नर्मदे हर हर

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
30 Jan 2008 - 9:58 am

जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

धर्ममाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 10:18 am | विसोबा खेचर

ह्या पुस्तकाबद्दल मीदेखील बरेच ऐकून आहे!

कुंट्यांच्या हिंमतीला आणि चिकाटीला निश्चितच दाद दिली पाहिजे. ही अत्यंत कठीण आणि खडतर परिक्रमा त्यांनी एक दोन वेळा नव्हे तर अनेकदा केली आहे असेही मी ऐकून आहे..

अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

माझ्या माहितीप्रमाणे डॉ वर्तक यांचे गूढ अनुभव असलेले एक पुस्तक प्रसिद्ध आहे. परंतु माझ्या मते वर्तक बर्‍याच थापा मारतात! दोन तास डोळे मिटून बसतात आणि आज काय मंगळावर जाऊन आलो, उद्या काय न्येपच्यूनवर गेलो होतो अशा बिनदिक्कत, बेलाशक थापा मारतात! अहो कसला आलाय मंगळ वगैरे? डोळे मिटून झक्कपैकी झोप वगैरे काढत असतील! :)

असो,

आपला,
(शनिवर अनेकदा फिरायला जाणारा!) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Jan 2008 - 10:43 am | डॉ.प्रसाद दाढे

मी गूढविद्या अथवा तशा प्रकारची आणखी काही पुस्तके वाचली आहेत
१) तृतीय नेत्र- लामा लो॑बस॑ग राम्पा
२) आप्पा प॑त, एक प्रवास- नलिनी प॑त
३) ब्रम्हर्षी॑ची स्मरणगाथा- डॉ. प.वि. वर्तक
४) योगीकथामृत

इनोबा म्हणे's picture

30 Jan 2008 - 3:30 pm | इनोबा म्हणे

योगीकथामृत मी एकदा वाचले आहे. खरंच अद्भूत आहे. पण प्रत्येकालाच पटेल असे नाही. खासकरुन त्यांचे केवळ मनातील विचांराद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे... वगैरे
अशा प्रकारच्या गूढ विद्या खरेच अस्तित्वात असतील का?

-इनोबा

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर

योगीकथामृत मी एकदा वाचले आहे. खरंच अद्भूत आहे. पण प्रत्येकालाच पटेल असे नाही.

कसे पटणार? अहो हे वर्तक भयंकर थापाडे आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे! :)

खासकरुन त्यांचे केवळ मनातील विचांराद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे... वगैरे
अशा प्रकारच्या गूढ विद्या खरेच अस्तित्वात असतील का?

नक्कीच नसतील/नाहीत!

तात्या.

ऋषिकेश's picture

30 Jan 2008 - 8:49 pm | ऋषिकेश

तृतीय नेत्र- लामा लो॑बस॑ग राम्पा
हे लो॑बस॑ग राम्पा यांच्या पुस्तकांच्या सिरीज मधील एक. या सिरिजमधे अन्य दोन पुस्तकेहि आहेत
त्यातील एक "तिबेटी डॉक्टर" नावाचे आहे दुसरे विसरलो.

(गुढ) ऋषिकेश

राम्पाची कहाणी हे तिसरे पुस्तक आहे

तसेच, साद देती हिमशिखरे हे अतिशय अत्भुत या सदरात मोडणारे पुस्तक आहे.
या पुस्तकात बुवाबाजी आणि पाखंडीपणाचा विरोध तर आहेच, पण योग्य मार्ग प्रत्येकाने ज्याचा त्यानेच शोधायचा असतो हे ही ठामपणे सांगितले आहे. माझ्यामते हे पुस्तक जास्त विश्वासार्ह आहे.
पुस्तक हे मुळात इंग्रजीतून एका मराठी माणसाने लिहिले आहे

पुस्तकाचे मूळ नाव : Towards the Silver Chrest of the Himalayas
पुस्तकाचे मूळ लेखक: ग.प्र.प्रधान
पुस्तकाचे मराठी नाव : साद देती हिमशिखरे
पुस्तकाचे मराठी अनुवादक : आठवत नाही ... बहुतेक राम कदम

या पुस्तकाच्या वाचनाने अनेकांना एक वेगळा विचार मिळेल यात काही शंका नाही
(हिमालयाच्या ओढीने भारावलेला) सागर

ध्रुव's picture

30 Jan 2008 - 11:17 am | ध्रुव

हे एक अनुभव कथन म्हणून वाचले तर ठीक आहे, पण खर बघता, पुस्तकातले काही अनुभव विश्वास ठेवण्याजोगे नाहीत.
बाकी पुस्तकात, सिगारेट ओढली, पुढच्या गावात गेलो आणि तिथे माझी कशी सोय झाली (नर्मदेच्या कृपेने) हेच वर्णन जास्त आहे. एकदा वाचल्यानंतर परत वाचताना काही विशेष वाटत नाही.
गूढ अनुभव वगैरे आहेत असं काही फार वाटत नाही, अंधश्रद्धाच जास्त वाढण्याची शक्यता आहे असे वाटते.
--
ध्रुव

चतुरंग's picture

30 Jan 2008 - 9:18 pm | चतुरंग

"इन सर्च ऑफ सीक्रेट इंडिया", हे पॉल ब्रंटन चे पुस्तक वाचले होते. रंजक अनुभवांनी भरलेले आहे.
पुन्हा वाचायला सुद्धा आवडेल.

लोब्संग रांपाची ३ पुस्तके - द थर्ड आय, डॉ. फ्रॉम ल्हासा, द रांपा स्टोरी

अवांतर - रेडियोचा शोध लागण्यापूर्वीही विद्युतचुंबकीय लहरी होत्याच, फक्त त्यातली गूढता रेडियोच्या शोधाने नाहिशी झाली.
अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत.
एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये.

चतुरंग

एक's picture

30 Jan 2008 - 10:39 pm | एक

"...अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत.
एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये....."

अगदी बरोब्बर..
पण सावधान. असचं मत मी एकदा मनोगतावर नोंदवलं होतं. तिथल्या एकाने मला मनोरुग्ण ठरवून ट्रीटमेंटचा अनाहूत सल्ला दिला होता.. तोच इसम मिसळपाववर पण मुक्त पणे बागडतो आहे. तेव्हा सावधान.

इनोबा म्हणे's picture

31 Jan 2008 - 12:35 am | इनोबा म्हणे

"...अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत.
एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये....."

सहमत. मुळातच मी केवळ प्रश्न उपस्थीत केला होता, कोणाचेही मत खोडले नव्हते.

एकराव हे मनोगत नाही, मिसळपाव आहे. इथे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करायचा अधिकार आहे. तेव्हा बेधडक बोला.
राहिले त्या सदस्याचे तर मिसळपावचे गावकरी त्याला पुरुन उरतील. काळजी करु नका.

(मिसळ'लेला) -इनोबा

ऐकून बरं वाटलं कि त्याला मिपा चे सदस्य पुरून उरतील ते.

बघुया त्याची या लेखावर काय प्रतिक्रिया येते ते..;-)

ध्रुव's picture

31 Jan 2008 - 12:35 pm | ध्रुव

अवांतर - रेडियोचा शोध लागण्यापूर्वीही विद्युतचुंबकीय लहरी होत्याच, फक्त त्यातली गूढता रेडियोच्या शोधाने नाहिशी झाली.
अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत.
एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये.

हे मान्य! पण झोपेतुन उठल्यावर (नर्मदेच्या कृपेने) खिशात सिगारेटचे पाकीट व पैसे आले. हे थोडे अनुभव (गूढ असो वा नसो) म्हणून पचायला जड आहे मला.
नर्मदेच्या सहवासातली शांतता आणि त्यामुळे होणारे एकाग्र चित्त व ध्यानाचा अनुभव... ह गूढ म्हणताअ येईल पण काही गोष्टी शुद्ध काल्पनिक कथा अथवा अंधश्रद्धाच म्हणता येतील.

--
ध्रुव

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 6:59 pm | चतुरंग

म्हणतोस तसे असेलही. मी हे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्याबद्द्ल मत नाहि देऊ शकत.

एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये.

हे विधान मी आपल्या प्रवृत्तीबद्दल केले होते, असे काही ऐकले की आपण लगेच एक बाजू घेतो.

चतुरंग

ध्रुव's picture

31 Jan 2008 - 7:07 pm | ध्रुव

हे विधान मी आपल्या प्रवृत्तीबद्दल केले होते
तसे असेल तर तुम्ही मला ओळखायला अजून वेळ आहे असे मी म्हणेन. मी स्वतः कधीही एकदम मत मांडत नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू बघायच्या व जे मनाला पटते ते बोलावे/करावे असा मी आहे.
बाकी माझे मत फक्त नर्मदे हर या पुस्तकाबद्दल होते, योगीकथामृत याबद्दल नाही कारण तुम्ही जसे नर्मदे... वचले नाही तसंच मी योगी....
--
ध्रुव

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 7:29 pm | चतुरंग

अरे मी चुकीचा शब्द वापरला - "आपल्या" ऐवजी "मानवी" प्रवृत्तीबद्द्ल म्हणायचे होते.
वैयक्तिक तुझी आणि माझी ओळखही नाही रे, तेव्हा गैरसमज नसावा!

चतुरंग

ध्रुव's picture

1 Feb 2008 - 5:14 pm | ध्रुव

बिलकुल नाही. मन स्वच्छ आहे. :)
--
ध्रुव

अरुण ताम्हणकर आणि प्रदीप दळवी ह्या २ लेखकांची पुस्तके कादंबरी या सदरात मोडतात
पण ताम्हणकरांच्या पुस्तकांत दळवींच्या लेखनापेक्षा आध्यात्मिक टच जास्त आहे
पण खालील पुस्तके वाचनीय आहेत यात काही शंका नाही.

अरुण ताम्हणकर
- सर्पगंध
- दिक्-बंधन
- कुठे फिरविशी जगदिशा
- जन्मांतर

प्रदीप दळवी
- संभवामि युगे युगे
- कालांकित

(गूढ विद्यामय झालेला) सागर

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Feb 2008 - 6:23 pm | डॉ.प्रसाद दाढे

बॅरिस्टर अप्पासाहेब प॑त तिबेट व सिक्कीममध्ये भारत सरकारचे पोलिटीकल ऑफीसर होते. ते अतिशय बुद्धीप्रामाण्यवादी व अ॑धश्रद्धाविरोधी होते. मात्र त्या॑च्या आत्मचरित्रात तिबेट व सिक्कीममधील बौद्ध लामा॑चे काहीसे अविश्वसनीय वाटावेत असे चमत्कार नमूद केले आहेत. जिज्ञासू वाचका॑नी ते जरूर वाचावेत.
अप्पासाहेब इजिप्त व इ॑डोनेशियात सुद्धा राजदूत होते, तिथेही काही गूढ अनुभव त्या॑ना आले.
उपरोक्त पुस्तकास श्रीमती इ॑दिरा गा॑धी या॑ची प्रस्तावना आहे. तसेच काही चमत्कार तर प॑. नेहरू सिक्कीम दौर्‍यावर असताना घडले आहेत. वानगीदाखल एक सा॑गतो. सिक्किममध्ये 'आजो रिम्पोचे' नामक एक बौद्ध लामा होते जे हवामान क॑ट्रोल करू शकत. सिक्किमजवळ नथूला खि॑ड आहे जेथे सतत बर्फाची वादळे होत असतात. जेव्हा अप्पासाहेब प॑ताना नथूला ओला॑डावयाची असे, ते आजो रिम्पोचेना निरोप पाठवीत असत. रिम्पोचे 'च्छो' नामक एक प्रकारची पूजा करीत असत ज्यामुळे नथूला खि॑डीतील हिमवादळ काही काळापुरते था॑बत असे! सुरूवातीला प॑तानासुद्धा हे अशक्य वाटले होते पण त्या॑च्या सिक्कीम वास्तव्यात त्या॑नी अनेकदा नथूला पार केली व प्रत्येक वेळी त्याना असाच अनुभव आला. हाच अनुभव नेहरू॑नासुद्धा आला होता. अशा पुष्कळ गोष्टी त्या॑नी दिल्या आहेत.
बॅ. प॑तासारखा गृहस्थ असत्य लिहिण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मला असे वाटते की अशा काही सिद्धी निश्चितपणे आहेत पर॑तु त्या फारच थोड्या लोका॑ना खरोखरच अवगत आहेत. या सिद्धी॑नाही काही मर्यादा असाव्यात कारण चीनचे तिबेटवरील आक्रमण कोणताही लामा रोखू शकला नाही. मात्र सिद्धी॑चा वापर करून दलाई लामा चीनचा उद्देश आधीच जाणू शकले व भारतात सुरक्षित निसटू शकले. (पाहा: तृतीय नेत्र)
खर्‍या साधका॑ना सिद्धी॑चे प्रदर्शन करण्यात स्वारस्य नसते, ते त्या॑चे ध्येयच नाही. इथे जी काही बुवाबाजी चालते ती या सगळ्याची भ्रष्ट नक्कल आहे. त्यामुळे कोणताही चमत्कार सहजासहजी स्वीकारू नयेच! पण सरसकट सगळ्याला खोटेही म्हणू नये.

भडकमकर मास्तर's picture

3 Feb 2008 - 1:29 am | भडकमकर मास्तर

साद देती हिमशिखरे चे लेखक ग प्र प्रधान नाहीत.........
जी.के. प्रधान नावाचे एक आय ए एस किंवा तत्सम सरकारी अधिकारी होते.......
पण हे पुस्तक छान आहे...सहमत :)

सागर's picture

10 Apr 2008 - 7:21 pm | सागर

साद देती हिमशिखरे चे लेखक ग प्र प्रधान नाहीत.........
जी.के. प्रधान नावाचे एक आय ए एस किंवा तत्सम सरकारी अधिकारी होते.......

सहमत....चूक मान्य

लेखकाच्या आद्याक्षरांबाबत माझा घोळ झाला होता.
जी.के. प्रधान हेच 'साद देती हिमशिखरे' चे लेखक आहेत

(अध्यात्माकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणारा)सागर

मी सुद्धा वाचलेले आहेत.
सर्वसाधारणपणे आकलनाच्या बाहेर असणार्‍या काही गोष्टी आपल्याही आयुष्यात घडत असतात पण आपण कदाचित त्याकडे तेवढे लक्ष देत नसू किंवा योगायोग समजून सोडून देत असू.
अनुभव १-
तुम्हाला तीव्रतेने एखादी गोष्ट हवी असे वाटणे आणि अचानकपणे कल्पनाही नसताना ती गोष्ट आपणहोऊन समोर येणे असे माझ्या बाबतीत तर इतक्या वेळा होते की त्याला मी योगायोग मानणे सोडून दिले आहे.
त्याला काय म्हणायचे हे मला माहीत नाही, तो चमत्कार नाही, पण त्याची कारणमीमांसा मला तरी सहज देता येत नाही!

अनुभव २ -
इथे अमेरिकेत हाय वे ला किंवा आतल्या रस्त्यांवरही पोलीस रडार लावून वाट बघत लपून बसलेले असतात. सहजा सहजी दिसत नाहीत आणि दिसतात तेव्हा वेळ गेलेली असते! गाडीत लावण्यासाठी इथे रडार डिटेक्ट्रर्स मिळतात त्यावर तुम्हाला पोलिसांची गाडी रडार लावून जवळ आहे हे समजते. मग तुमचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असला तर तुम्ही तो कमी करायचा. कारण जबर दंड - साधारण पणे १२५$ होतो!
माझ्या गाडीत डिटेक्टर नाही पण मला पोलिसांची गाडी जवळपास असलेली जाणवते हे मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही मला वेड्यात काढाल! पण हे सत्य आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन मी फार क्वचित करतो. साधारण वेगाने गाडी चालवता चालवता, आसपास कुठेही पोलीस गाडी दिसत नसताना, अचानक मला जाणवतंकी पोलीस आहेत, आणि काही सेकंदातच गाडी दिसते. आणि अजून पर्यंत म्हणजे गेल्या ६ वर्षात हे १००% वेळा बरोबर आलं आहे (२०० च्या आसपास तरी घटना असतील)!
त्याचं कारणही मला माहीत नाही पण ह्याला मी तरी योगायोग मानणार नाही.

आपल्यालाही असे काही अनुभव असतील त्याकडे बारकाईने पहाणे जरुरीचे आहे. आणि डॉ.प्रसाद म्हणतात त्या प्रमाणे त्यांची एकदम श्रद्धा/अंधश्रद्धा अशी वर्गवारी टाळावी.

चतुरंग

नरुभाऊ's picture

3 Feb 2008 - 11:04 am | नरुभाऊ

मित्रहो सप्रेम नमस्कार,
मी आपला एक नवीन मित्र!
मु़क्काम पोस्ट पुणे.

आपला,

नरुभाऊ.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2008 - 11:45 am | llपुण्याचे पेशवेll

अशा काही घटना नक्कीच घडत असतात माझ्या बाबतीत देखील. उदाहरणार्थ- आम्ही इकडे बॉलिंग नावाचा खेळ खेळायला जातो. मी त्यात मुळीच तरबेज नाही. पण कधीकधी मला आतून ( अंतरात्मा की आवाज :) ) असे वाटते की आता १० च्या १० बाटल्या पडतील मी अशावेळी सर्व उपस्थिताना सांगतो बघा आता मी १० च्या १० बाटल्या पाडून दाखवतो. आणि खरोखरच त्या सर्व बाटल्या पडतात. पण प्रत्येक वेळेला मला असे वाटतेच असे नाही. तेव्हा मी कोणालाही सांगतही नाही. आणि इतर वेळेला मी कितीही मनापासून ठरवले की मी सर्व बाटल्या पाडीन तेव्हा तसे ते हमखास होत नाही. त्या फक्त काहीच वेळा अशा असतात्.(बॉलिंग मधल्या या बाटल्याना काय म्हणतात ते मला माहीत नाही. कोणाला माहीत असल्यास जरूर सांगावे)

अधूनमधून अंतर्ज्ञानी
डॅनी
पुण्याचे पेशवे

सागर's picture

10 Apr 2008 - 7:48 pm | सागर

प्रत्येकाकडे बाह्य मन आणि अंतर्मन असते.

अंतर्मन हे खूप शक्तिशाली असते. काही व्यक्तींमध्ये ते जास्त प्रमाणात जागृत असते. आणि त्याअनुषंगाने प्रत्येकाला तसे अनुभव येतात. बर्‍याच वेळा एखादी घटना घडत असताना असे जाणवते की ही घटना याआधी घडून गेलेली आहे वा आपण कोठेतरी अनुभवलेली वा पाहिलेली आहे. नेमका संदर्भ त्या वेळी अजिबातच आठवत नाही यालाच आपण आभास होणे असे म्हणतो. ही सगळी अंतर्मनाची कृपा असते.... भविष्यातील घटनांचा आपले अंतर्मन कसे अवलोकन करते याचे आजच्या विज्ञानाला अजूनही ठाम उत्तर गवसले नाही.

मी स्वतःही खूप वेळा अनुभव घेतला आहे. एखाद्या विचारावर मन पूर्ण एकाग्र झाले की त्या विषयी मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप उमटतात असे मी तरी अनुभवले आहे. थोड्या फार प्रयत्नानंतर याची प्रचिती कोणीही घेऊ शकतो असे माझे मत आहे.
पण यामागचे लॉजिक मात्र मला माहित नाही.

उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो. मागच्याच आठवड्यात घडला. मी अधूनमधून ऑनलाईन ट्रेडींग करतो. सहजच Tulsi Extrusions या कंपनीच्या शेअरच्या किंमतीकडे माझी नजर गेली. त्यावेळी तो ७८ रुपये होता. मी सहजच विचार केला की हा शेअर घ्यावा की न घ्यावा? लगेच मनात उत्तर उमटले की घेऊन टाक पण ४ दिवसांत विकूनही टाक.
तेव्हा सहजच रिस्क नको म्हणून फक्त ५० शेअर्स ७८ रु. या भावाने विकत घेतले. ४ दिवसांनी सकाळी सहज पाहिले तर शेअर ८६ ने होता.
मी सहज एक गम्मत म्हणून १०५ ही विक्रीची लिमिट दिली. अर्थात आकडा टाईप करण्याआधी मी मनात विचार केला होता की काय आकडा टाईप करावा बरे?... तर मनात १०५ हे उत्तर उमटले होते. त्याप्रमाणे मी १०५ ने सेल ऑर्डर दिली.

दुपारी लॉग-इन करुन पाहतो तर काय आश्चर्य मी दिलेल्या लिमिटवर शेअर विकले गेले होते. त्या दिवसाचा उच्च भाव १०७ रु. या शेअरने गाठला होता. फक्त ४ दिवसांत १३०० रुपये फायदा मला मिळाला. तेव्हापासून आज लिहिताना याच शेअरचा भाव परत ७८ वर आला आहे. अर्थात लाँग टर्म साठी हा शेअर चांगला आहे. पण आपला विषय भविष्याची चाहूल लागण्याचा आहे. अंतर्मन हा खरेच खूप गूढ विषय आहे. ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे प्रत्येकाचे मत तयार होते हेही तितकेच खरे...
असो...

(अधून मधून भविष्यदर्शन होणारा) सागर

अभय's picture

11 Apr 2008 - 6:34 am | अभय

सम़जा , मोटार च्।लवताना आपण सिग्नल ला वाट पहात आहात आणि आपण पलीकड्ल्या गाडीकडे पाहिले कि लगेचच तो ड्रायव्ह्रर आपल्या कडे पहातो. (अगदी न हालचाल करता पाहीले तरी !). खुप वेळा आपल्याला असे जाणवते की ए़खादा माणुस आपल्या कडे पहात आहे आणी आपण त्या दिशेला पाहिले तर तो खरच आपल्या कडे पाहात असतो. काहीजण याला टेलिपथी म्हणतात पण ऩक्की आणखी कोणतीतरी वेगळी शक्ती असली पाहीजे.

अभय

भोचक's picture

11 Apr 2008 - 1:13 pm | भोचक

दुर्गा भागवतांच्या एका आत्मकथनात्मक पुस्तकातही गूढ अनुभवांविषयी दिले आहेत. मध्य प्रदेशातील बस्तरच्या आदिवासी जिल्ह्यात आदिवासींवर संशोधन करताना आलेले 'गूढ' अनुभव त्यात आहेत. एकदा त्यांचे कपडे अचानक पेटले, ते ज्या बैलगाडीवरून जात होत्या ती पडली, पण त्या वाचल्या. शिवाय संशोधनापूर्वी त्या खूप आजारी होत्या. त्यावेळी संशोधन करू नये असे वाटत असताना एकदा झोपेत असताना त्यांना संशोधनाची आज्ञा झाली. उठून पाहिल्यानंतर त्यांच्या पलंगाची दिशाही बदललेली दिसली. त्याहून महत्त्वाचा अनुभव. प्लॅंचेटचा. प्लॅंचेटद्वारे त्यांनी त्यांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांच्याशी बोलणे केले. आणि माध्यम म्हणून असलेला मुलगा हा अमराठी होता. राजारामशास्त्री आणि दुर्गा भागवतांदरम्यान सुरू असलेला संवाद लेखी होता. तो मुलगा मराठी लिहिता येत नसताना मराठीत लिहित होता.
दुर्गा भागवतांसारख्या प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पहाणार्‍या विदुषीने हे अनुभव लिहिल्यानंतर तर मी चाट पडलो होतो. हे खरे मानावे की काय या संभ्रमात मी अजूनही आहे.
आणखी एक अनुभव. लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात एका मराठी लेखिकेने लेख लिहिला होता. त्यात अमेरिकेतील वास्तव्यात तिला आलेले अनुभव दिले होते. संबंधित लेखिका अमेरिकेत ज्या ठिकाणी रहात होती, त्याच्या आसपास एक अत्यंत जराजर्जर झालेल्या व्यक्तींचे एक केंद्र होते. तिला ही माणसे खूप वेगळी वाटत. एकदा काही कारणांमुळे ती या केंद्राच्या कॅम्पसमधून घराकडे यायला निघते आणि रस्त्यात अतिशय विचित्र अनुभव तिला यायला लागले. दरदरून घाम फुटतो आणि ती धावत घरात येते. घरांत येईतो असे अनुभव तिला येत होते. या लेखाची तार्किक संगती लावणारा तिच्या पतीचाही लेख त्यात होता. त्यात एक निष्कर्ष काढला, तो मला पटला. त्या केंद्रातील मंडळी मरणाच्या दारात होती. मरण केव्हा येईल याची वाट पहात होती. त्यामुळे त्यांच्यातल्या नकारात्मक शक्तींचा काही प्रभाव आजूबाजूच्या वातावरणात पडून त्या बाईंना अस्वस्थ, असुरक्षित वाटले असावे.

धमाल नावाचा बैल's picture

23 Mar 2009 - 12:42 am | धमाल नावाचा बैल

त्यामुळे त्यांच्यातल्या नकारात्मक शक्तींचा काही प्रभाव आजूबाजूच्या वातावरणात पडून त्या बाईंना अस्वस्थ, असुरक्षित वाटले असावे.

थापा आहेत ह्या. असं काही नसत सगळे मनाचे खेळ आहेत. बाईंनी प्रभुमास्तरां कडून समुपदेशन घ्यायला हवं सगळ ठीक झालं असतं ;)

विकास's picture

23 Mar 2009 - 1:09 am | विकास

लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात एका मराठी लेखिकेने लेख लिहिला होता. त्यात अमेरिकेतील वास्तव्यात तिला आलेले अनुभव दिले होते.

त्या लेखिकेचे नाव आहे पद्मजा फाटक. त्यांनी मॅसॅचुसेट्स राज्यातीलच ती आठवण दिली होती. मला वाटते पीबडी नावाच्या एका गावापासची ती आठवण होती.

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 Apr 2008 - 6:54 pm | डॉ.प्रसाद दाढे

दुर्गा भागवता॑च्या त्या पुस्तकाचे नाव सा॑गाल काय?

धमाल नावाचा बैल's picture

23 Mar 2009 - 12:36 am | धमाल नावाचा बैल

मला वाटतय ते पुस्तक रुतुचक्र.

विकास's picture

23 Mar 2009 - 1:06 am | विकास

दुर्गा भागवतांच्या त्या पुस्तकाचे नाव आहे, "आठवले तसे". हे पुस्तक मी वाचायला घेतले, कदाचीत वेगळा मूड असताना असेल अथवा काहीही... पण असे वाटले की आयुष्यात ज्या गोष्टी विसरायच्या असतात त्याच या बाईंनी आठवून का बरं लिहील्या असाव्यात? वास्तवीक दुर्गाबाईंच्या लेखनाचा मी फॅन आहे पण हे पुस्तक मी मधेच वाचायचे सोडून दिले.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Mar 2009 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll

गूढ शक्तिंविषयी नक्की काही निष्कर्श काढता येत नाहीत पण जंगलात येणार्‍या विविध अनुभवांवर नॅट जिओ ने बरेच संशोधन केले आहे. त्यातील काही.
वाघांबद्दलः
वाघ हा प्राणी शक्यतो एकटा रहाणारा आहे. तो सिंहाप्रमाणे समूहाने शिकार करत नाही. त्यामुळे शिकारकरण्याची जी पद्धत वाघांमधे आली आहे (म्हणजे वाघ उत्क्रांत होत असताना ) ती अशी. वाघ हा अत्यंत दबक्या पावलाने शिकार करतो. परंतु तो ज्या भक्ष्याच्या दिशेने जात असतो त्याच्यावर तो अतिसूक्ष्म ध्वनीलहरी सोडत असतो. त्या सूक्ष्म लहरी ह्या भक्ष्याच्या कानाच्या पडद्यांवर पडतात व ते संदेश मेंदूपर्यतही पोचतात. पण याचा परीणाम भक्ष्य सावध होऊन पळून जाण्यात न होता बरोबर उलटा होतो व ते भक्ष्य जागच्या जागी थिजून जाते. आणि या धक्क्यातून बाहेर पडे पर्यंत वाघ बराच जवळ येऊन ठेपतो. आणि वाघ तुलनेने सहज शिकार करु शकतो. जंगलात जाऊन आलेल्या बर्‍याच लोकाना असा अनुभव येतो की त्याना वाटते की आपल्या आसपास कुठेतरी वाघ आहे आणि खरेच अल्पावधीत तो वाघ त्याना दिसतो. याचे कारण वाघाच्या त्या सूक्ष्मलहरी त्यांच्या मेंदूने ग्रहण केलेल्या असतात. बर्‍याच लोकाना वाघ समोर दिसताच जागीच थिजून गेल्याचा, सर्वांगाला दरदरून घाम फुटल्याचा, बोबडी वळल्याचा अनुभव येतो याला कारण भिती हे असतेच पण त्यापेक्षा जास्त मोठे कारण मेंदूने या सूक्ष्म ध्वनीलहरी ग्रहण केल्यावर झालेली प्रतिक्षिप्त क्रिया हे असते असे संशोधकांचे मत आहे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मुक्ता २०'s picture

23 Mar 2009 - 9:44 am | मुक्ता २०

अंधश्रद्धा म्हणा किंवा थापा, हा ज्याचा-त्याचा प्र.!! पण माझ्या अनुभवावरुन सांगते कि मलाही जरा वेगळे अनुभव आले.

१३ वर्शांपुर्वी माझे आजोबा वारले. ते वारले त्याच्या १ आठवड्या आधी, एकदा अचानक फार भिती वाटली, दरदरुन घाम फुटला, ह्रुदयाचे ठोके वाढले, असं का होतय कहीच कळेना. पण कहीतरी विचित्रं होणार अशी सारखी हुरहुर मनाला होती. पुर्ण १ आठवडा अशीच हुरहुर, पण जेव्हां आजोबा वारले, त्या दिवशी ती हुरहुर थांबली.
त्या नंतर आमचे एक जवळचे नातलग वारले त्याआधी सुद्धा तसंच. मग मावशी वारली त्या आधी परत तेच.
आणि असं १-२ दा नसुन बरेचदा होतं तेव्हां जरा विचित्र वाटतं.

आता ह्याला काय म्हणायचं? :/