पाककृती हवी आहे..
सध्याचा रिकामपणाचा नवीन उद्योग स्वतःच्या नि दुसर्यांच्या पोटावर प्रयोग करणे हा आहे.. जालावरच्या पाककृती वाचून दोन तीन वेळा कोल्ड कॉफी बनवली.. पण एकदा खूपच कडक नि कडवट झाली... सोबतच्या गिनिपिगने कशीबशी नरड्याखाली उतरवली.. दुसर्यावेळेस तिची बासुंदी झाली होती.. दूरदृष्टी ठेवून यावेळी गिनिपिग बदलला होता.. :D
तर कृपया कुणी कॉफी, साखर, पाणी, दुध यांचे नेमके प्रमाण सांगेल का?
त्याचबरोबर.. घरच्या घरी क्रीम बनवण्याचा काही सोपा उपाय आहे?? झालंय काय, तर मी एक नवीन चित्रफीत पाहिलीय, कॉफी आर्टची.. थोडी सांड-लवंड अपरिहार्य आहे.. पण पाककौशल्यात मी दगड आहे की वीट आहे.. हे जरा तपासून पाहायचंय..
आणखी एक.. पिकल्या आंब्याचा मुरंबा कसा बनवतात?? हा बहुतेक टिपीकल कोकणस्थ ब्राह्मणी पदार्थ आहे.. चवीला अप्रतिम.!!!
अवांतरः
१. साखरेचे खाणारे चतुरंग हा पदार्थ कसे विसरले बरे???
२. परा, तुझीही या दोन्ही पदार्थांची पाककृती येऊ दे.. नीट साधल्या, तर पार्सल करेन.. ;) [हिंमत असेल, तर खाऊन दाखव]
वाचने
4275
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
बाबो येकदम
हापूस
In reply to हापूस by रेवती
धन्यु...
In reply to हापूस by रेवती
यस्स..
मुरांबा कृती