मी बनवलेला ब्रेड..

मितालि's picture
मितालि in पाककृती
19 Apr 2009 - 9:51 am

मिसळपावर या आठवड्यात प्रकाशित झालेली दिपाली ताईची ब्रेडची मस्त पाककृती वाचुन मी ब्रेड बनवायला घेतला. (थॅन्क्स टु दिपालि...)

सुरुवात अगदी मैदा, यीस्ट खरेदी पासुन होती..दुकानात जाउन सर्व सामन आणले.. (परदेशी भारतीयांच्या साठी : - मैद्याला ऑल परपज फ्लॉअर म्हणतात.. )

पिठ मळताना पाणी जास्त झाले..मैदा घालुन कसे तरी एकदाचा गोळा बनवला...(प्रयत्ने वाळुचे कण रगडता तेलही गळे...)

मग १ तास झाकुन ठेवला... पण काय तो डबल होइना.. कदाचित माझे यीस्ट मेलेले तर नव्हते ना अशी शंका आली...परत एकदा मिपावर रेसिपि पहिली...
१५-२० मिनिटे टाइमपास केला.. मग जाउन पाहिले तर पिठ मस्त फुगुन आलेले..कदचित पातळ झालेले पिठ ठिक करण्याच्या नादात मैदा जास्त झाला असेल

असो... आता पुढे गोळे बनवायच.. म्हटलं जरा वेगळा आकार देऊ.. रेसिपी शो मध्ये पाहिलेला आकार दिला छानसा..

परत अर्धा तास ठेवायचा.. अरे देवा.. ब्रेड सोबत चिकन करि तर बनऊन पण झालेली.. नाही जुळला ब्रेड तर... जाउदे चिकन करि सुप म्हणुन पिउ अजुन काय..
चला ..तोवर मिपावर टाइमपास ... आणि सन्त्रि..

शेवटी प्रयत्नान्ती परमेश्वर म्हणतात ते यालाच..ओवन मधुन तयार होऊन आलेला.. गरमा गरम ...स्वतः बनवलेला.. पहिला पहिला ब्रेड ... अहाहा...

जरा कडक बनलाय वरुन.. पण चवीला खुप छान आहे.. शेवटी कसाही असला तरी तो स्वतः बनवलाय याला महत्व आहेच ना..
ते पण ३ तास खपुन (त्यातले २.५ तास सिनेमा , मिपा असा अनेको प्रकारे टाइम्पास करुन ..)

आणि सोबत चिकन करी .. म्हणजे सुवर्ण कांचन योगच...

सोबत कोल्ड टी.. थाई टी स्टाएल.. (खरच चहा आहे.. नो अल्कोहोल ..)

ही थाई टी मी एका रेस्टोरन्ट मधे प्यायले होते.. खरे तर थाई टी साठि थाई टि पावडर लागते.. आणि बारिक ऊंच ग्लास.. हे दोन्हि हि माझ्याजवळ नव्हते..
आवडली म्हणुन साध्या चहा पासुन बनवते... साध्या चहा पासुन एवढी खास नाहि बनत.. पण मला आवडलि अशी पण..

चहा पावडर आणि साखर घालुन गोडसर चहा बनवुन घ्यायचा.. तो फ्रिज मधे थेउन खुप थंडगार करुन घ्यायचा..
बारिक ऊंच ग्लासात पाऊण ग्लास भर हा चहा घेउन वर बर्फाचे ४-५ खडे घालायचे ..
वरुन हल्केच half-and-half क्रिम घालावे (दाटसर क्रिम असते .. नोर्मली कॉफि साठी वापरतात) .नसेल तर दुध पण चालेल..
जस जसे हे क्रिम मिसळत जाइल तस तश्या छान रंगचछटा दिसु लागतात...

सुरुवातीला लिहिल्या प्रमाणे पाणी आणि मैदा यांच गणित चुकल्यामुळे खुप जास्त पीठ बनलेले... म्हणुन गोल ब्रेड पण बनवले..

जरा कडक झालेयत वरुन.. ब्रेकफास्ट साठि स्ट्रॉबेरि जॅम सोबत परफेक्ट..

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

19 Apr 2009 - 10:32 am | क्रान्ति

सगळे फोटो मस्त आलेत. पावाचा आकार खूप आवडला.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2009 - 10:43 am | स्वाती दिनेश

मस्त दिसतो आहे ग ब्रेड.. आणि फोटू भारीच आलेत.
यशस्वी प्रयोगाबद्दल अभिनंदन! :)
स्वाती

दिपाली पाटिल's picture

19 Apr 2009 - 11:59 am | दिपाली पाटिल

मस्त च दिसतोय ब्रेड. हे वेणी घातल्या प्रमाणे केलं आहे बहुतेक.. :)

दिपाली

मितालि's picture

19 Apr 2009 - 12:09 pm | मितालि

हो.. वेणी सारखा करायचा..

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 12:23 pm | नितिन थत्ते

छान वर्णन आणि फोटो. चव घ्यायला मिळाली नाही.

थाई स्टाइलच्या चहाची कृती लिहावी.

(चहाबाज) खराटा
(रंग चहाचा वेगळा)

मितालि's picture

19 Apr 2009 - 1:14 pm | मितालि

लिहिली..

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 1:22 pm | नितिन थत्ते

या आठवड्यात घरी गेल्यावर करून पाहीन.
ग्रीन टी चालेल का?

(कुठल्याही प्रकारचा आणि क्वालिटीचा चहा पिऊ शकणारा, चहाबाज) खराटा

मितालि's picture

19 Apr 2009 - 1:25 pm | मितालि

नाही माहित मला..

नितिन थत्ते's picture

19 Apr 2009 - 1:46 pm | नितिन थत्ते

दोन्ही प्रकारे करून बघीन आणि सांगीन.

खराटा
(रंग माझा वेगळा)

भडकमकर मास्तर's picture

19 Apr 2009 - 12:56 pm | भडकमकर मास्तर

उत्तम फोटो ..
मजा आली वाचून आणि पाहून...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

19 Apr 2009 - 1:08 pm | मदनबाण

सहमत... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रेवती's picture

19 Apr 2009 - 5:42 pm | रेवती

मस्तच दिसतोय ब्रेड!
वेणी घातल्यासारखे दिसण्यासाठी काय केले?

रेवती

मितालि's picture

19 Apr 2009 - 11:47 pm | मितालि

३ भाग करायचे आणि लांब रोल करायचे .. बोर्डवर समांतर ठेवायचे आणि चक्क वेणी सारखे बनवायचे...

रेवती's picture

20 Apr 2009 - 6:44 am | रेवती

ओक्के.
आता करून पाहीन.

रेवती

चकली's picture

19 Apr 2009 - 7:59 pm | चकली

सगळा बेत जमलेला दिसतोय.

चकली
http://chakali.blogspot.com

संदीप चित्रे's picture

20 Apr 2009 - 2:57 am | संदीप चित्रे

चिकन करीसारखी मैत्रीण मिळाल्याने ब्रेड अजूनच चवदार झाला असेल :)

मितालि's picture

20 Apr 2009 - 6:24 am | मितालि

खर सांगायच तर चिकन करि ब्रेड पेक्षा छान झालेली...

सँडी's picture

20 Apr 2009 - 6:52 am | सँडी

सगळे फोटो मस्त!

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विसोबा खेचर's picture

20 Apr 2009 - 10:20 am | विसोबा खेचर

अप्रतिम..

तात्या.

काजुकतली's picture

20 Apr 2009 - 11:31 am | काजुकतली

मिताली, मस्तच धमाल केलीस गं....

मी सुद्धा काल, तु दिलेली एग बिर्याणि बनवली. फक्त स्वाती राजेश यांच्या कोलंबी भातात सांगितल्याप्रमाणे, भात पाण्यात शिजवण्याऐवजी नारळाच्या दुधात शिजवला... काय बनली होती बिर्याणी.. आहाहा..... मलाही आश्चर्य वाटले...

माझ्या भावाला अगदी झणझणीत जेवण लागते, त्याला तिखट ही एकच चव कळते. पण काल खाताना बिर्याणी तिखट नसुनही तो इतक्या वेळा ' काय बनलीय, काय बनलीय' हे म्हणाला की शेवटी मलाच कंटाळा आला.. म्हटले बस झाले कौतुक आता.. :)

काजुकतली's picture

20 Apr 2009 - 11:32 am | काजुकतली

एक बाबो प्रश्न.. हाफ & हाफ क्रिम म्हणजे कसले क्रिम??

मितालि's picture

21 Apr 2009 - 5:19 am | मितालि

परदेशात दुधाचे अनेक प्रकार मिळतात.. तसे भारतात पण मिळतात.. फक्त आपण त्याना स्वतन्त्र नावे नाही दिलियत..

परदेशातिल १% मिल्क = अतिशय पातळ = दुधवाल्या भैयाचि ४ पैकि १ बरणी ओतुन गेली तर तो शिल्लक ३ बरणी दुधात पाणी मिसळुन ४ बरण्या दुध बनवतो तेव्हाचं..
परदेशातिल २% मिल्क = पातळ = दुधवाल्या भैया कड्चे नेहमिचे दुध..
होल मिल्क = यातुन मलई वेगळी केलेलि नसते.. ( मी अजुन नाही वापरलय कधी..)
परदेशातिल ३.२५% मिल्क = हे जरा मला योग्य वाटते.. चहा कॉफिसाठि.. दुधपिशवितील दुधाशी तुलना करता येइल..
हाफ & हाफ क्रिम = दाटसर आटवलेले दुध.. (इथे कॉफीसाठी हे वापरतात..)
व्हिपिन्गक्रीम= सायी सारख.. याला फेटुन व्हीपड क्रीम बनवतात..

अजुन काय तर विटामिन ई डी.. हजार प्रकार.. पण गरमा गरम स्पेशल चहा बनवावा असे एकही नाही...

दिपाली पाटिल's picture

20 Apr 2009 - 10:48 pm | दिपाली पाटिल

हाफ & हाफ क्रिम म्हणजे कसले क्रिम??

हे थोडे घट्ट दूध असते.

लवंगी's picture

21 Apr 2009 - 5:29 pm | लवंगी

नवरोबा पाठी लागलेत या विकांताला करुया म्हणुन.. आता मटण रस्सा आणी हा ब्रेड या विकांताचा बेत.

ठकू's picture

21 Apr 2009 - 5:34 pm | ठकू

ब्रेडचे फोटो अगदी देखणे आलेयंत. ब्रेड कधी बनवून पाहिला नाही मी पण मितालीपासून स्फुर्ती घेऊन एखाद्या सुटीच्या दिवशी हा घाट टाकायला हरकत नाही.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

रश्मि दाते's picture

7 Dec 2012 - 4:42 pm | रश्मि दाते

मस्त