पाककृती हवी आहे..

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in पाककृती
6 Jun 2009 - 4:37 pm

सध्याचा रिकामपणाचा नवीन उद्योग स्वतःच्या नि दुसर्‍यांच्या पोटावर प्रयोग करणे हा आहे.. जालावरच्या पाककृती वाचून दोन तीन वेळा कोल्ड कॉफी बनवली.. पण एकदा खूपच कडक नि कडवट झाली... सोबतच्या गिनिपिगने कशीबशी नरड्याखाली उतरवली.. दुसर्‍यावेळेस तिची बासुंदी झाली होती.. दूरदृष्टी ठेवून यावेळी गिनिपिग बदलला होता.. :D
तर कृपया कुणी कॉफी, साखर, पाणी, दुध यांचे नेमके प्रमाण सांगेल का?
त्याचबरोबर.. घरच्या घरी क्रीम बनवण्याचा काही सोपा उपाय आहे?? झालंय काय, तर मी एक नवीन चित्रफीत पाहिलीय, कॉफी आर्टची.. थोडी सांड-लवंड अपरिहार्य आहे.. पण पाककौशल्यात मी दगड आहे की वीट आहे.. हे जरा तपासून पाहायचंय..

आणखी एक.. पिकल्या आंब्याचा मुरंबा कसा बनवतात?? हा बहुतेक टिपीकल कोकणस्थ ब्राह्मणी पदार्थ आहे.. चवीला अप्रतिम.!!!

अवांतरः
१. साखरेचे खाणारे चतुरंग हा पदार्थ कसे विसरले बरे???
२. परा, तुझीही या दोन्ही पदार्थांची पाककृती येऊ दे.. नीट साधल्या, तर पार्सल करेन.. ;) [हिंमत असेल, तर खाऊन दाखव]

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2009 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार

बाबो येकदम चॅलेंज दिल की आम्हाला ;) आताच बहुगुणी यांना एक पाकृ देउन आलो आहे गुलाबजाम पाकातली ;)

तुम्हाला आधी जरा व्यवस्थीत आणी उत्तम पाकृ मिळु देत या धाग्यात, मग मी माझ्या लज्जतदार पाकृ देतोच.

परा कपुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

रेवती's picture

7 Jun 2009 - 7:42 am | रेवती

हापूस आंब्याचा मुरांबा करताना पिकलेल्या आंब्याच्या (आंबा फार मऊ नको) फोडी थोड्या मोठ्या आकारात चिरून १ वाटी, २ वाट्या साखर, साखरेच्या निम्मे पाणी, चिमूटभर पोटॅशियम मेटाबाय सल्फेट, दोन लवंगा व अर्धा टीस्पू. लिंबूरस.
कृती: साखर व पाण्याचा पाक करायला ठेवावा. दोनतारी पाकानंतर आंब्याच्या फोडी , लवंगा, लिंबूरस घालावे व दोन ते तीन चांगल्या उकळ्या द्याव्यात. थंड झाल्यावर पोटॅशियम मेटाबाय सल्फेट घालून बराणीत भरावा.
फोडी लहान केल्यास पाकात विरघळून जातात. माझी नेहमी अशीच फजिती होते.
लिंबूरसामुळे साखरेचे कण तयार होणार नाहीत.
लवंग घातल्याने मुंग्या होत नाहीत असं ऐकलय पण आमच्याकडे मुंग्या लागण्यापुरताही वेळ दिला जात नाही.;)
जर चुकून थोडा मुरांबा उरला तर खराब होउ नये म्हणून पोटॅशियम मेटाबाय सल्फेट.
रेवती

मस्त कलंदर's picture

7 Jun 2009 - 10:51 am | मस्त कलंदर

आजच करून पाहीन....
नेक काममें देरी नको.... :D

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

स्वाती दिनेश's picture

7 Jun 2009 - 11:35 am | स्वाती दिनेश

मोरंब्याची कृती परफेक्ट.. आमच्याकडे पण अस्साच करतात ,:) बाबा हापूसचे जरा कडक आंबे निवडून,साली काढून,फोडी करत त्याची आठवण करुन दिलीस ग रेवती..
स्वाती

चकली's picture

7 Jun 2009 - 8:51 am | चकली

मुरांबा कृती अगदी पर्फेक्ट!

चकली
http://chakali.blogspot.com