९ < १० ==> नाईन इस लेस दॅन टेन हेच फक्त बरोबर आहे, कुठल्याही माध्यमात शिकला तरी. १० इस ग्रेटर दॅन ९ हे इंप्लाईड आहे, पण इथे चिन्ह ते दाखवत नाही.
अवांतर : कंपाइलर लिहिला आहे का कधी? किंवा अभ्यासला आहे का? हे असले सगळे फंडे क्लीअर होतात. एक चांगला प्रोग्रॅमर म्हणूनच बहुतेक वेळा खूप नेमके (प्रिसाईज) बोलतो.
जर मी a = 5 असे लिहीले तर डावीकडील अक्षरास मधल्या चिन्हामुळे उजवीकडील किंमत लागू होते हे स्प्ष्ट झाल्यानंतर गणितातील कोणतेही वाक्य/समीकरण डावीकडून उजवीकडे वाचायचे असते हे स्पष्ट होते (माझ्या माहितीनुसार अगदी उर्दु मध्ये सुध्दा गणिताच्या बाबतीत हेच अवलंबिले जाते). मी हे इतके जणांना विचारले आहे की शेवटी कंटाळून शिक्षकांना (विशेषतः गणिताच्या) विचारायला सुरुवात केली तेव्हाही तेच
इथे काय म्हणायचे आहे ते कळले नाही.
म्हणायचे असे की कोणतीही भाषा असो उजवीकडून वाचली जाणारी अथवा डावीकडून वाचली जाणारी..... पण गणित लिहिण्याची वेळ आली की भाषांचा नियम डावीकडून उजवीकडेच राहतो
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.
म्हणूनच मी अवांतर मधे लिहीले आहे, माझा दुखवायचा किंवा हिणवायचा हेतू नव्हता - एक निरीक्षण संगत होतो. गणितातच पुढे 'असोसिएटीव्ह' (मराठी माहित नाही, मी मराठी माध्यमात नाही शिकलो) वगैरे असते, तेव्हा डावीकडून उजवीकडे हे समजावले जाते असे वाटते, पण हे सगळे खर्या अर्थाने उमगते ते कंपायलर लिहितांना - मजा येते खरच! :)
: म्हणजे विसर्ग -- बरोबर आहे ना?
इथे खरं तर चिन्हांचा अर्थ लगेच समजतो पण थोडेसे ताणून असे विचारले की मी पहिले वाक्य टेन इज ग्रेटर दॅन नाईन असे वाचले तर चालेल का?
तर मराठी माध्यमातील शिकलेले लगेच सांगतात की चालेल किंवा दुसरे वाक्य नाईन इज लेस दॅन टेन असे वाचले तर चालेल का तर तेही हो असे उत्तर येते.
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे.
तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे :) . ह्या ऐवजी गणिताचे भाषीकरण करून मुलांच्या गोंधळात भर पाडणे होईल(गणिताच्या पेपरच्या वेळी कोणत्या भाषेचा पेपर सोडवू असे विचारल्यावर पंचाईत... वर पुन्हा गणिते+भाषा ५०/५० ला लावायचे का हा वेगळचा प्रश्न ;)).
--
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
मराठी माध्यमाचा संबंध असा की सेमी इंग्लिश माध्यम येण्याअगोदर १० वी पर्यंत लेस दॅन ग्रेटर दॅन च्या ऐवजी च्यापेक्षा लहान च्या पेक्षा मोठे हेच कानावरुन गेलेले असायचे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाअसते < हे चिन्ह लेस दॅन व > हे चिन्ह ग्रेटर दॅन असे फक्त माहिती असते, पण त्याचा वापर करताना डावीकडून उजवीकडे वाचले पाहिजे हे मात्र माहिती नसते.
खरंतर शाळेत (प्राथमिक/माध्यमिक) हे शिक्षकांकडून शिकविले गेले पाहिजे, पणत् यांच्यातच आनंदीआनंद आहे.
गणिताचे भाषीकरण करण्याची गरजच नाही कोणत्याही भाषेत गणित लिहिण्या - वाचण्याची पध्दत बदलत नाही, पण मराठी माध्यमातून शिकणा-या सर्वसामान्य विद्यार्थ्याला असे ज्ञान मिळत असेल तर का नाही बागुवबुवा होणार गणित आणि इंग्रजीचा??
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे Smile
>> 9 < 10 आणी 10 > 9
>> अनुक्रमे वाचले की नाईन इज लेस दॅन टेन व टेन इज ग्रेटर दॅन नाईन.
हे पटले.
सामान्यत: डावीकडून उजवी कडे वाचले जात असल्याने गणितातही तसेच होत असावे.
आम्ही आणि आमचे गणिताचे मास्तर, कंपाइलर न लिहितापण गणितात लै हुशार होतो,
आमच ही असच पण मास्तरा॑च नेमक आमच्या विषयी गणीत चुकायच..परिक्षेच्या येळेला..
सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
९ < १० हे समीकरण 'नऊ दहापेक्षा लहान' असे मराठीत आणि 'नाईन लेस दॅन टेन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे.
१० > ९ हे समीकरण 'दहा नवापेक्षा मोठा' असे मराठीत आणि 'टेन ग्रेटर दॅन नाईन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे.
मराठी किंवा इंग्रजी मध्यमामुळे ह्या गणिती भाषेत फरक पडत नाही.
खरा घोळ होण्याचे कारण भाषेतला शब्दांचा क्रम विशिष्ठ असल्याने होतोय. मराठीत आपण 'नऊ लहान दहापेक्षा' असे म्हणत नाही पण इंग्रजीमधे 'नाईन लेसदॅन टेन' असे म्हणतो त्यामुळे 'आकडा - गणीती चिन्ह - आकडा' ह्यांचा डावीकडून उजवीकडे जाणारा प्रवाह हा गणिती आणि इंग्रजी भाषेत सारखा रहातो. तर मराठी भाषेत समजावताना 'नऊ दहापेक्षा लहान' 'आकडा - आकडा - चिन्ह' असा बदलतो - हा भाषेतल्या व्याकरणामुळे झालेला बदल आहे.
समीकरण वाचताना पहिली संख्या ही डावीकडलीच उच्चारली जायला हवी हा नियम हे सगळ्याचे मूळ सूत्र आहे तो पक्का करुन घेणे हे गणिताच्या शिक्षकाचे काम म्हणजे मग घोळ होत नाही!
चतुरंग
प्रतिक्रिया
अवांतर : कंपाइलर लिहिला आहे का कधी?
जर मी a = 5
म्हणायचे
सगळेच कंपायलर लिहीतात काय?
सगळेच
: म्हणजे
पटत नाही
मराठी
१००% सहमत!
>> 9 < 10 आणी 10 >
आम्ही आणि
सॅ॑डी...
आत्ता
ओह!
वरची सगळी चर्चा मनोरंजक आहे!
पण