ताई आणी दादा

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
28 Mar 2009 - 11:44 am

दादा :- या या या , या ताई...
ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ?
दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ?
ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी.
दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते.
ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते. बाबा तर कायम म्हणायचेच की तु असा दबुन राहाणारा नाहीस, तु नक्कीच काहितरी भरीव करुन दाखवणार.
दादा :- हो फार प्रेम होते त्यांचे माझ्यावर, आज असते तर त्यांचे मार्गदर्शन खुप कामाला आले असते.
असो, तु सांग आज कसे काय येणे केलेस ?
ताई :- काय सांगु दादा, कल्याण मध्ये गोरगरीबांसाठी पुढिल ५ वर्ष एक समाजोपयोगी संस्था उघडावी असे खुप मनात आहे. त्या 'कमळ' बॅंके कडे कर्ज मागायला गेले होते, खरे तर बाबा एकेकाळी त्या बॅंकेचे एक संचालक पण मला बॅंकेनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे !
दादा :- नको ताई, अशा सणावारी नको डोळ्यातुन पाणी काढुस. मी आहे ना.
ताई :- हो रे, म्हणुनच तुझ्याकडे धावले, जेष्ठ लोक म्हणाले की 'रेल्वे इंजीन बॅंकेनी' ह्या सहामाहीत चांगलाच नफा दाखवला आहे आणी बॅंक तरुण उद्योजकांना प्रोत्साहनही देत आहे.
दादा :- हो ग ताई, तु काहि काळजी करु नकोस. आमची बॅंक तुझ्या मागे भक्कमपणे उभी राहिल. फक्त तुला इतर सगळे शेअर विकुन टाकुन फक्त आमच्या 'मराठी विकास' उद्योगाचे शेअर खरेदी करावे लागतील.
ताई :- आनंदाने करीन दादा. गरीबांच्या विकासासाठी आणी बाबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी सगळे करीन. त्यतुन त्या 'कमळ' बॅंकेतल्या जेष्ठांच्या बचत खात्यातली रक्कमही संपत चालली आहे तेंव्हा ते ही लवकरच आपल्या बॅंकेचे सभासद होउन आपल्याला मार्गदर्शन करतीलच.
दादा :- भले शाब्बास ! अग शर्मीला श्रीखंड आण ग, बघ तरी कोण आलय ते.

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.)

अपेक्षीत प्रतिक्रीया :- UUU

कथाराजकारणमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Mar 2009 - 12:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त परा शेट मस्त लिहिला आहेत तुम्ही हा प्रसंग
अवांतर आतल्या गोटातील बातमी कमळ बॅक काहि दिवसात आर्थीक / बौध्दीक दिवाळ खोरी जाहिर करणार आहे
कशाला तडमडलास घाश्या अरे हे कमळवाले हात तोडतील तुझा मग तु मिसळपाव वर कसा प्रतिक्रिया देणार जपुन रहा बाबा आता

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दशानन's picture

28 Mar 2009 - 12:30 pm | दशानन

=))

लै भारी !

परा.. तु वर्तमानपत्रामध्ये पण लिहतोस काय ?

अमोल खरे's picture

28 Mar 2009 - 12:43 pm | अमोल खरे

=)) =))

विशाल कुलकर्णी's picture

28 Mar 2009 - 1:22 pm | विशाल कुलकर्णी

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.).......

हे लै आवाडलं !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

अनंता's picture

28 Mar 2009 - 1:40 pm | अनंता

अपेक्षीत प्रतिक्रीया :- UUU
खल्लास.

निखिल देशपांडे's picture

28 Mar 2009 - 1:54 pm | निखिल देशपांडे

लै भारी रे प रा.....

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.) हॅ हॅ हॅ...

अवांतरः 'रेल्वे इंजीन बॅंकेला रिसर्व बँक नाव बदलायला लावेल बहुतेक....

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 4:13 pm | योगी९००

हा हा हा..

अजून वाढवता आला असता हा लेख ..पण आवडला..

खादाडमाऊ

सनविवि's picture

28 Mar 2009 - 4:17 pm | सनविवि

=))
एक्क नंबर!!

सुनील's picture

28 Mar 2009 - 5:34 pm | सुनील

उत्तम कल्पनाशक्ती परंतु अजूनही अधिक खुलवता आले असते असे वाटते.

जियो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Mar 2009 - 2:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही असंच वाटतं. परा, मस्तच लिहिलं आहेस, अजून मालमसाला घालता आला असता.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

क्रान्ति's picture

28 Mar 2009 - 7:32 pm | क्रान्ति

काय भारी लिहिलय परा! कमाल! @)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

28 Mar 2009 - 10:11 pm | प्राजु

___/\___
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

28 Mar 2009 - 10:15 pm | समिधा

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चंद्रशेखर महामुनी's picture

29 Mar 2009 - 12:12 am | चंद्रशेखर महामुनी

लई भारीरे.... मजा आला....

योगी९००'s picture

29 Mar 2009 - 12:25 am | योगी९००

मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे !
हे मामा कोण..? आत्याच्या नवर्‍याचे असे म्हणायचे आहे का तुम्हाला..?

खादाडमाऊ

अडाणि's picture

29 Mar 2009 - 12:28 am | अडाणि

येवूद्या अजून .. सध्या असले विषय बरेच मिळतील...
-
अफाट जगातील एक अडाणि.

सहज's picture

29 Mar 2009 - 6:29 am | सहज

मस्त लिहले आहेस :-)

मिपावर मस्त पॉलीटीकल खुसखुशीत लेखन करणार्‍यांच्या यादीत अजुन एक. सही.

जियो.

नंदन's picture

29 Mar 2009 - 11:34 am | नंदन

आहे, लेख आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2009 - 10:17 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाटावरचे भट's picture

29 Mar 2009 - 3:59 pm | घाटावरचे भट

वा! आवडले!!

कुंदन's picture

29 Mar 2009 - 3:59 pm | कुंदन

निवडणुकीच्या निमित्ताने येउ देत अजुनही असे खुस खुशीत लेख.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2009 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार

लेख खुप खाली गेला होता, दुसर्‍या पानावर जायची शक्यता होती म्हणुन हा प्रतिसाद देउन लेख पुन्हा वर आणला आहे. ह्याच्या नंतर एखादी प्रतिक्रीया आली (यायलाच पाहिजे राव , त्याच साठी तर येव्हडा अट्टाहास) की मग हि प्रतिक्रीया उडवली तरी चालेल.

अवांतर :- माझ्या या लेख वर आणण्याच्या 'कृतीत' आणी इतर कोणाच्या 'कृतीत' साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

29 Mar 2009 - 7:26 pm | धमाल मुलगा

च्यामारी प.रा. एकदम राजकारनात लेखनबाजी?
लढ बाप्पू लढ!

सह्ही जमलाय लेख.

आता 'वरुण गांधी' प्रकरणावरही येऊ दे की एखादा कडकडीत तराणा :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मदनबाण's picture

29 Mar 2009 - 9:33 pm | मदनबाण

परा आपने ये लेख बहुत मनसे लिखा है | :)

मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...

यशोधरा's picture

29 Mar 2009 - 9:36 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहे!