काही वर्षांपुर्वी 'Stepmom' नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एक प्रसंग चटका लावून जातो..
थोडक्यात कथा सांगायची तर नवरा बायको विभक्त होतात.. २ मुलं, - एक मुलगा, एक मुलगी.. मुलगी 'वयात' येऊ घातलेली.. दोघांच्या 'डिवोर्स' नंतर नवरा अजून एकीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. 'नवीन' सावत्र आई आपल्या परीने मुलांना प्रेम द्यायचा खूप प्रयत्न करते पण मुलगी तिला झिडकारत असते. पहिल्या बायकोलाही ती फारशी आवडत नसते..
दिवस जातात.. पहिल्या बायको ला कान्सर होतो आणि नाईलाजाने ती मुलीची 'जबाबदारी' सावत्र आईवर टाकते. सावत्र आई प्रचंड अपमान, दु:ख सहन करून मुलीला हवे ते हवे तसे पण तिच्यासाठी योग्य तेच 'देत' जाते.. शेवटी मुलगी सुधा सावत्र आई ला जवळ करते..
..मृत्युशय्येवर पडलेल्या आई ला जेव्हा ती सावत्र आई भेटायला जाते तेव्हा चा संवाद :
सावत्र आई (इसाबेल) : - "तुला माहित्येय , की हल्ली आना ( मुलगी) मला तिच्या मनातले सगळे सांगायला लागली आहे."
आई (ज्याकी) : - "ह्म्म.. मी पहातेय.. चांगलेच आहे. "
सावत्र आई : "पण एक भीती, एक रुखरुख माझ्या मनात नेहेमीच रहाते.."
आई : "आणि ती कोणती?"
सावत्र आई : "जेव्हा 'आना' चं लग्न ठरेल आणि लग्नाच्या दिवशी तिचा 'वेडींग गाऊन' मी नीटनेटका करून देत असेन तेव्हा.. तेव्हा आरशात बघून ती म्हणेल.. "
आई: "काय?"
सावत्र आई : .. "काही नाही.. मला अशी भीती आहे की तेव्हा आरशात माझ्याकडे पाहून 'आना' म्हणेल .. " आज माझी आई असायला हवी होती... "
आई : "आणि माझी भीती ही आहे की ती असं म्हणणार नाही!"..
"I am scared that Anna will say, I wish my mom was here"... n Jacki says " I'm scared that she won't"!
या एका संवादातून कथाकार दोन स्त्रिया, दोन आया यांमधली किती तरी नाती दाखवून जातो.. दु:ख , कौतूक, आनंद, समाधान आणि आभार.. सर्व काही.. केवळ अप्रतीम!
वाचने
2821
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
हेच म्हणतो
In reply to अप्रतिम by आनंदयात्री
+१
In reply to अप्रतिम by आनंदयात्री
सुंदर
वा.. सुंदर..
खरेच
या