तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
20 May 2009 - 8:19 pm

१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे )
५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस .
सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ.

मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे.
कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे. गार झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाडसरंच वाटावे.( फार पाणी घालू नये ).
एका पितळी पातेल्यामधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे , कांदा चांगला लाल होत आला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून अजून चांगले परतावे. मग त्यात बारेक चिरलेला टमाटो घालावा आणि हे सर्व मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतावे ( मग त्याचा एक खमंग असा सुवास येईल )
मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत ( होय !! मटणाला ह्ळू हळू पाणी सुटायला लागेल) परतत रहावे. अगदी गरज असल्याशिवाय बाहेरचे पाणी घालू नये.त्याच पाण्यात मटण लवकर शिजते.
मटण शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला घालून परत १० मिनीटे चांगले परतून मग त्यात पाणी घालावे. पाणी थोडं जास्तंच असू द्या.
चांगलं ऊकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणी काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्यावी आणि घालावी. चवीप्रमाणे मीठ आणी लिंबाचा रस घालावा.
आता चांगलं ऊकळून घेउन वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि हाणावे .

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

21 May 2009 - 7:21 am | विनायक प्रभू

भारी

अवलिया's picture

21 May 2009 - 8:25 am | अवलिया

+१

लै भारी

--अवलिया

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 8:37 am | विसोबा खेचर

ज ब रा....!

तात्या.

स्मिता श्रीपाद's picture

21 May 2009 - 10:48 am | स्मिता श्रीपाद

काय दिसतोय रस्सा...मस्तच्...पण

सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , लाल तिखट ,

याचे पण प्रमाण सांगा की....काही कमीजास्त होउन चव बिघडायला नको...

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 May 2009 - 11:44 am | श्रीयुत संतोष जोशी

सु़खं खोबरं ( १ वाटी किसलेलं) , लाल सुखी मिरची ८/ १० , धने १ टी स्पून , लवंग४/५ , दालचिनी २सेंमी तुकडा , तमालपत्र ५/६, ओलं खोबरं २ वाट्या , लाल तिखट १ चमचा ,
हे कदाचित जास्त वाटेल पण खास मालवणी झणझणीतपणा आणण्याकरिता एवढं पाहिजे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

स्मिता श्रीपाद's picture

21 May 2009 - 3:52 pm | स्मिता श्रीपाद

मी आता नक्की करुन बघेन :-)

दिपक's picture

21 May 2009 - 10:54 am | दिपक

=P~
स्स्स्स्स्स्स्स्स मस्तच !

पर्नल नेने मराठे's picture

21 May 2009 - 3:57 pm | पर्नल नेने मराठे

१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे )
ही टाळ्ता येइल क :-?
ह्याला शाकाहारी कर्ता येइल का :-?
चुचु

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 May 2009 - 6:25 pm | श्रीयुत संतोष जोशी

लहान वांगी चालतील.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

पर्नल नेने मराठे's picture

21 May 2009 - 7:05 pm | पर्नल नेने मराठे

बरे वान्गी शोधा अता :S
चुचु

सँडी's picture

25 May 2009 - 9:02 pm | सँडी

ह्याला शाकाहारी कर्ता येइल का
हेच म्हणतो! वांग्याऐवजी दुसरे काय बरे चांगले? :?

प्रशु's picture

21 May 2009 - 4:56 pm | प्रशु

माका माझ्या आईची आठवण करुन दिलात...

हय दिल्लीत आल्यासुन प्वारका झालासा व्हाट्त माका खाण्याच्या बाबतीत....

सुनील's picture

21 May 2009 - 7:04 pm | सुनील

पाकृ छान आणि फोटो तर जबराच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रादेव's picture

21 May 2009 - 10:19 pm | चित्रादेव

हे असे गुरुवारी सकाळी सकाळी पाहिले की मनाला क्लेश होतात. :)
आमच्याकडे पण असेच सुखे खोबर्‍याचे वाटण करून बनते. आताच उद्याच बनवल्याशिवाय चैन नाही.
तो पर्यन्त गुरुवार साजरा करेन.. :)

सुख खोबर आणि सुखी मिरची असल्यावर सुखच सुख...

खादाड's picture

25 May 2009 - 8:15 pm | खादाड

वाव्वा खरच छान दिसतं आहे !