स्वातंत्र्यवीर

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
28 May 2009 - 1:44 pm

आज २८ मे... स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ साली जन्मलेल्या या महामानवाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावुन ब्रिटीश राजवटीविरुद्ध रण छेडले होते. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीत सिंहाचा वाटा असणार्‍या या महान क्रांतिकारकाचे असाधारण कर्तुत्व आज आपल्या स्वतंत्र (?) भारत देशातच दुर्लक्षित होत आहे.. हे आपले आणि अखंड भारतवर्षाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

या महान क्रांतिकारक देशभक्ताच्या जन्मदिनी माझे त्रिवार वंदन.

जागविले वीरा तू स्वत्व आमुचे
रणी सांडुनीया रक्त अपुले

'स्वतंत्रते भगवति' साद घालुनी
स्वये समग्र भारता आळवले

दिलेस बळ तू जनसामान्यांसी
मनी स्वाभिमानाचे बीज रोवले

'अभिनव भारता' जन्म दिधला
अन देशसेवेचे कंकण बांधले

सात समुद्र पादाक्रांत करुनी
घरात शत्रुच्या पाय रोवले

मार्सेलिसचे अदभुत त्याने
गात्रांत अमुच्या रक्त सळसळे

असहाय्य झाले काळे पाणी
देशप्रेम तव समर्थ ठरले

पतितपावन तू योगी मनाचा
सुधर्माचे तू सत्व शिकवले

कोटी कोटी तव प्रणाम वीरा
तू अमुचे जीवन उद्धरले

विशाल

कविता

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

29 May 2009 - 12:16 am | ऋषिकेश

महान क्रांतिकारक देशभक्ताच्या जन्मदिनी माझे त्रिवार वंदन

असेच म्हणतो

बाकी स्वतंत्र ह्या शब्दाच्या पुढील प्रश्नचिन्हाचं प्रयोजन कळलं नाहि.. भारताचे स्वातंत्र्य तुम्हास मान्य नाहि का?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विशाल कुलकर्णी's picture

29 May 2009 - 11:42 am | विशाल कुलकर्णी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
<<भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीत सिंहाचा वाटा असणार्‍या या महान क्रांतिकारकाचे असाधारण कर्तुत्व आज आपल्या स्वतंत्र भारत देशातच दुर्लक्षित होत आहे>>>
हे कसलं स्वातंत्र्य? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर सेल्युलर जेलमधील सावरकरांचे अस्तित्व दाखवणार्‍या कवितेच्या ओळी मिटवल्या जात असतील तर ते स्वातंत्र्य म्हणायचे का? विधानसभेत सावरकरांचा फोटो लावायचा की नाही यावरुन वाद होत असतील तर त्याला स्वातंत्र्य म्हणायचे का? ज्याच्या देशभक्तीला ब्रिटीशांनीसुद्धा मानले त्या वीराला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधींच्या खुनात आरोपी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण जेथे केले जाते त्याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
चुभुदेघे.

(कट्टर सावरकरभक्त)
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशसुमारजी..)

प्राजु's picture

29 May 2009 - 2:06 am | प्राजु

कोटी कोटी तव प्रणाम वीरा
तू अमुचे जीवन उद्धरले

प्रणाम!!!! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उदय सप्रे's picture

29 May 2009 - 9:29 am | उदय सप्रे

ने मजसी ने , परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला , तळमळला , सागरा !

हे स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न ! प्रणाम !

आणि आजची परिस्थिती ?

ने मजसी ने , लवकर दूर देशाला
त्यांनाच भारतीय कळला
बघून आज भ्रष्ट हे नेते
हुतात्म्यांचा जीव कळवळला !

असो, आज तुम्ही हवे होतात तात्या , म्हणजे ज्वलंत हिंदुत्व काय चीझ असते हे एकदा आजच्या या युगात चाललेल्या हकीकतींना वेगळे वळण लागले असते आणि महाराजांचा पुतळा एंव्हाना अरबी समुद्रात उभा दिसला असता !
बाकी आपल्याकडे पुतळे हे फक्त नेत्यांची १५ ऑगस्ट , २६ जानेवारी आणि १ मे ची सोय असते आणि एरव्ही ती कावळ्यांसाठी, कुत्र्यांसाठी सुलभ शौचालय ठरावे इतकी त्यांचे दुर्दशा असते !
विशाल , धन्यवाद !

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 3:27 am | विसोबा खेचर

सुंदर कविता..!

तात्या.