कसं सांगू ....?

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जे न देखे रवी...
31 May 2009 - 4:57 pm

कसं सांगू .....!
तुला पटणारही नाही.
साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची,
तो निशिगंध....
अबोल झालाय !

तुला आठवतं.........?
त्या अनुरागी क्षणांवरती
त्याच्याही गंधाची
पखरण होतीच.
त्या कैफाचा स्पर्षवारा,
त्यालाही हवासा वाटला.

ताटातुटीच्या क्षणी........!
'पुन्हा येते' म्हणालीस,
आली नाहीस.

तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र,
कोमेजून गेलाय......!

माझं कांही नाही.....!
पण निदान त्याच्यासाठीं तरी,
तुला पुन्हा यायलाच हवं......!!

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

31 May 2009 - 5:00 pm | श्रावण मोडक

रंजीश ही सही ची आठवण दिलीत. सुंदर, सुंदर...

प्रमोद देव's picture

31 May 2009 - 5:16 pm | प्रमोद देव

नानाशास्त्री, कविता अतिशय हृद्य आहे.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

क्रान्ति's picture

31 May 2009 - 11:22 pm | क्रान्ति

आवडली.
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा