झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
24 Apr 2009 - 7:37 am

(विडंबन)
आज सकाळी ट्रेड्मीलवर व्यायाम करीत होतो.कानाला इयरबड्स लावून आयपॉडवर हिंदी
सिनेमानतली गाणी ऐकत होतो.
"झुमका गिरा रे बरेलीके बाजार मे"
हे गाणं कानावर पडून मनात दुसरेच शब्द गुणगुणायला लागले "झुणका खाल्ला रे "आणि नंतर त्या मुळ गाण्याचं विडंबन केल्यावाचून मला राहावेना.मग म्हटलं लिहायचंच.लिहिता लिहिता शब्द सुचत गेले.आणि गाणं तयार झालं.

झुणका खाल्ला रे
हाय
झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे
झुणका खाल्ला झुणका खाल्ला झुणका खाल्ला
हाय हाय हाय तिखट झुणका खाल्ला रे

सख्या आला नजर चुकवून खोलीत चोरी चोरी
म्हणे मला ये भरवतो तुला माझ्या लाडक्या पोरी
मी म्हणाले नको करू रे कसली तरी बळजोरी
किती विनवीले तरी सख्याने केली मला जबरी
हाय केली मला जबरी

मग काय झालं?

मग? मग झुणका खाल्ला रे दोघांच्या मर्जीमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे

गच्चीवर मी उभी अन खाली सख्याची गाडी
हंसत बोलला ये ग! खाली नेसून रंगीत साडी
फेक तुझी आंगठी किंवा दे सल्ल्याची निशाणी
गच्चीवरती उभी उभी मी शरमूनी झाले पाणी
हाय शरमून झाले पाणी

मग काय झालं?

देवाss! मग झुणका खाल्ला रे दोघांच्या प्रीतिमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे

बगीच्यामधे प्रियाने माझी घेतली एक फिरकी
पदर माझा ओढून म्हणतो मनात माझ्या भरली
नजर फिरवूनी मी पण तेव्हा गप्प जरा राहिली
हाय गप्प जरा राहिली
नजर वळवूनी गप्प राहूनी हळूच मी हंसली
सजणाशी मग छेडूनी मजला झाली हाथापायी
हाय झाली हाथापायी

मग काय झालं?

मग? झुणका खाल्ला रे मी सांगू कसं ते शब्दांमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 7:53 am | विसोबा खेचर

ज ब रा...!

अरे माझ्या म्हातार्‍या श्रीकृष्णा, मानला रे बाबा तुला! :)

तात्या.

उदय सप्रे's picture

24 Apr 2009 - 11:32 am | उदय सप्रे

छान आहे !

उदय सप्रे's picture

24 Apr 2009 - 11:32 am | उदय सप्रे

छान आहे !

कपिल काळे's picture

24 Apr 2009 - 5:26 pm | कपिल काळे

आयुष्य, दु:ख, तत्वज्ञान वगैरे जड गोष्टींवर लिहिणारे सामंत काका असली विडंबने ही हाताळू शकतात हे माहित नव्हते.
सिद्धहस्तांच्या यादीत त्यांचे नाव कसे नाही?

जियो सामंत काका.

पिकल्या पानाचा देठ की हिरवा..

क्रान्ति's picture

25 Apr 2009 - 8:48 am | क्रान्ति

खरंच सामंतकाका, अग्दी आश्चर्याचा धक्का बसला! विडंबन खासच झालं आहे.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2009 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll

छान रसपूर्ण विडंबन..

>>सजणाशी मग छेडूनी मजला झाली हाथापायी
हाय झाली हाथापायी
इथे हाथापायी हा हिंदी शब्द उगाचच घुसडल्यासारखा वाटतो.
(

त्याऐवजी झोंबाझोंबी कसा वाटला असता?
सजणाशी मग छेडूनी मग झाली झोंबाझोंबी
हाय झाली झोंबाझोंबी

हे कसे वाटते? :)
)

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

टारझन's picture

26 Apr 2009 - 1:59 am | टारझन

आर्रे ए पेशव्या .. मेल्या कुठे ही कसले प्रतिसाद काय देतो बे ?

सामंतकाका ... जबरा आहे हो विडंबण .. कसं चांगलं सुचतं लोकांना..च्यायला आम्हाला बाकी हिणकसच विडंबणं सुचत्यात .. त्यापायी ६ विडंबणं लिहीलेली डिलीट केली .. आता उरलो नावापुरता .. ... बाकी आम्हाला तुम्ही अजुन ट्रेडमिलावर पळता हे पाहून अजुन जोष येतो ...
तुमचा फिट न फाईन फोटू डकवा बॉ एकदा .. तुमचे दर्शन होवो :)

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Apr 2009 - 11:04 pm | श्रीकृष्ण सामंत

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
कपिल,
माझा उद्या प्रकाशित होणारा,
"असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं."
हा लेख जरूर वाचावास.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

26 Apr 2009 - 12:29 am | प्राजु

फुल्ल्टू!!!! जबरदस्त!
सुचलं कसं झुणक्याबद्दल?? :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Apr 2009 - 9:49 am | श्रीकृष्ण सामंत

झुमका,झुमका,झुमका गिरा रे
त्यावरुन झुमक्या ऐवजी झुणका शब्द मनात आला.
आणि मग झुणका म्हटल्यावर तो खाल्ला पाहिजे . झुणका खाल्ला रे सुचलं. आणि मग बरेली ऐवजी बोरिवली सुचलं आणि मग ... ओघा ओघाने आलंच सगळं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2009 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त !

यशोधरा's picture

26 Apr 2009 - 9:58 am | यशोधरा

मस्त!