सावत्र आई २- चित्रपट प्रसंग

टायबेरीअस's picture
टायबेरीअस in जनातलं, मनातलं
31 Mar 2009 - 2:28 am

काही वर्षांपुर्वी 'Stepmom' नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एक प्रसंग चटका लावून जातो..
थोडक्यात कथा सांगायची तर नवरा बायको विभक्त होतात.. २ मुलं, - एक मुलगा, एक मुलगी.. मुलगी 'वयात' येऊ घातलेली.. दोघांच्या 'डिवोर्स' नंतर नवरा अजून एकीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. 'नवीन' सावत्र आई आपल्या परीने मुलांना प्रेम द्यायचा खूप प्रयत्न करते पण मुलगी तिला झिडकारत असते. पहिल्या बायकोलाही ती फारशी आवडत नसते..
दिवस जातात.. पहिल्या बायको ला कान्सर होतो आणि नाईलाजाने ती मुलीची 'जबाबदारी' सावत्र आईवर टाकते. सावत्र आई प्रचंड अपमान, दु:ख सहन करून मुलीला हवे ते हवे तसे पण तिच्यासाठी योग्य तेच 'देत' जाते.. शेवटी मुलगी सुधा सावत्र आई ला जवळ करते..

..मृत्युशय्येवर पडलेल्या आई ला जेव्हा ती सावत्र आई भेटायला जाते तेव्हा चा संवाद :

सावत्र आई (इसाबेल) : - "तुला माहित्येय , की हल्ली आना ( मुलगी) मला तिच्या मनातले सगळे सांगायला लागली आहे."
आई (ज्याकी) : - "ह्म्म.. मी पहातेय.. चांगलेच आहे. "
सावत्र आई : "पण एक भीती, एक रुखरुख माझ्या मनात नेहेमीच रहाते.."
आई : "आणि ती कोणती?"
सावत्र आई : "जेव्हा 'आना' चं लग्न ठरेल आणि लग्नाच्या दिवशी तिचा 'वेडींग गाऊन' मी नीटनेटका करून देत असेन तेव्हा.. तेव्हा आरशात बघून ती म्हणेल.. "
आई: "काय?"
सावत्र आई : .. "काही नाही.. मला अशी भीती आहे की तेव्हा आरशात माझ्याकडे पाहून 'आना' म्हणेल .. " आज माझी आई असायला हवी होती... "
आई : "आणि माझी भीती ही आहे की ती असं म्हणणार नाही!"..

"I am scared that Anna will say, I wish my mom was here"... n Jacki says " I'm scared that she won't"!

या एका संवादातून कथाकार दोन स्त्रिया, दोन आया यांमधली किती तरी नाती दाखवून जातो.. दु:ख , कौतूक, आनंद, समाधान आणि आभार.. सर्व काही.. केवळ अप्रतीम!

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

31 Mar 2009 - 9:42 am | आनंदयात्री

केवळ अप्रतिम भावनाविष्कार !!

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2009 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll

अप्रतिम भावनाविष्कार. मध्यंतरी मिपावर वाचलेल्या सावत्र आई कवितेची आठवण झाली. सुंदर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2009 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ अप्रतिम भावनाविष्कार !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर प्रसंग! हा चित्रपट (इंग्लिश समजायला लागल्यानंतर) पाहिलेल्या पहिल्या काही हॉलिवूडपटांपैकी! आणि हा प्रसंग कधीच न विसरता येण्याजोगा.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

भाग्यश्री's picture

31 Mar 2009 - 9:45 am | भाग्यश्री

वा.. सुंदर..

विशाल कुलकर्णी's picture

31 Mar 2009 - 10:31 am | विशाल कुलकर्णी

खरेच सुरेख, धन्स !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

भडकमकर मास्तर's picture

31 Mar 2009 - 5:05 pm | भडकमकर मास्तर

या सिनेमाचे स्क्रिप्ट वाचायलाही बघण्याइतकीच मजा येते..
आठवण करून दिल्याबद्दल आभार..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/