
सरस्वती इंग्रजी शाळेसमोर,
पांचपाखाडी,ठाणे(पश्चिम),
विषय - ग्राहक क्रमांक 000019224562 - अवाजवी आणि चुकीचे देयक आणि मुद्दाम उशीरा देण्यात येणारी देयके
आपले यासंबधीचा तक्रार अर्ज मिळाला. परंतु या तक्रार अर्जासोबत शेवटच्या आलेल्या बिलाच्या रकमेचा भरणा केल्याची पावती न जोडल्याने आपला अर्ज फेटाळला जात आहे. तरी कृपया पुर्ण बिलाची रक्कम भरुन त्यानंतर पुन्हा अर्ज करावा ही सुचना.
कळावे,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी ली. करिता
व्यवस्थापकांचा स्वीय सहायक
(पत्राचे उत्तर)
*****
ओ....पहिले बील भरा हो मग बोला काय ते....
(कानात काडी कोरत फोनवर बसलेला एमेशीबीचा माणुस)
****
ते पठाण साहेबांकडे जा.... बसा जरा वेळ चा प्यायला गेलेत... येतीलच आता.... (प्रत्यक्ष कार्यालयात गेलात तर....)
****
:)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
मजेशीर लेख आणि त्यावर अवलियाची प्रतिक्रियाही इरसाल!!:)
अहो सप्रेसायेब,
जाउद्या, दुर्लक्ष करा बिलाकडे! करून करून काय करतील एमेसीबीवाले? फारतर लाईन कट करतील ना? गेले तेल लावत!!!
आपल्या बाजी पासलकरांकडे आणि कान्होजी जेध्यांकडे कुठे होती वीज? पण त्यावाचून काय अडलं का त्यांचं?:)
(ह. घ्या)
सिरियसली - मला वाटतं आधी बील भरावं लागेल, त्याशिवाय ते लोकं तक्रारीची दखल घेत नाहीत (माझ्या पूर्वी पहाण्यात आलेल्या केसनुसार!) गुड लक.
जोड्यानं बडवलं पाहिजे ह्या एम एस ई बी च्या निष्क्रिय आणी भ्रष्ट लोकांना. दुरसंचार, बँक, विमा प्रमाणेच ह्या सेक्टर (मराठी शब्द?) चे सुद्धा खाजगीकरण लवकरात लवकर झाले पाहिजे भारतात. स्पर्धा करायला कुणी नसल्याने त्याना वाटेल तसे निर्णय लोकांवर लादले जातात.
नशिबाने चुकिच्या बिलाचा अनुभव नाही अजुन.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
सेक्टरला मराठी शब्द पेप्रात तरी क्षेत्र असा वापरतात. दूरसंचार क्षेत्र, बँकिंग(?)क्षेत्र इत्यादी... :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
सप्रेसाहेब,
पत्र जरूर पाठवा.
एक गोष्ट पाहून घ्या. वीजबिलावर मीटरचा रीडिंगच्या दिवशीचा फोटो छापलेला असेल त्यातील रीडिंग, बिलात दाखवलेले रीडिंग आणि तुमच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग टॅली करून पहा त्यात गफलत असेल तर त्याचाही उल्लेख पत्रात करा. ते टॅली होत असतील तर तुमच्या मीटरमधून कोणी वीज चोरत आहे का ते पहा.
बाकी तुमच्या लेखनावरून हे बील तुम्हाला वेळेपूर्वी मिळाल्याचे दिसते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
जरी मीटर ने जास्त रीडींग दाखवले असेल तरी, तुमचे सरासरी बील किती येते यावरुन बीलाचा अंदाच लावुन "मीटर फॉल्टी" आहे अशी तक्रार करा. बिल कमी करुन मिळते. (खेट्यांसाठी तयार असालच!) :)
मीटर दुरुस्ती/बदली चा अर्ज करा. आम्हालाही रु २०००+ बील येत होते, तक्रार करून मीटर बदलल्यावर ७००-९०० रु येते. खरे तर ६ महिन्यांनी मीटर तपासणे वीज मंडळाला बंधनकारक आहे, पण....
मीटर दुरुस्ती/बदली चा अर्ज नक्की करा!
एम एस ई बी मधून काहीही उत्तर न आल्यास किंवा त्यांच्याकडून टाळाटाळ होत असेल तर लगेच जवळच्या ग्राहक पंचायत मधे तक्रार नोंदवा. तुमच्या भागात ग्राहक पंचायत किती कार्यशील आहे ते माहीत नाही, पण तिथे तक्रात नोंदवल्यास तुमच्या एम एस ई बी मधल्या अर्जावर लगेच दखल घेतली जाईल असे वाटते.
-अनामिक
आम्ही बिल संकेतस्थळावरून भरतो. आम्हाला बील वेळेवर मिळते.
अवांतरः सप्रेसाहेबांना रीडिंग चेक करायला सांगितले होते त्याचे काही कळले नाही. सप्रे साहेबांनी धागा काढून आपल्याला कामाला लावले असे दिसते. त्यानंतर ते गायब झाले आहेत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
जो काही अर्ज द्यायचा असेल तो त्या हाफिसातल्या सगळ्यात मोठ्या साहेबाला/साहेबिणीला द्यायचा प्रयत्न करा. ओळख काढून शिरकाव करता आला तर जास्त चांगले! आणखी एक गोष्ट, हेलपाटे मारावे लागतीलच, त्याची तयारी ठेवा. (हाताखालचे क्लार्क बाबू/बाबी बर्याचवेळा फारसे कामाचे नसतात.)
तुमचे काम लवकर होवो. शुभेच्छा!
(अनुभवी)चतुरंग
सप्रे साहेब .. आपण सब टिव्ही वरची "ऑफिस ऑफिस" ही मालिका पाहाता का ? आपला "मुसद्दीलाल" होईल अशी भिती वाटते ... ह्याचा सर्वांत सोप्पा बदला म्हणून विजचोरी करा !!!
आम्ही मित्राच्या रूमवर रहात असताना तीन-तीन कंप्यूटरं रात्रंदिवस पळत असायचे .. रात्री आम्ही मिटरचं इनपुट आउटपुट स्वॅप करायचो आणि पाण्याच्या बॅरल मधे हिटर सोडूनद्यायचो .. रात्रभर मिटर उलटं पळायचं .. आणि २ आकडी बील यायचं .. :) आता डिजीटल मिटर्स आल्यामुळं असं काही करता येतं का ते माहीत नाही :)
(भुरटा चोर) टारझन गवळी
प्रतिक्रिया
प्रति, उदय
मजेशीर लेख
जोड्यानं
सेक्टरला
बेस्ट
सप्रेसाहे
मीटर्चा फोटु
मीटर्चा फोटु
जरी मीटर
मीटर दुरुस्तीची तक्रार
एम एस ई बी
महाराष्ट्
महानालायक
आम्ही बिल
काय राव
सप्रेसाहेब,
सप्रे