अरे याला कुणी मत देणार का मत ?
ह्या तुमच्या लोकनायकाला
दिल्लीत राहून सेवा करणार्या
ह्या गरिबांच्या कैवार्याला
कुणी मत देणार का मत ?
खूप पक्ष सोडले
खूप पैसे लाटले
खूप काहीच्या काही केलं
आणि सत्तेतल्या राक्षसाला
सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं.
बिच्चार्या ह्या राक्षसाला
कुणी मत देणार का मत ?
खातं गेलं, घर गेलं,
रुबाब गेला,गाडी गेली
आता मतदारसंघही बदलतोय
पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्याला
कुणी मत देणार का मत ?
निष्ठेला टोपी घातली
सुखी माणसाची वाट लावली
मंदीतही उधारीच चालली
कामांची तर वाट लावली
स्वप्नातही खुर्ची पाहणार्या
ह्या सत्तापिपासुला
कुणी मत देणार का मत ?
प्रतिक्रिया
6 Mar 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्याला
अगदी बरोब्बर शब्द वापरला आहेत असं वाटतंय. आमच्या ठाण्याच्या वॉर्डातला नगरसेवकमात्र आम्ही नाही मतं दिली तरी कामं करतो बर्याचदा.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
6 Mar 2009 - 10:44 am | दत्ता काळे
खर आहे, तरीही मत देणंदेखील अत्यंत आवश्यक आहे.
अवांतर : आमच्या पुण्यात बरीचशी मतदार मंडळी मतदानाच्यादिवशी मतदान न करता,सुट्टी लाभते म्हणून, सहकुटुंब पुण्याबाहेर फिरायला जातात, आणि निकाल्याच्यादिवशी दिवसभर टि.व्ही.समोर बसून, नावडते निकाल बघून, हळहळ व्यक्त करतात. नंतर पेपरमधून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर लिहायला मोकळे.
6 Mar 2009 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे
मतदान न करण्या बद्दल हित लिवलय.
यका गल्लीत येक मानुस -हात हुता. त्येचा थोबडा पाह्यला कि लोकांचा दिवस खराब जात असे. त्येला हित -हाउ नको तर म्हंता येईना. मंग लोकांनी त्येला निवडनुकिला हुबा केला आन लई कष्टानी निवडुन आन्ला. मंग सुस्कार सोडला आता पाच वर्ष या मान्साच त्वाँड पघायला नको.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Mar 2009 - 11:07 am | अवलिया
भारी किस्सा
=))
--अवलिया
6 Mar 2009 - 11:03 am | अवलिया
छान कविता !!
--अवलिया
6 Mar 2009 - 8:54 pm | क्रान्ति
मस्त कविता आहे.
क्रान्ति