माझं काय चुकलं...?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
3 Jun 2009 - 3:40 pm

आठवतं अजुनही ....
आपलं ते...
कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं.
तुझं पुन्हा पुन्हा,
मान वळवून बघणं...
आणि उधारीवर घेतलेल्या...
सिगारेटच्या धुरात,
माझं डोळ्यातलं पाणी दडवणं.
तु विचारलं होतस
का रे? काय चुकलं?
का झालीत अशी ...
आपल्या नात्याची शकलं?
मला तरी कुठे ठाऊक होतं
कुठल्या तरी बेसावध क्षणी...
मनाशी असलेलं..
माझंच नातं तुटलं होतं !
कदाचित तुला ...
गाडीतुन उतरताना पाहुन..
मला माझं ....
पंक्चर झालेली सायकल धरुन..
मैलोनमैल चालणं आठवलं होतं.
पोटापाण्याचा धंदा काय?
तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन
सुकलेल्या डोळ्यांसमोर
गळणारं माझं छप्पर दिसलं होतं.
आणि दिसल्या होत्या
सुरकुत्या...
माझ्या मायच्या डोळ्याखालच्या..
माझ्या नोकरीकडे डोळे लावुन बसलेल्या!
तुझ्या मुखचंद्रापेक्षा...
भावंडांच्या ताटातल्या...
भाकरीला मी महत्वाचं मानलं...
तुच सांग...माझं काय चुकलं?

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

अनंता's picture

3 Jun 2009 - 3:48 pm | अनंता

व्याकुळ करणारी, आशयघन कविता!!
खरंच तुमचे काहीच चुकले नाही.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

विनायक प्रभू's picture

3 Jun 2009 - 4:00 pm | विनायक प्रभू

कायच चुकले नाही हो

मनीषा's picture

3 Jun 2009 - 4:21 pm | मनीषा

स्वसुखापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच ...
रामायण कालापासून चालत आलेली परंपरा आहे .

मराठी_माणूस's picture

3 Jun 2009 - 4:24 pm | मराठी_माणूस

पोटापाण्याचा धंदा काय?
तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन

हा प्रश्न विचारण्यात एका मुलीच्या बापाचे तरी काय चुकले ?

अवलिया's picture

3 Jun 2009 - 4:43 pm | अवलिया

खरे तर कुणाचेच काही चुकत नसते....
काळ चालत असतो ....
जखमा भरुन येतच असतात.
पण कधी कधी वाटते की काही काही जखमा न भरलेल्याच चांगल्या असतात...
अशा जखमा भळभळत्या रहाण्यासाठी "माझे काय चुकले ? " हा प्रश्न चांगला असतो :)

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

3 Jun 2009 - 4:47 pm | पर्नल नेने मराठे

8|

चुचु

दत्ता काळे's picture

3 Jun 2009 - 7:16 pm | दत्ता काळे

पण, असं खरंच तुमच्या बाबतीत घडलं होतं कां ?

का, हि कल्पनेतली ष्टोरी आहे ?

- कारण, आमचे शाळेतले दिवस ढुं. . वर ठिगळं लावलेल्या खाकी हाफ चड्ड्या आणि सुरवातीला पांढरे असणारे सदरे घालून संपले, आणि कॉलेजचे दिवस तर जेमतेम दोन शर्टस्, तेवढ्याच विजारी आणि हिरो सायकल हाणणे एवढ्यावरच चाललेले असल्याने, आमच्या प्रेमभावना उमलण्याआधीच किड लागलेल्या कळी प्रमाणे निर्माल्ल्या होत्या, त्यामुळे मुलींकडे बघण्याची आमची भावना कायम ओशाळवाणी आणि शरमेची असायची . प्रेम हा दुर्मिळ प्रकार आम्हाला क्वचित, इतरांच्या बाबतीत आणि मुबलकपणे हिंदी चित्रपटात, अगदी तुमच्या कवितेतल्या प्रमाणे- म्हणजे आपली गरीबी आणि प्रियेचा धनिक आणि गर्विष्ठ बाप इ., बघायला मिळत असे. तेव्हा असल्या उत्तम प्रेमप्रकरणाची मला, अगदी माझ्या स्वप्नातली ,तुमची कविता भासली.

परंतु काहीहि असो, तुमची कविता मला आवडली.

क्रान्ति's picture

3 Jun 2009 - 11:24 pm | क्रान्ति

तुझ्या मुखचंद्रापेक्षा...
भावंडांच्या ताटातल्या...
भाकरीला मी महत्वाचं मानलं...

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

धनंजय's picture

4 Jun 2009 - 1:27 am | धनंजय

कल्पना विचार करायला लावणारी आहे.

पुढील कवितांसाठी शुभेच्छा.