रॅगिंग !!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in काथ्याकूट
5 Apr 2009 - 11:37 am
गाभा: 

शासनाने कडक नियम करूनसुद्धा रॅगिंगने नुकतेच पुन्हा काही बळी मिळवले आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माझ्याही रॅगिंगविषयी काही आठवणी जाग्या झाल्या.
अर्थातच आता सगळेच हास्यास्पद वाटते, वाटतं की तेंव्हा उगीचंच आपण इतके घाबरलो, पण फर्स्ट इयरला 'सिनियर' म्हटले की पोटात गोळा उभा राह्यचा. त्यातून फायनलमधल्या एका किडकिडीत सरदारजीचा दरारा खूपच होता. सगळे हॉस्टेलाइट्स चळचळ कापत असत. तो मध्यरात्री सगळ्यांना फक्त बनियन-चड्डीवर भर पुणे-बंगळूर हायवेवर नेत असे व एखादी बस जवळून पास झाली की सगळ्यांना कोरसमध्ये 'हम सब चूत्ये हैं ! अशी गर्जना करायला लावीत असे. मूड वेगळा असेल तर चूत्येच्या ऐवजी गांडू वा भोसडीवाले असे किरकोळ बदल तो सुचवित असे. जसबीर हॉस्टेलमध्ये शिरताक्षणी पळापळ होत असे, फटाफट दारं लागत.
आता हसू येतं पण वेगवेगळ्याप्रकारचे सॅल्यूट करणे (तेही सुंदर मुलींपुढे जाऊन) हाही रॅगिंगमधला लोकप्रिय प्रकार होता. बायोकेमिस्ट्री सॅल्यूट, हिमॅट सॅल्यूट, इ. बायोकेम सॅल्यूट म्हणजे एका पायावर उभं राहायचं, एक हात ढुंगणावर, दुसरा डोक्यावर नागाच्या फण्यासारखा धरून जीभेने वेडावून दाखविणे ! बघणार्‍यांची चांगलीच करमणूक होत असे. माझ्या एका मित्राला जसबीरने शर्टामध्ये हेल्मेट ठेवून गरोदर बाईसारखे चालत जाऊन लाऊंजमध्ये भीक मागायला लावली होती. ह्या सगळ्या प्रकाराला 'इंट्रोडक्शन ऍन्ड ओरिएंटेशन' असे गोंडस नाव होतं. जसबीरला गुड मॉर्निंग सर न म्हटल्याबद्दल शिक्षा म्हणून माझा एक मित्र डिसेक्शन रूममधल्या प्रेताचे दात घासून आला होता ! (पुढचे दोन दिवस तो स्वतःचे सुद्धा दात घासत नव्हता :)
सुदैवाने मी लोकलाइट होतो त्यामुळे त्यामानाने माझं रॅगिंग कमी झालं. साधारणतः जेवणाच्या सुट्टीत आणि कॉलेज संपताना रॅगिंगसाठी बकरे धरले जायचे. मी भितीपोटी लंच ब्रेकमध्ये वर्गाबाहेर पडतच नसे, हात धुवायला जातांनासुद्धा दबकत दबकत जात असे. कॉलेज सुटल्यावर टिचिंग स्टाफच्या मागोमाग लपत छपत पार्कींगपर्यंत जायला लागायचं. पण असं किती दिवस दडणार? एक दिवस मीही जसबीरच्या तावडीत सापडलो..
(क्रमशः)

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Apr 2009 - 12:48 pm | घाशीराम कोतवाल १.२

तो मध्यरात्री सगळ्यांना फक्त बनियन-चड्डीवर भर पुणे-बंगळूर हायवेवर नेत असे व एखादी बस जवळून पास झाली की सगळ्यांना कोरसमध्ये 'हम सब चूत्ये हैं ! अशी गर्जना करायला लावीत असे. मूड वेगळा असेल तर चूत्येच्या ऐवजी गांडू वा भोसडीवाले असे किरकोळ बदल तो सुचवित असे.

अगाग्या धुवायचा ना असल्या येड्याला काय राव सगळ कालेज घाबरायच किडकिडीत तर होत फटक्यात आडवा झाला असता

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

टारझन's picture

5 Apr 2009 - 2:37 pm | टारझन

मूड वेगळा असेल तर चूत्येच्या ऐवजी गांडू वा भोसडीवाले असे किरकोळ बदल तो सुचवित असे.

काही तरी वेगळंच वाटलं ... मुड वर असा चेंज ? " भाऊसाहेब पार्टटाईम गे " णव्हते ना ? =))

योगी९००'s picture

5 Apr 2009 - 12:49 pm | योगी९००

वा..लेखाची सुरुवात छान झाली आहे. माझ्याही रॅगिंगच्या आठवणी जाग्या झाल्या.

आम्ही (आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र) कॉलेजात असताना कोल्हापूर -सांगली रेल्वेने कधीकधी ये- जा करायचो. त्यावेळी आमचे रेल्वेतच रॅगिंग व्हायचे. फार मजा यायची. मधल्या प्रत्येक स्टेशनची ठेवलेली नावे होती. "जयसिंगपुर" ऐवजी सिंगापुर आले असे मोठ्याने ओरडायला लावणे, रेल्वेच्या भांडकुदळ कारकूनाला पिडणे असे प्रकार चालायचे. सहप्रवासी सुद्धा हा प्रकार मजेत घ्यायचे. काही प्रवासी मुद्दाम आम्ही कशी रॅगिंग करतो हे बघण्यासाठी आमच्याजवळ येऊन बसायचे. ते सुद्धा ये-जा करणारे असायचे त्यामुळे त्यांनाही प्रवासात वेळ घालवायचे साधन म्हणजे आम्ही मुले होतो.

ह्या भांडखोर कारकूनावरून आठवले. सांगलीच्या विश्रामबाग स्टेशनचा कारकून फारच उद्दट होता. म्हणजे कोणत्याही सरळ प्रश्नाचे उत्तर शांतपणे द्यायचा असे नाही. फक्त आम्हालाच नाही तर बाकीच्या प्रवाश्यांची सुद्धा हीच तक्रार होती. आमचे सिनियर्स मुद्दाम त्याला पिडायचे. जर ट्रेन लेट असेल तर आम्हा १५-२० जणांना एका रांगेत उभे करायला लावायचे आणि एकामागोमाग एक प्रत्येकजणाला एकच प्रश्न त्याला विचारायाला लावायचे. " ट्रेन किती वेळ लेट आहे?". फार वैतागायचा तो. बाहेर येऊन प्रत्येकाला शिव्या घालायचा. एवढे होऊन आत त्याच्या खिडकीपाशी गेला की परत कोणीतरी जाऊन त्याला तोच प्रश्न विचारायचा.

मी पण एकदा शहाणपणा करायला गेलो होतो. उगाच सिनियर्स समोर तोरा दाखवला होता. मला न थांबता चित्रपटातील १५ अभिनेत्यांची नावे सांगायची होती. मी लगेच प्रुथ्वीराज पासून ते राजीव असे कपूर घराणे यातच अनिल आणि संजय कपुर नंतर जोडले आणि शेवटी सगळे खान (फिरोज,संजय,अकबर,आमिर्,शाहरुख्,सल्लू) , अशी पंधरा नावे एका दमात तोडली. माझ्या हुशारीचे कौतूक होण्याऐवजी जास्त शहाणपणा करतो म्हणून मला आणखी पिडले होते.

पण या सगळ्या प्रकारात कोठेही कोठलाही बीभत्स प्रकार किंवा अश्श्लिलता नव्हती. जे काही झाले ते सर्व मजेमजेतच चालायचे. आम्हीही आमचे रॅगिंग मजेतच घ्यायचो. रॅगिंग नंतर हेच सिनियर्स आम्हाला सिंगापुरची (म्हणजे जयसिंगपुर स्टेशनची) चपटी भजी खायला घालायचे. मी सुद्धा जेव्हा माझ्या जुनियर्सचे रंगिग केले तेव्हा असेच काही प्रकार केले. पण कोणीही आमच्या विरुद्ध तक्रार केली नाही किंवा आम्हीही कोणाविषयी तक्रार केली नाही . कारण म्हणजे एका लिमिटच्या बाहेर गेलो नाही. एकदा असेच एका जुनियरचे रेल्वेत रॅगिंग केले आणि त्याचे वडील बाजूलाच बसले होते. जेव्हा आम्हाला समजले की त्याचे वडील बाजूलाच आहेत तेव्हा आमची थोडी तंतरलेली होती पण त्यांनीही खेळीमेळीतच घेतले. वर उलट आम्हाला सांगितले की हा जरा शामळू आहे, बाहेरचे जग जरा कमी बघितले आहे, थोडा धीटपणा येऊ दे अंगात याच्या.

खादाडमाऊ

सुहास's picture

6 Apr 2009 - 12:23 am | सुहास

आम्ही (आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र) कॉलेजात असताना कोल्हापूर -सांगली रेल्वेने कधीकधी ये- जा करायचो.

वालचंद कॉलेज?

योगी९००'s picture

6 Apr 2009 - 11:37 am | योगी९००

हो वालचंदलाच होतो..

खादाडमाऊ

भडकमकर मास्तर's picture

6 Apr 2009 - 9:42 am | भडकमकर मास्तर

मुख्य फरक हॉस्टेलचे रॅगिंग आणि स्थानिकांचे रॅगिंग यात आहे...
हॉस्टेलचे रॅगिंग बर्‍याचदा गंभीर वळण घेऊ शकते....
चारचौघात होणारे स्थानिकांचे रेगिंग मर्यादा पाळून होते, ( जसे की हा रेल्वेतल्या रॅगिंगचा किस्सा) असे मला वाटते...त्यातसुद्धा फक्त एकाचेच घडत असेल तरी ते महात्रासदायक असते... ग्रुपची एकत्र होणारी गंमत कमी त्रासदायक असते असा माझा अनुभव...
पण एकट्याला म्हणजे :S #:S

मी हॉस्टेलच्या रॅगिंगमधून गेलोय त्यामुळे मला कल्पना आहे...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

योगी९००'s picture

6 Apr 2009 - 11:41 am | योगी९००

चारचौघात होणारे स्थानिकांचे रेगिंग मर्यादा पाळून होते, ( जसे की हा रेल्वेतल्या रॅगिंगचा किस्सा) असे मला वाटते...त्यातसुद्धा फक्त एकाचेच घडत असेल तरी ते महात्रासदायक असते... ग्रुपची एकत्र होणारी गंमत कमी त्रासदायक असते असा माझा अनुभव...

हो अगदी बरोबर..इतर कॉलेजमधील होस्टेलवर होण्यारे रॅगिंगचे किस्से ऐकले होते.

आमचे होस्टेल्वर सुद्धा रॅगिंग व्हायचे..पण यापेक्षा काही वेगळे झाले नाही. सुदैवाने आमच्या चार वर्षाच्या कालावधीत ना आमचे आणि ना आम्ही कोणाचे मर्यादा सोडून रॅगिंग केले नाही.
खादाडमाऊ

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2009 - 2:22 pm | प्रकाश घाटपांडे

मित्र डिसेक्शन रूममधल्या प्रेताचे दात घासून आला होता !

वैद्यकीय महाविद्यालयातील भूताची एक कथा कर्णोपकर्णी ऐकली होती. अमावस्येच्या रात्री शवागारात जाउन प्रेताच्या तोंडात पेढा घालायचा. आदल्या दिवशी ज्याने पैज स्वीकारली त्याने जाउन प्रेतांची संख्या मोजली. तेवढे पेढे घेउन रात्री बारा वाजता तो गेल्यावर प्रत्येक प्रेताच्या तोंडात एक पेढा घातल्यावर एक चादर गुंडाळलेला देह जास्त होता. तो उठुन म्हणाला मला पेढा? आणि मग.........
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अडाणि's picture

5 Apr 2009 - 11:04 pm | अडाणि

प्रकार आहे... काय काय क्लुप्ती कढतील त्याचा नेम नाही.... आमच्या वेळीपण रॅगींग व्हायचे पण बहुतेक सगळे गंमतशीर प्रश्न असायचे... जसे body चे इंटीग्रेशन करून दाखव, नुटनचे ६ नियम सांग वैगेरे....
-
अफाट जगातील एक अडाणि.

प्रदीप's picture

6 Apr 2009 - 10:51 am | प्रदीप

हे अवांतर आहे, कारण हे "रॅगिंग'ची जी सर्वमान्य व्याख्या आहे, त्यात बसणारे नाही. तरीही जी खोड काढली गेली ती भयंकर होती, आणि तिला जे तडफेने प्रत्युत्तर दिले गेले ते तर विशेष कौतुकास्पद.

अनिल अवचटांनी त्यांच्या एका लेखात ते मेडिकल कॉलेजात होते तेव्हाच्या सर्व गमतींबद्दल फार खुमासदार लिहीले आहे. त्यांच्या मेडिकलच्या पहिल्याच वर्षात घडलेली ही घटना आहे, ती येथे मी आठवणीतून लिहीत आहे. वर्गात एक सुंदर मुलगी होती. ती थोडी 'शिष्ट'म्हणावी अशी होती. टापटीप असावची, आपल्याच तोर्‍यात. एकदा प्रॅक्टिकल सुरू असतांना कुणीतरी एका प्रेताचे शिस्न कापून तिच्या पर्समध्ये हळूच ठेऊन दिले. आता जेव्हा ती तिचा हात पर्समध्ये घालणार, तेव्हा ती कशी किंचाळणार वगैरे चित्रे मुले मनात रचत होती. थोड्या वेळाने जेव्हा तिने तिचा हात काहीतरी काढण्यासाठी तिच्या पर्समध्ये घातला, तेव्हा तिच्या हाताला ते शिस्न लागले. तिने ते शांतपणे बाहेर काढले व वर्गातील सर्व मुलांच्या समोर धरून म्हणाली 'हे तुमच्यापैकी कोणाचे आहे?' सर्वत्र शांतता पसरली. मग तिने ते शांतपणे बाजूच्या कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले, व काहीच झाले नाही अशा आविर्भावाने ती पुढच्या कामास लागली.

ही सुमारे १९६६-६७ साली घडलेली गोष्ट आहे!

सँडी's picture

6 Apr 2009 - 12:50 pm | सँडी

=)) =)) =))

मैत्र's picture

6 Apr 2009 - 3:22 pm | मैत्र

"स्वतःविषयी" या अवचटांच्या पुस्तकात ह्या घटनेचे वर्णन आहे...

तिमा's picture

5 Apr 2009 - 3:12 pm | तिमा

तुम्ही वर्णन केलेले प्रकार मजेशीर असतील कदाचित, पण आता कोणी लिमिट पाळत नाही. तेंव्हा चर्चेचा आशय ध्यानात घेऊन या रॅगिंगला ग्लोरिफाय करायचा प्रयत्न करु नका.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विनायक प्रभू's picture

5 Apr 2009 - 3:18 pm | विनायक प्रभू

मला बनियन वरती कॉलेज पासुन स्टेशन पर्यंत जायला सांगितले. मी त्याच्या पुढची तयारी दाखवली. त्यानंतर रॅगींग झाले नाही.

टारझन's picture

5 Apr 2009 - 6:04 pm | टारझन

णंगेसे तो खुदा भी डरता है :)

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2009 - 8:08 pm | प्रकाश घाटपांडे

म्हणजे बनियनच्या पुढची कि स्टेशनच्या पुढची.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

संताजी धनाजी's picture

6 Apr 2009 - 4:35 pm | संताजी धनाजी

दोन्ही बहुतेक ;)
- संताजी धनाजी

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 4:41 pm | मदनबाण

कमोड मधे डोके घालायला लावायचे आणि नंतर वरुन फ्लश करायचा...झाले ब्रेनवॉश एकदम पटकन.
एक मुलगी दाखवायची व तिला प्रपोज करायला भाग पाडायचे !! ती मस्त पैकी कानफाडात लगावते व नंतर स्वत:च हसते कारण ती रॅगिंग करणार्‍या ग्रुप मधलीच असते..
अजुन बरेच प्रकार चालतात पण ते इथं लिहण्याच्या लायकीचे नाहीत.
इंजि. आणि मेडि. मधे हे प्रकार नवे नाहित.

(सायकोला न विसरु शकणारा)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

नरेश_'s picture

5 Apr 2009 - 5:41 pm | नरेश_

माझा एक मित्र, साजिद कॉलेजच्या बारश्याचे जेवण जेवलेला होता. त्यामुळे बराच थोराड होता.
बर्‍यापैकी पर्सनॅलिटी असल्याने, नव्या मुलांना हा प्राद्यापकच वाटे. मग काय, बर्‍यापैकी पर्सनॅलिटी व
अस्खलित इंग्रजीच्या जिवावर तो भरवर्गात नवोदितांचे लेक्चर घेई. गरीब बिच्चार्‍या नव्या मुलांना
हा पागल लेक्चरर उलटसुलट का शिकवतो हे समजेपर्यंत महिना निघून जाई !

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

प्राची's picture

5 Apr 2009 - 7:00 pm | प्राची

आमच्या कॉलेजमध्ये झालेली रॅगिंग....
रॅगिंग करणार्‍याने दोन बकर्‍यांना समोर उभे केले.एकाला सांगितले तू sin,दुसर्‍याला सांगितले तू cos.
आणि मग म्हणाला आता tan करून दाखवा(म्हणजे sin/cos). :|
रगिंग करणारा - B) :> B) :> B)
बाकी सगळे - :O =)) =)) =))
आणि ते दोन बकरे - ~X( :''( ~X( :''( ~X(

मराठमोळा's picture

5 Apr 2009 - 7:26 pm | मराठमोळा

माझ्या कॉलेजमधे एकदा एक सिनिअर हिरो माझी रँगिंग घ्यायला आला होता. त्याला तिसर्‍या मजल्यापासुन कॉलेजच्या पटांगणापर्यंत फरफटत आणला होता आणी त्याच्या प्रेयसीसमोरच ईतका मारला की परत कोणी रॅगिंगचे नाव काढले नाही राव.
रॅगिंग हा प्रकार आपल्याला कधी पटलाच नाही. कधी केली नाही आणी सहन पण केली नाही.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती's picture

5 Apr 2009 - 8:06 pm | रेवती

रॅगिंग हा प्रकार आपल्याला कधी पटलाच नाही. कधी केली नाही आणी सहन पण केली नाही.
अगदी सहमत. मराठमोळेसाहेब, आपले अभिनंदन!
मीही रॅगींग झाल्यावर खूप आजारी पडले होते. आठ दिवस झाले तरी ताप उतरेना मग रेक्टरने घरी पाठवले होते.
मजेमजेत चालते हे ठीक आहे, पण काय आणि किती?
प्रत्येकाची मजा आणि लिमिटेशन्स वेगळ्या असतात असे माझे ठाम मत आहे.
अत्यंत मोजके कपडे घालून (रॅगींगला बळी पडलेल्या)मुलांनी मुलींच्या समोर जाणे असल्या प्रकारात कोणती मजा आहे?
आपण सिनिअर झाल्यावर असे काय तारे तोडतो ज्यामुळे ज्युनिअर्सना त्रास देण्याचा अधिकार मिळतो?
कोण कुठल्या परिस्थितीतून आलेला असेल ते आपल्याला माहित नसते.
माझ्या होस्टेलवर अनेक मुलींच्या पालकांनी त्यांना कर्ज काढून शिकायला पाठवलेले होते.
त्याचे त्यांच्यावर खूप प्रेशर असायचे (एवढे करूनही लग्नाचा खर्चही सगळ्यांनाच टाळता येत नाही).
आधीच मानसीक अवस्था वाईट असताना वर थोडेही रॅगींगचे प्रेशर असणे म्हणजे फार वाईट.
मी आजारातून बरी झाल्यावर माझ्या पालकांनी समजावून, धीर देवून परत पाठवले. काहीजणी तर परत आल्याच नाहीत.
फक्त कुणाचातरी जीव गेला तर दखल घेतली जायची तेंव्हा (आताचे माहीत नाही.). अश्या परिस्थीतीत
कर्जाचे ओझे (ज्यांना नव्हते त्यांच्याही वाया गेलेल्या पैश्याला किंमत आहेच) व पुन्हा ऍडमिशनची कटकट.
पुढच्या परिणामांची कल्पना रॅगींग करणार्‍या मुलांना नसली तर पालकांनी (मुलांकडे लक्ष असेल तर..),
कॉलेजच्या प्रध्यापकांनी, मुख्याध्यापकांनी द्यायला हवी असे वाटते.
तूर्तास एवढेच.

रेवती

नितिन थत्ते's picture

6 Apr 2009 - 1:32 am | नितिन थत्ते

रेवतीशी सहमत. विशेषतः कोण कुठल्या परिस्थितीतून आलेला असेल ते आपल्याला माहित नसते.

माझ्यामाहितीतील एका मॅनेजमेंट कॉलेजात सिनिअर विद्यार्थ्यांनी नवीन मुलांना 'उद्या प्राचार्यांचे व्याख्यान आहे तेव्हा ब्लेझर घालून या' असे सांगितले. वाईट गोष्ट म्हणजे प्राचार्यांना कल्पना देऊन ही गोष्ट झाली आणि प्राचार्यांनी यावर आक्षेप घेतला नाही. काही मुलांना तरी ब्लेझर विकत घेणे जड गेले असणारच. पण त्या सिनिअर्स च्या डोक्यात हा विचार आलाच नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

sanjubaba's picture

6 Apr 2009 - 11:30 am | sanjubaba

मला तुमचे नाव माहीत नाही पण अस्सल मराठमोळे.....वाटता तुमचा प्रतिसाद आवडला......! हे रगिंग वैगरे प्रकार
अशा रीतीने मोडून काढले पाहिजेत.......याच मताचा मी आहे. मराठमोळेसाहेब, आपले अभिनंदन....!
संजूबाबा

मराठी_माणूस's picture

6 Apr 2009 - 7:56 am | मराठी_माणूस

वरच्या "या रॅगिंगला ग्लोरिफाय करायचा प्रयत्न करु नका" ह्या म्हणण्याशी सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2009 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

शासनाने कडक नियम करूनसुद्धा रॅगिंगने नुकतेच पुन्हा काही बळी मिळवले आहेत. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून माझ्याही रॅगिंगविषयी काही आठवणी जाग्या झाल्या.

लेखकाचा हेतु हा आठवणींचा आहे.चर्चा भरकटुन जाउ नये म्हणुन रॅगिंग या मुलभुत संकल्पना व आजची परिस्थिती असा वेगळा धागा करता येउ शकेल. बौद्धिक दांडगाई करुन रॅगिंग चे समर्थन करता येते म्हणुन काळजी घ्यावी हे मात्र मान्य.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठी_माणूस's picture

6 Apr 2009 - 11:19 am | मराठी_माणूस

ही मुलभुत संकल्पना काय आहे ?

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2009 - 10:01 am | प्रकाश घाटपांडे

शब्दकोषात जो अर्थ देतात तो संकल्पनात्मक असतो. प्रसंगी व्युत्पत्ती दिली जाते. संकल्पना या व्याख्येत (शब्दात) पकडता येत नाही. त्या बदलत ही जातात. रमेश धोंगडे लिखित ऑक्सफर्ड डिक्सनरीत रॅग या शब्दासाठी दिलेले अर्थ- १) धर्मादाय कार्यसाठी निधी गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला गमतीचा सार्वजनिक कार्यक्रम २) क्रियापद- एखाद्याशी चेष्टा करणे , सतावणे
असो ; आम्हाला या चेष्टा मस्करी वरुन बरी नव्हे ही थट्टा! आठवले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

6 Apr 2009 - 10:37 am | घाटावरचे भट

र्‍यागिंग करण्यात निराळीच मजा असते. बाकी घाटपांडे काकांशी सहमत, आठवणींच्या झर्‍यात उपदेशाचे एरंडेल ओतून सगळ्या गावाला चेहेरे वाकडे करावयास लावू नये ही नम्र विनंती.

भाग्यश्री's picture

6 Apr 2009 - 12:31 pm | भाग्यश्री

काय वाक्य आहे !!! वहीत लिहून ठेवावं असं!! =)) =))

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 10:55 am | विसोबा खेचर

हम्म!

सुरवाती-सुरवातीला माझेही एकदोनदा माफक रॅगिंग झाले. पण पुढे ते थांबेना असे कळल्यावर गल्लीतली पोरे घेऊन गेलो आणि रॅगिंग करणार्‍या सिनियर्सना आम्ही धू धू धुतले. जाम मारामारी केली आणि अर्वाच्य शिव्या देऊन आम्ही त्या सिनियर्सना हाग्या दम भरला, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्या दिवसानंतर पुन्हा कधी कोण आपल्या वाट्याला गेलं नाय! :)

आपला,
(सज्जनाशी सज्जन, गुंडाशी महागुंड) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2009 - 11:37 am | llपुण्याचे पेशवेll

मी पण कधी रॅगिंग केले नाही आणि सहनही केले नाही. फक्त मी स्वतः गल्लीतली पोरे घेऊन गेलो नाही मारामारी केली. एकाने रॅगिंग करायचा प्रयत्न केल्यावर मी वीट फोडली टाळक्यात त्याच्या आणि पळून गेलो. मग त्याने दुसर्‍या दिवशी पोरे आणून धुतले मला, बेणं टाळक्याला पट्टी बांधून आले होते. पण या प्रकारात 'एक माथेफिरू' अशी एक प्रतिमा तयार झाली माझी त्यामुळे नंतर मला बकरा करायला धजावले नाही कोणी. :)

(सणकी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

तिमा's picture

6 Apr 2009 - 5:40 pm | तिमा

एरवी सगळ्या विटा सारख्याच. फक्त डोक्यात हाणली की सर्टिफिकेट मिळते. (माथेफिरुचे)

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 11:50 am | नरेश_

आपला,
(सज्जनाशी सज्जन, गुंडाशी महागुंड) तात्या.

च्यामारी हा तात्या माणूस नक्की कसा आहे, काही कळतच नाही,
जितके समजून घ्यावे तितकाच समजायला कठीण जातोय.
एकवेळ शरद पवारांना ओळखणे सोपे जाईल, पण.... असो.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

विशाल कुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 5:17 pm | विशाल कुलकर्णी

खरेय अगदी !

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

विशाल कुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 5:16 pm | विशाल कुलकर्णी

अभाविपचा संपर्क मंत्री असल्याने कुणी कधी आमच्या वाटेला गेलेच नाही आणि हॉस्टेलला न राहता रुम करुन राहीलो होतो त्यामुळे रॅगिंगशी कधी संबंध आलाच नाय.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2009 - 5:34 pm | प्रकाश घाटपांडे

अभाविपचा संपर्क मंत्री असल्याने कुणी कधी आमच्या वाटेला गेलेच नाही

त्यो बी यखांदा अनुभव टाका म्हंतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सूहास's picture

6 Apr 2009 - 5:48 pm | सूहास (not verified)

नेस वाडिया कॉलेज, पुणे,वर्ष :२०००, ई.अकरावी, शाखा-वाणिज्य.रॅगिंग वगेरे काही झाल नाही.
पुढे आम्ही "सिनीयर" झाल्यावर कधी केल नाही..मात्र "ज्युनीयर" मुली॑वर लाईन मात्र भरभरुन मारल्यात.त्यातली एक पटेपर्यन्त॑..
सूहास..

टायबेरीअस's picture

6 Apr 2009 - 10:38 pm | टायबेरीअस

कधी जमले नाही. खपवून घेतले नाही.