Skip to main content

तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 20/05/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे ) ५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस . सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ. मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे. कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे. गार झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाडसरंच वाटावे.( फार पाणी घालू नये ). एका पितळी पातेल्यामधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे , कांदा चांगला लाल होत आला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालून अजून चांगले परतावे. मग त्यात बारेक चिरलेला टमाटो घालावा आणि हे सर्व मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतावे ( मग त्याचा एक खमंग असा सुवास येईल ) मग त्यात मटण घालून मटणाला पाणी सुटेपर्यंत ( होय !! मटणाला ह्ळू हळू पाणी सुटायला लागेल) परतत रहावे. अगदी गरज असल्याशिवाय बाहेरचे पाणी घालू नये.त्याच पाण्यात मटण लवकर शिजते. मटण शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला घालून परत १० मिनीटे चांगले परतून मग त्यात पाणी घालावे. पाणी थोडं जास्तंच असू द्या. चांगलं ऊकळल्यावर त्यात ओलं खोबरं आणी काळी मिरी मिक्सरमधून वाटून घ्यावी आणि घालावी. चवीप्रमाणे मीठ आणी लिंबाचा रस घालावा. आता चांगलं ऊकळून घेउन वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि हाणावे .

वाचने 10150
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

भारी

ज ब रा....! तात्या.

काय दिसतोय रस्सा...मस्तच्...पण सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , लाल तिखट , याचे पण प्रमाण सांगा की....काही कमीजास्त होउन चव बिघडायला नको...

In reply to by स्मिता श्रीपाद

सु़खं खोबरं ( १ वाटी किसलेलं) , लाल सुखी मिरची ८/ १० , धने १ टी स्पून , लवंग४/५ , दालचिनी २सेंमी तुकडा , तमालपत्र ५/६, ओलं खोबरं २ वाट्या , लाल तिखट १ चमचा , हे कदाचित जास्त वाटेल पण खास मालवणी झणझणीतपणा आणण्याकरिता एवढं पाहिजे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

मी आता नक्की करुन बघेन :-)

=P~ स्स्स्स्स्स्स्स्स मस्तच !

१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे ) ही टाळ्ता येइल क :-? ह्याला शाकाहारी कर्ता येइल का :-? चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

लहान वांगी चालतील. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by पर्नल नेने मराठे

ह्याला शाकाहारी कर्ता येइल का हेच म्हणतो! वांग्याऐवजी दुसरे काय बरे चांगले? :?

माका माझ्या आईची आठवण करुन दिलात... हय दिल्लीत आल्यासुन प्वारका झालासा व्हाट्त माका खाण्याच्या बाबतीत....

पाकृ छान आणि फोटो तर जबराच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे असे गुरुवारी सकाळी सकाळी पाहिले की मनाला क्लेश होतात. :) आमच्याकडे पण असेच सुखे खोबर्‍याचे वाटण करून बनते. आताच उद्याच बनवल्याशिवाय चैन नाही. तो पर्यन्त गुरुवार साजरा करेन.. :)