त की थ ?

नेटकिडा's picture
नेटकिडा in काथ्याकूट
3 May 2009 - 11:22 am
गाभा: 

ब-याचदा दक्षिण भारतीय शब्दांमध्ये (विशेषतः नाम) त, द चे इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना TH वापरले जाते. उर्वरित भारतात शक्यतो फक्त T वापरले जाते व थ, ध साठी याच्या विरुद्ध. जसे की भारत चे स्पेलिंग दक्षिण भारतात BARATH असे लिहिले जाते, तर उर्वरित भारतात BHARAT असे लिहिले जाते. बंगळुरु मध्ये माझा एक मराठी मित्राचे , नाव कायम Mandhar असे लिहिले जायचे, तो खूप वैतागत असे. मग आम्ही प्रत्येक नाव, ज्याच्यात त किंवा थ आहे, त्याची वाट लावत असू. बंगळुरु मध्ये एका उपहागृहात Dhai Bath या पदार्थाचा आम्ही ५ मिनिट अर्थ लावत होतो, आणि जेव्हा शेवटी तो दही भात आहे असे समजले, तेव्हा मात्र खूप हसू आले.
तेव्हापासून मला ब-याच वेळा प्रश्न पडलाय की बरोबर स्पेलिंग काय असावे? T की TH?
मला स्व:ताला Bharat योग्य वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

Nile's picture

3 May 2009 - 11:51 am | Nile

माझ्या माहिति प्रमाणे (मि थोड-फार तमिळ शिकलो आहे) त्यांच्या भाषेत थ हा उच्चार(थ हे व्यंजन) नाही आहे (तसेच इतर काही) म्हणुन ट ला T आणि त ला TH.

देवदत्त's picture

3 May 2009 - 12:03 pm | देवदत्त

ईंग्लिश इज अ वेरी फन्नी लँग्वेज. आता त्यांना तसे वापरायचे ते तसे वापरतात. ;)

ह्या h चा असाच प्रश्न मलाही पडला होता. Neelkanth Builders म्हणून एक जाहिरात नेहमी पाहत आलो आहे. त्यातील शेवटच्या h मुळे त्या नावाचा उच्चार कसा करावा हा तर प्रश्न आहेच पण त्याचे मराठीत नाव (व त्यानुसार नावाचा अर्थ ही) बदलते.
त घेतला तर Neelkanth = नीलकांत = विष्णू
ठ घेतला तर Neelkanth = नीळकंठ = शंकर

(नुकतेच शोधल्यावर कळले की ते नाव नीळकंठच आहे.)

पर्नल नेने मराठे's picture

3 May 2009 - 1:14 pm | पर्नल नेने मराठे

ईंग्लिश इज अ वेरी फन्नी लँग्वेज

एकदा टेलीफोने डायरीत टाटा मराठे वाचनात आले. दोन्ही आडनावे एकत्र कशी म्हणुन खुप विचार केला मग कळ्ले कि ते ताता मराठे आहे.

चुचु

नंदन's picture

3 May 2009 - 12:24 pm | नंदन

तमिळमध्ये महाप्राण नाहीत. महाप्राण म्हणजे ख मधल्या 'ह' च्या उच्चाराचा भाग म्हणता येईल. (अधिक माहिती येथे) त्यामुळे खाकीला काकी म्हणणे किंवा "काना काया क्या?" असे विचारणे - यासारखे विनोद घडतात. हिंदी नावांत 'ह' आला तर अस्सल तमिळ माणूस त्याचा 'ग'कडे झुकणारा उच्चार करतो. या वैशिष्ट्याशिवाय अजून एक मुद्दा म्हणजे त आणि द साठी एकच अक्षर आहे. तमिळमध्ये 'कातल' लिहिले तर उच्चारी कादल होते. कातल असा उच्चार हवा असेल तर दोन वेळा त लिहावा लागेल. (तोच तमिळ शब्द आपण कात्तल असा वाचू). त्यामुळे वर नाईल यांनी म्हटल्याप्रमाणे असे त्रांगडे निर्माण झाले असावे.

याच्या बरोबर उलट गोष्ट 'स/श' ची आहे. स, श आणि च हे एकाच अक्षरखुणेने दाखवले जातात. जर एका शब्दात ती खूण दोनदा आली तर च नाहीतर सदैव स. त्यामुळेच विश्वनाथन आनंदचे Viswanathan असे लिहिले जाते. Sriniwas चीही तीच गत.

ही सगळी ऐकीव/वाचीव माहिती आहे. तेव्हा चूभूद्याघ्याचे शेपूट जोडणे आवश्यक आहे. कोणी जाणकार व्यक्तीने याबाबत अधिक लिहिले तर वाचायला आवडेल.

थोडे अवांतर - यावरून अविनाश बिनीवाले लोकसत्तेत एक सदर लिहायचे त्याची आठवण झाली. गोव्यात असताना कामत आडनावाच्या व्यक्तीशी मराठीत बोलायचे की इंग्रजीतून असा त्यांना प्रश्न पडे, कारण काहींना मराठी समजते आणि काहींना अजिबात नाही असा त्यांचा अनुभव होता. अखेरीस थोड्या निरीक्षणाने Kamat असे स्पेलिंग लिहिणारे ते गोवेकर आणि बर्‍यापैकी मराठी समजणारे आणि Kamath लिहिणारे ते कारवारी/मंगळुरी आणि बव्हंशी मराठी न येणारे अशी खूणगाठ त्यांना मारता आली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

3 May 2009 - 2:21 pm | निखिल देशपांडे

नंदन ने वर म्हटल्या प्रमाणे "काना काया क्या?" हा प्रश्न माझा मित्र गाना गाया क्या?? असा विचारतो
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

भडकमकर मास्तर's picture

3 May 2009 - 7:43 pm | भडकमकर मास्तर

"काना काया क्या?"
सत्या सिनेमात सत्याचे काम करणारा नट ...( नाव नेमके विसरलो ) ... ," मैं विद्या को लेके कंडाला गया ता" (अशी सिनेमात बरीच क क क ची मजेशीर वाक्ये होती..) .... तो असे का बोलतो असा प्रश्न पडत असे.. नंतर याची उत्तरे मिळाली...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

अजय भागवत's picture

3 May 2009 - 12:51 pm | अजय भागवत

नाईल व नंदन ह्याच्याशी सहमत.

विषयांतर होते आहे पण विषयात साधर्म्य आहे म्हणून प्रतिसाद दिलाय-
उत्तर भारतात काही भाषिकांना "व" उच्चार करता येत नसल्यामुळे "वंग देशा"चे "बंग- बंगाल" झाले; सौरव चे सौरभ झाले. काहीवेळा ईंग्रजांनी (?) प्रचारात आणल्यामुळेही नावांचे स्पेलिंग बदलले व तेच ग्राह्य धरले जाते- टागोर- ठाकूर हे प्रसिद्ध उदाहरण. मुळात भारत हाच शब्द वर्त- वगैरे शब्दाचा अपभ्रंश आहे का असे वाटते.

आपल्याकडेही एखाद्याचे आडनाव जळगाव्कर असेल तर ते इंग्लिश मधे "जळगांनकर (Jalgaonkar)" असे लिहिले जाते. इतर भाषिकांना ते कसे वाचयचे हा प्रश्न नक्कीच पडत असेल.

नितिन थत्ते's picture

3 May 2009 - 2:26 pm | नितिन थत्ते

उत्तर भारतात र आणि ड चा असाच घोळ असतो.
गुरगाव /गुडगाव

तसाच प्रकार जगातील बहुतेक भाषांमध्ये य आणि ज मध्ये असतो.
यजमान / जजमान
यादव / जादव (जाधव?)
जेशू / येशू

खराटा
(रंग माझा वेगळा)

अजय भागवत's picture

3 May 2009 - 2:55 pm | अजय भागवत

अरे हो, तो "र" आणि "ड" चा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. आडनावात तर फार प्रभावी आहे-
कपूर = कपूड (आडनावाचा खरा शब्द)
कक्कर = कक्कड (आडनावाचा खरा शब्द)

जाताजाता एक पी. जे.-

इंग्रज माणूस घोड्यावरुन जात असता संध्याकाळच्या सुमारास एका अनोळखी गावाजवळ पोहोच्ला. गावाच्या बाहेर एक माणूस त्याला डोक्यावर गवताची मोळी घेऊन जाताना दिसला. त्याला त्याने विचारले, "पुढच्या गावाचे नाव काय आहे".
त्या गरीबाला अर्थातच त्याचा इंग्लिश मधला प्रश्न कळला नाही व त्याने अंदाजाने उत्तर दिले, (असे वाटून की, घोडा थकला-भुकेला असेल म्हणून गवताची मोळी हवी असेल आणि ताजे गवत आहे का असे विचारत असेल), "कल काटा"...
त्यादिवशी पासुन त्या गावाचे नाव कलकत्ता झाले!

प्रकाश घाटपांडे's picture

3 May 2009 - 12:47 pm | प्रकाश घाटपांडे

मराठीत ताठ आणि ताट दोन्ही साठी वापरलेल्या स्पेलिंग मधे एच मुळे फरक स्पष्ट होतो.एक अवस्था(?) तर दुसरी वस्तु. तोच 'तात' व 'ताट' मधे एच नसल्याने फरक असत नाही. पण अर्थात फरक आहेच. तरी इथे थ आणला नाही. अशा गमतीजमती भाषेत घडत असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

3 May 2009 - 12:57 pm | सहज

नाईल नंदन यांच्याशी सहमत.

अजुन एक मजा एका तामीळ लक्ष्मी नावाचे स्पेलींग मी पाहीलेले स्पेलींग होते - लेच्युमी - Letchumi तसेच गंगोत्री शब्दाचे Ghangothree

छोटा डॉन's picture

3 May 2009 - 8:08 pm | छोटा डॉन

नाईलरावांच्या आणि नंदनच्या प्रतिसादाशी सहमत असेच म्हणतो ...

दक्षिण भारतात म्हणण्यापेक्षा हा घोळ "कर्नाटकात" जास्त आहे, अर्थात कर्नाटकाच्या विवीध भागात विवीध भाषाशैली स्पष्टपणे वेगळी करता येते ...
बेंगलोरचे कन्नड, मेंगरुळी कन्नड आणि बेळगाव्/विजापुरी कन्नड ह्यात जमिन-आस्मानाचा फरक आहे ...
आत मला डिटेल भाषा आणि वर्णाक्षरे ह्यबद्दल जास्त माहित नाही परंतु श्राव्य माध्यमातसुद्धा हा फरक जाणवण्याइतका आहे हे नक्की, आम्ही तुर्तास माणुस नक्की कुठल्या भागातली कन्नड बोलतो आहे हे ओळखण्यापर्यंत प्रगती केली आहे.

बाकी तो "त" आणि "थ" चा घोळ आहेच ...
ह्यामुळे इथे जेव्हा आपण एखादे बँक अकाउंट वगैरे उघडतो तेव्हा लक्ष्द्यावे लागते अन्यथा काय होईल हे सांगता येत नाही ....

अवांतर :
एक किस्सा, आमच्या आस्थापनात एका प्रेझेंटेशन दरम्यान एका महाभागाने "Maruti Motors"चे स्पेलिंग रिवाजाप्रमाणे " H ( उच्चारी हेच्च )" अधिक वाढवल्याने "Maruthi Motors" असे केले होते व आमची ज्याम दांडी उडवली होती.
त्यानंतर त्याने काही डाऊट आहे का असे समारोपाला विचारले असता आम्ही "मारुतीचे" स्पेलिंग हे "Maruti" असे असावे न की "Maruthi" असे सांगुन त्यांचा बोल्ड काढला होता. असो.

अतिच अवांतर :
कन्नड भाषा फार गोड आहे हो, फक्त बोलणारा तसा हवा. काही स्पष्ट आणि सुश्राव्य कन्नड उच्चार तुम्हाला अक्षरशः (भाषेच्या) प्रेमात पाडतात...
खास करुन एखाद्या स्त्री ने कुणाला आदरार्थी हाक मारताना अथवा संबोधन वापराताना जोडलेले "री ऽऽऽऽ" , आहाहा; अक्षरशः कातील शब्द आहे का पण तो खास ढंगात ऐकायला हवा ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

Nile's picture

3 May 2009 - 8:16 pm | Nile

बंगळुरच्या वास्तव्यात आम्ही थोडे फार कानडी शिकलो त्यात कन्नडा बरदुल्ला हे सर्वात प्रिय!

कानडी भाषा ही तामीळ, तेलगु पेक्षा नक्किच कर्णमधुर आहे, विशेषतः रेल्वे स्थानकावर जेव्हा ति (रेकॉर्डेड) निवेदिका गाडी क्रमांक सांगते ते.. इरदु.. वन्दु.. नालु..

नितिन थत्ते's picture

3 May 2009 - 8:28 pm | नितिन थत्ते

कानडीत उकारान्त शब्द म्हणण्याची पद्धत आहे काय?
विठ्ठलु कर्नाटकु, तयाचा वेलु गेला, किंवा एकु एकु अवयेवु वगैरे मराठीतील उल्लेख त्यामुळे आले आहेत का?

खराटा
(रंग माझा वेगळा)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2009 - 12:40 am | बिपिन कार्यकर्ते

कन्नड भाषेत एकारांत शब्दांची पद्धत आहे.

साधने = साधना
आराधने = आराधना
पूजे = पूजा
मने = घर
कन्नडा रक्षणा वेदिके

इत्यादी.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

4 May 2009 - 12:46 am | नंदन

उकारान्त प्रभाव हा कानडीपेक्षा तेलगूचा आहे, असे वाचल्याचे आठवते. सध्याच्या तेलगूतही हे उकार टिकून आहेत. अगदी इंग्रजी शब्दांना उ/ऊ जोडून त्यांचा संभाषणात वापर होतो (स्टार चे स्टारु इ.).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चिरोटा's picture

4 May 2009 - 1:32 pm | चिरोटा

तेलुगु नावांमधेपण त्याचा प्रभाव दिसतो. श्रिरामुलू,कलतुरु,धरमारावू,ईश्वरावू ही नावे तेलुगुच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2009 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते

मला तर तमिळ पण कर्णमधुर वाटते. ऐकायला त्रास होतो अशी एकच भाषा मला वाटली आत्तापर्यंत... मल्याळम. ते एवढे फास्ट बोलतात (सगळेच नाही पण बहुतेक दक्षिण केरळातले) की थोड्या वेळाने डोके दुखायला लागते. :(

ബിപിന കാര്യകര്തേ

सायली पानसे's picture

4 May 2009 - 1:11 pm | सायली पानसे

माझ्या इतक मल्लु तु पण ऐकला नसशिल रे बिपिन दादा.... पण तरि मल्लु तरि सुसह्य होता पण तमिळ मधले प्रेमाचे संवाद ऐकुन भांडत आहेत का काय असच वाटत बघ.
मल्लु त्यामानाने बर .

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2009 - 2:05 pm | बिपिन कार्यकर्ते

वर नंदनने लिहिले आहे ते बव्हंशी बरोबर आहे. तमिळ भाषेत महाप्राणमिश्रित व्यंजनांची नेहमीच गल्लत होते. पण हे फक्त तमिळ पुरतेच आहे. बाकी दक्षिण भारतीय भाषांमधे मात्र अशी गल्लत फक्त तमिळ भाषेच्या प्रभावामुळेच होते.

कन्नड भाषेत / लिपित ब आणि भ, क आणि ख, ज आणि झ, ट आणि ठ, त आणि थ, ग आणि घ इत्यादी महाप्राणयुक्त व्यंजनं आहेत. किंबहुना कन्नड बाराखडी ही मराठी बाराखडीशी १००% जुळते. फक्त लिपि वेगळी. असे असून सुद्धा दक्षिण कर्नाटकात (जिथे तमिळचा प्रभाव किंवा मैसूरचा प्रभाव म्हणू आपण) जास्त आहे तिथे इंग्रजीमधे बारथ, सुजाथा, कविथा, थारामथी वगैरे लिहिले जाते. पण तीच नावे कन्नडमधे मात्र भारत, सुजाता, कविता, तारामती अशीच असतात आणि तशीच उच्चारली जातात. (अपवाद ब आणि भ चा. भारत हा बारत होतो.) गंमत म्हणजे उत्तर कर्नाटकात (ज्याला निझाम स्टेट कर्नाटक असे म्हणतात) तिथे मराठीचा प्रभाव खूपच जाणवतो. बरेचसे शब्द तर जसेच्या तसे वापरले जातात. मावशीला 'मावशी'च म्हणतात. आणि या भागात नावांची इंग्रजी स्पेलिंग्ज आपल्या सारखईच लिहितात आणि उच्चारली जातात. माझा एक गुलबर्ग्याचा मित्र, कानडीभाषिक, बंगलोरसाईडच्या भाषेला आणि उच्चारांना जाम वैतागतो. (आमच्या सोलापूरला वगैरे मराठीत कन्नड तेलगू शब्दही अगदी बेमालूम मिसळले जातात. एखादी वस्तू हरवली तर आम्ही ती हुडकतो, शोधत नाही. आणि घट्ट वरणाला 'मुद्दा वरण' म्हणतात.) मागे एकदा एका तमिळ मित्राने तमिळ लिपित गांधी आणि कांती हे शब्द जवळपास सारखेच आहेत असे सांगितले होते.

मल्याळम मधे पण ही समस्या बर्‍याच प्रमाणात आहे. माझा एक मित्र मला घीर (खीर) करायला सांगत होता एकदा. 'काना काया क्या?' वगैरे तर नेहमीचेच आता.

तमिळ मधे ह आणि ग चा एक महान गोंधळ आहे. महेश हा नेहमी मगेश असतो. माझा एक तमिळ बॉस (मुंबई मधे असताना) आमच्या मोहे (मोघे) नावाच्या सहकार्‍याच्या जेवणाच्या डब्यातले कांदेपोगे (पोहे) खायला टपलेला असायचा. ;)

ಬಿಪಿನ ಕಾರ್ಯಕರ್ತೇ

टारझन's picture

3 May 2009 - 2:37 pm | टारझन

तमिळ मधे आणि चा एक महान गोंधळ आहे.

=)) =)) ह्या माणसाला जोराची गगायला आल्यावर काय करेल मग तो ? =)) =))

जाऊण्दे बॉ .. आम्हाला तर अजुन "ण" आणि "न" मधेच सांभ्रम आहे .

- टारजण

मिलिंद's picture

3 May 2009 - 8:07 pm | मिलिंद

ह्या माणसाला जोराची गगायला आल्यावर काय करेल मग तो ? =))

हसुन हसुन लवट्या (लोट्या हातात घ्यायची वेळ आली की - लवट्या
=)) =)) =)) =)) =)) =))

यन्ना _रास्कला's picture

6 May 2009 - 2:09 pm | यन्ना _रास्कला

टालुताइने आक्शेप घेत्ला म्हनुन माझा लेख काडला मग हा प्रतिसाद बरा चाल्तो सगल्याना. याला इरोध नाय का?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

श्रावण मोडक's picture

3 May 2009 - 7:56 pm | श्रावण मोडक

कानडीत बाराखडी आहे की चौदाखडी? ए, दीर्घ ए, ओ, दीर्घ ओ असा काहीसा प्रकार आहे, असे शिकल्याचे आठवते.
ಶ್ರಾವಣ ಮೋಡಕ
ਇਤਰ ਲਿਪੀ ਮਲਾਹੀ ਲਿਹਿਤਾ ਯੇਤਾਤ.

तिमा's picture

3 May 2009 - 2:06 pm | तिमा

त ला थ म्हणणे ही सर्वच दक्षिणी लोकांची सवय आहे. त्यात इंग्रजी स्पेलिंग चा संबंध कुठे आला ?
तसेच ते लोक इंग्रजी एच या अक्षराचा उच्चार हेच् असा करतात त्यावर मिपाकरांचे मत काय?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सँडी's picture

3 May 2009 - 2:28 pm | सँडी

आमचा एक कानडीजन (आग्रह करुन)जेवन वाढताना माझ्यासारख्या गोर्‍यागोंमट्या प्राण्याला 'काले काले' का म्हणायचा हे आज समजले... ;)

-सँडी
काय'द्याच बोला?

कॉलेजला असताना रुम पार्टनर बंगाली होता. त्याला आम्ही विचारयचो - क्या रे मराठी आता है क्या तुझे? तोही म्हणायचा - "थोरा - थोरा". प्रत्यक्षात त्याला ड, ळ अशी अक्षरे उच्चारताच यायची नाहीत. त्याचे थोरा - थोरा उत्तर आले की आम्ही त्याला जळगांव म्हण, धुळे म्हण असे सांगायचो, तोही बापडा - जलगाँव, धुरे असे म्हणायचा. मिलिट्री कॉलेजला असल्याने मिलिट्री ट्रेनिंग घेणारे बगडे सर तुला बोलावतायत असा निरोप द्यायचो आम्ही त्याला. तो बगडे सरांचे - बघरे सर असे उच्चारायचा. सरही असे नामकरण ऐकून वैतागायचे. आम्ही फार ताणले की बंगाली बाबू मराठी बोलणे तेवढ्या वेळापुरते सोडून द्यायचा.

(भाषाभ्रमिष्ट) मिलिंद

Nile's picture

3 May 2009 - 8:34 pm | Nile

भाषा हा आमचा सर्वात आवडता विषय (मार्कांची व्याजाबरोबर नसताना) असल्याने आम्हालाही काही किस्से सांगणे आवरत नाही आहे.

चैन्नईत प्रथमच, बंगाली room mate (senior) जेवण बनवत होता, पहिलाच दिवस असल्याने मि फक्त बघ्याची भुमिका करत होतो. इतक्यात तो मला "ऑडे जॉक्ये क्वॉड तो लॉना" म्हणाला, मि म्हट्ले बरं आणतो पण कुठ्ली कॉर्ड ते तर सांग? तो: "आडे क्वॉड, क्वॉड". मि क्षुंभासारखा तिथेच. मग तो: क्वॉड, क्वॉड, डोही डोही! मि कपाळावर हात मारला आणि दही आणायला बाहेर पड्लो!

उत्तरेतल्या लोकांचा तर आम्ही व आणि ळ ने छळ मांड्ला होता, मजा यायची!

असो, मुळ मुद्दा: आता भारत नाव बरोबर का नाही हे नावाचा उगम शोधला तर कळेलच आणि इच्छुकांसाठी नविन धागा! ;)

नेटकिडा's picture

3 May 2009 - 9:00 pm | नेटकिडा

माझा एक मित्र (झारखंडचा बहुतेक), एक मराठी मित्र आणि मी असे तिघे सकाळी नाष्त्याला जात असू. आमचा टिम लिडर आमच्याबरोबर येत नसे.. त्यावर आमचा हा झारखंडचा मित्र म्हणत असे 'अरे वो घर से ही सेव लेके आता है और चक्कू भी लाता है. और चक्कू से सेव काटके खाता है." आम्ही गार.. भेळेतली शेव खायला चाकू कशाला पहिजे. :?
एक दिवस पाहिले आमचा टिम लिडर सफरचंद चाकूने कापून खात होता. तेव्हा आम्हाला सेव आणि चक्कू चा अर्थ समजला आणि आमची हसता हसता पूरेवाट झाली. आमचा मित्र सेब (सफरचंद) ला सेव म्हणत होता. :))

याबद्दल राज्यघटनेने निर्देश दिला आहे.

राज्यघटनेचे इंग्रजी मसुदा उपलब्ध आहे त्यात "India, that is Bharat..." असा शब्दप्रयोग आहे.

या विशिष्ट राज्यघटनेने ज्या देशा-राष्ट्राचा उल्लेख केलेला आहे, त्या देशाचा संदर्भ इंग्रजीत द्यायचा असेल, तर "Bharat" असा लेखी उल्लेख करणे सर्वात योग्य. नजरचुकीने लेखी चुका होतात, तो काही फार मोठा गुन्हा नाही. पण काळजीपूर्वक लिहिताना "Bharat" असे लिहिलेले बरे.

बाकी, इंग्रजी स्पेलिंग कसे असावे, याबाबत भारतातीत विविध प्रदेशातील संकेत हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी ठीकच आहेत. भारतातील विविध भाषांमध्ये काहीकाही उच्चाराच्यासुद्धा विशेष लकबी आहेत. (त्यात मराठी भाषकांना काही उच्चार जमत नाहीत, तेही आलेच. पंजाबी भाषकांना इतर काही उच्चार जमत नाहीत. तमिऴ भाषकांना त्याहून वेगळे काही उच्चार जमत नाहीत.)

म्हणूनच सध्या चालू असलेले जे/जो प्रजासत्ताक राष्ट्र-देश आहे, त्याच्या नावाचा उच्चार प्रादेशिक भाषांत वेगवेगळ्या प्रकारात होत असतो. हे योग्यच आहे. अनेक प्रादेशिक भाषांना "राष्ट्रभाषा" दर्जा आहे. त्यामुळे अमुक भाषेतला उच्चार तमुक भाषेतल्या उच्चारापेक्षा बरोबर असे म्हणता येत नाही.

(उदाहरणार्थ : मराठी [ही एक ऑफिशियल राष्ट्रीय भाषा आहे] भाषक लोक "भारत्" असा उच्चार करताना ऐकू येतात, तर संस्कृत, उडिया [या दोन अन्य ऑफिशियल राष्टीय भाषा आहे] या भाषांत "भारतऽ" असा शेवटचा 'अ' स्पष्ट उच्चार करायची लकब आहे. पैकी मराठी भाषकांनी उच्चार बदलला पाहिजे, किंवा उडिया भाषकांनी उच्चार बदलला पाहिजे असे म्हणणे ठीक नाही. त्या-त्या भाषेत तसा-तसाच उच्चार करावा, हे सुज्ञ धोरण आहे.)

मृदुला's picture

4 May 2009 - 5:00 am | मृदुला

पुष्कळ इंग्रज लोकही एचला हेच् म्हणतात!

श्रीकृष्ण सामंत's picture

4 May 2009 - 7:16 am | श्रीकृष्ण सामंत

त की थ? यात "अरे हो, तो" ह्या प्रतिक्रियेवरून अजय भागवतांच्या "कलकत्ता" च्या विनोदावरून मला पण "भाषेतला गैरसमज" म्हणून एक किस्सा सुचला.
एका मराठी मुलाचं कानडी मुलीशी लग्न होऊन तो लग्नानंतर तिच्या बरोबर त्याच्या सासरवाडीला कर्नाटकला जायला निघाला.गाडी कर्नाटकात शिरल्यावर सर्व स्टेशनांच्या नावांच्या पाट्या कानडीत होत्या. गाडी पहिल्या स्टेशनवर थांबली त्या स्टेशनचं नाव काय? म्हणून आपल्या पत्नीला त्याने विचारलं.त्याला कानडी येत नव्हतं आणि तिला मराठी समजत नव्हतं.
तिने त्याला कानडीत उलट प्रश्न केला
"येन इत्तरे?"-काय विचारता?
त्याला वाटलं त्या स्टेशनचं नाव "येन इत्तरे" असेल.
दुसर्‍या स्टेशनवर गाडी थांबल्यावर त्याने तिला तोच प्रश्न केला
"ह्या स्टेशनचं नाव काय?"
तिला ही प्रश्न कळला नाही म्हणून तिने त्याला परत विचारलं
"येन इत्तरे?"
त्याला वाटलं कदाचीत ह्या ही स्टेशनचं नाव "येन इत्तरे बुद्रुक "असेल.आपल्याकडे पण एकाच नावाची दोन गावं असतात आणि एक गांव बुद्रुक असतं.
तिसरं स्टेशन आल्यावर त्याने तोच प्रश्न केला.
तिने पण मराठी कळत नसल्याने
"येन इत्तरे?"-काय विचारता? असं वैतागून विचारलं.
त्यालाही आता ते ऐकून खूप राग आला.तिन्ही स्टेशनची नावं "येन इत्तरे" कशी असतील.
आणि तो तिला मारायला लागला.
तो मारतोय असं पाहून ती कानडीत म्हणाली,
"येन माडती?,येन माडती?"-कां मारतां,कां मारतां?
हे ऐकून तो तिला म्हणाला,
"असं म्हण! सर्वच स्टेशनांची नावं "येन इत्तरे " कशी असतील?"
ह्या स्टेशनचं नाव "येन माडती" असणार नां?

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चिरोटा's picture

4 May 2009 - 10:34 am | चिरोटा

त ला थ म्हणणे ही सर्वच दक्षिणी लोकांची सवय आहे. त्यात इंग्रजी स्पेलिंग चा संबंध कुठे आला ?

त ला थ म्हणत नाहीत्(कर्नाटकातले लोक तरी). त ला तच म्हणतात्. इंग्रज लोकांच्या सोयीसाठी हे केले होते असे मला एकाने सांगितले.
उ.दा. अमित चे इंग्रजी स्पेलिन्ग Amit. ह्याचा उच्चार गोरा साहेब(किंवा भारतिय शब्दांशी अपरिचीत असा माणूस) अमिट असा करेल्.तो अमित असाच करावा म्हणून Amith असे लिहायचे.त्याच प्रमाणे गोरा साहेब शांती चा उच्चार शांटी असा करु नये म्हणून Shanthi असे लिहायचे.
त आणि ट/ द आणि ड ह्यातला फरक गोर्‍या साहेबाला कळण्यासाठी तसे लिहिले जाते.

तसेच ते लोक इंग्रजी एच या अक्षराचा उच्चार हेच् असा करतात त्यावर मिपाकरांचे मत काय?

विचारून सांगतो्. असा उच्चार जास्त करून कन्नड आणि तेलुगु भाषिक करतात.तामिळ किंवा मल्याळम भाषिक सहसा करताना दिसत नाहीत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न