अननसा चा उलटापुलटा केक :)

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
29 May 2009 - 12:08 pm

साहित्य :
१ अननस किंवा १ टिन अननस
५-६ चेरि किंवा मनुका
२ कप मैदा
१ टी.स्पू. बेकिंग पावडर
१ टी.स्पू. बेकिंग सोडा
१ + १/२ कप साखर
३ अंडी
१ टि.स्पू. वॅनिला अर्क
१/२ कप बटर - वितळवून
१ टे.स्पू. संत्रा साल (Orange Zest) , लिंबू साल (Lemon Zest)
व्हिप्प्ड क्रिम - एच्छिक

कृति:
१)अ)अननस वापरुन
अननसाच्या चकत्या करुन घ्याव्या.
एका पसरट पॅन मध्ये १/२ कप साखर + पाणी २:१ प्रमाण घेउन त्यात अननसाच्या ४-५ चकत्या शिजवून घ्याव्या. हा रस ही नंतर वापरावा.
जास्त शिजवू नये.
ब)अननसा चा टिन वापरुन
हे अननस शिजवावे लागत नाही. पण हा पुर्ण रस वापरु नये, अंदाजाने थोडा थोडा च वापरावा.

२) मैदा , बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्यावे.
३) अंडया चे पांढरे वेगळे करुन घ्यावे आणि फेटून घ्यावे.
४) फेटलेल्या वरिल मिश्रणा त १ कप साखर मिसळून घ्यावी आणि अजुन फेटावे.
५) अंड्याचे पिवळे + बटर पण फेटून घ्यावे.
६) आता दोन्ही मिश्रणं + अननसा चा रस + वॅनिला अर्क + संत्रा साल+ लिंबू साल हळुवार एकत्र करुन घेणे. जोरजोरात हलवू नये.
७) अननसाच्या चकत्या पुर्ण बेकिंग ट्रे चा तळ झाकेल अशा लावुन घ्याव्या , प्रत्येक अननसाच्या चकती मध्ये चेरि किंवा मनुका टाकाव्यात.
८) या चकत्यां वर वरिल मिश्रण टाकावे .
९) ओव्हन ३५० फॅ. वर प्रीहीट करुन घ्यावे.
१०) ३०-३५ मि. ३५० फॅ. वर बेक करावे.
११) बेकिंग ट्रे थंड झाल्या वर त्यावर डिश ठेवुन झटकन केक उलटा करावा जेणेकरुन अननस वरून दिसेल.
१२) व्हिप्प्ड क्रिम घेउन खावा.

प्रतिक्रिया

काजुकतली's picture

29 May 2009 - 1:42 pm | काजुकतली

मी असाच ऍपल अपसाईड डाऊन केक केलेला एकदा... :) हाही करुन पाहिन आता

जागु's picture

29 May 2009 - 1:46 pm | जागु

हे संत्र साल, किती मागायच दुकानात ? जास्त झाल तर फुकट नको जायला.

दिपाली पाटिल's picture

29 May 2009 - 10:43 pm | दिपाली पाटिल

जागु, काजुकतली,
घरातलं च संत्र , लिंबू हलक्या हाताने किसायचे, फक्त साल च किसायचे , आतला पांढरा भाग घेऊ नये तो कडवट लागतो.

दिपाली :)

काजुकतली's picture

29 May 2009 - 3:53 pm | काजुकतली

जागु मी तरी इथे कुठे पाहिले नाही.. घरच्या घरीच करता येते ही साल. गुगलवर सर्च मार. लगेच मिळेल कृती...

चकली's picture

29 May 2009 - 5:16 pm | चकली

केक छान दिसतोय हा दिपाली !!

चकली
http://chakali.blogspot.com

मीनल's picture

29 May 2009 - 5:31 pm | मीनल

सहमत. मस्त फोटो.
मीनल.

मदनबाण's picture

29 May 2009 - 11:02 pm | मदनबाण

एक स्लाईस काढुन पटकन खावा वाटतोय....
फोटोच इतका छान आहे की पाकृ वाचायचे कष्ट घेतले नाहीत... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रेवती's picture

30 May 2009 - 12:11 am | रेवती

मस्त पाककृती, मस्त फोटू!
असे फोटू नुसते बघितले तरी वजन वाढायची भिती वाटते.
करून बघीन हा केक.

रेवती

प्राजु's picture

30 May 2009 - 12:19 am | प्राजु

काय भारी आहे हा केक.
मला कधी जमणार देव जाणे!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

30 May 2009 - 12:25 am | चित्रा

छान दिसतो आहे केक.

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:14 am | विसोबा खेचर

ज ब रा..!

तात्या.

तरी शेवटी डोळा चुकवून आलासच ना रंगा?
खल्लास! तोंडाचा पाझरतलाव झालाय!! =P~ =P~ =P~

चतुरंग

समिधा's picture

30 May 2009 - 5:52 am | समिधा

खुपच मस्त दिसतोय केक.. :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)