इंग्रजीचा वापर करावा की नाही?

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in काथ्याकूट
23 Jan 2008 - 11:12 am
गाभा: 

"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" मिसळपावचे हे ब्रिदवाक्य.
मिसळपाव लोकप्रिय होत आहे,आणि दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे. आजकाल येणार्‍या नव्या सदस्यांच्या नावामधे मात्र इंग्रजीचा वापर अधिक दिसतो आहे. त्यातीलच एका सदस्याने तर इंग्रजीतूनच चारोळ्या आणि कविता टाकल्या होत्या. मराठीचा वापर करण्यासाठी इतकी सोपी सोय असताना देखील इंग्रजीचा वापर करणे योग्य आहे का? एखाद्या लेखामधे(संदर्भाकरीता) जरुर असल्यास इंग्रजीचा वापर ठिक आहे पण संपुर्ण लेख(किंवा इतर साहित्य) इंग्रजी भाषेत असावे का?
मिसळपाववर लोकशाही असली तरीही कमीत कमी मराठी भाषेच्या वापराविषयी नियम करण्यात यावा व नविन सदस्यत्व घेतानाच या नियमाची माहिती द्यावी. याकरीता 'सदस्यत्व घेताना' या बद्दलचे एक पान तयार करुन त्यात अशा नियमांची माहिती देता येईल.

(मराठीप्रेमी) -इनोबा

प्रतिक्रिया

रचनाद्लाल's picture

23 Jan 2008 - 3:51 pm | रचनाद्लाल

सर्वांना मराठी येते असे नाही. अणी येथे येउनच तर ते शिकणार ना.

विकेड बनी's picture

23 Jan 2008 - 4:31 pm | विकेड बनी

सर्वांना मराठी येते असे नाही. अणी येथे येउनच तर ते शिकणार ना.

शिकायला कोण नाही म्हणेल पण मग बिगरीतल्या पोरांनी पीएचडीचे प्रबंध तरी लिहू नये.

मराठी वाचा, त्यातील खुबी जाणा, प्रतिसादातून लिहायचा प्रयत्न करा आणि मग साहित्यनिर्मिती. उलटा प्रवास तुम्हाला झेपला तरी संकेतस्थळाला झेपायला हवा ना!

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 1:32 am | पिवळा डांबिस

प्रिय रचना,
'मरठी' नव्हे 'मराठी'
'अणी' नव्हे 'आणि'

आपला,
(मराठीमास्तर) पिवळा डांबिस

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Jan 2008 - 6:22 pm | ब्रिटिश टिंग्या

आय ऍग्री विथ यु इनायकभौ.
यु नो वुई ऑल आर मराठी अँड वुई शुड राईट इन मराठी ऑन मिसळपाव ;)

युवर्स,
- 'स्मॉल' टिंगी ;)

अवांतर - माझे वैयक्तिक मत : शक्यतो मराठीचाच वापर करावा.

अनिला's picture

24 Jan 2008 - 1:00 am | अनिला

अगदी बरोबर कित्तीवेळ लागला बाई तरी लिहावेच मराठीतच. त्याशिवाय गोडी लागणार नाही.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 1:26 am | पिवळा डांबिस

त्याचं असं आहे, की हा मिसळपाव आहे.

इतर काही मराठी संकेतस्थळांप्रमाणे ही बासुंदीपुरी (म्हणजे "तुम्ही गोड, आम्ही गोड") नाही.
अस्सल (आणि इरसाल!) मराठी आल्याशिवाय या स्थळावर निभाव लागणे कठिण!
इथे इंग्रजीमधुन लिहिणे (अगदीच निरुपाय झाल्याखेरीज) म्हणजे शेरेटन मध्ये जाउन मिसळ मागण्यापैकी आहे!!!

काय सरपंच! मी बोलतो ते सच्ची का झूठ?

(मराठमोळा) पिवळा डांबिस

इनोबा म्हणे's picture

24 Jan 2008 - 1:39 am | इनोबा म्हणे

हे अगदी बरोबर बोललास...
'डांबीस' कळले ....पण पिवळाच का ...?

(अस्सल मराठी) -इनोबा

कोणी भलतीच गीता हातात धरतो, त्यापेक्षा पिवळा डांबीस वाचलेला काय वाईट?

वगैरे, वगैरे.

हा बहुतेक "तुझे आहे तुजपाशी" नाटकातला उल्लेख असावा. पण नेमके "पिवळा डांबीस" हा सदस्यच सांगू शकेल.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 2:38 am | पिवळा डांबिस

आम्ही अनंत पारायणे केलेल्या पु. लं. च्या साहित्यात हा उल्लेख आहे!

पण त्याहिपेक्षा, फार फार वर्षांपूर्वी मामलेदाराच्या मिसळीच्या हाटेलात आम्हाला मिळालेली ती उपाधि आहे. ("साला दिसतो भट, पण पिवळा डांबिस आहे, रस्सा मागून खाईल!")
मिसळपाव डॉट कॉम ने ती आठवण जागी केली.

शिवाय नुसता डांबिस म्हणजे कुणी लफंगा वाटतो, पिवळा डांबिस म्हणजे "अर्क"! सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा!
तुमचं लक्ष घेतलं की नाही वेधून! :)

शेवटी नांवात काय आहे? उगाच नांव घ्यायचं "साहित्यसूर्य" आणि टाकायच्या "साहित्यलेंड्या", काय उपयोग?

लक्ष्मी बेचे उपल्या (गोवरया)
भीक मांगे धनपाल
अमरसिंह तो मर गये
भला बिचारा ठणठणपाळ

आपला (नम्र) पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 6:59 am | विसोबा खेचर

इतर काही मराठी संकेतस्थळांप्रमाणे ही बासुंदीपुरी (म्हणजे "तुम्ही गोड, आम्ही गोड") नाही.

हा हा हा! :)

खरं बोललास रे पिवळ्या डांबिसा, इतर काही संस्थळांवर आहे खरी अशी परिस्थिती! तुम्ही गोड, आम्ही गोड, तुम्ही शुचिर्भूत, आम्ही शुचिर्भूत, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्यसुसंस्कृत!

घ्या घालून तुमची ती सभ्यता तिच्यायला! मिसळपावचं काहीच म्हणणं नाही! :))

बरं, ते असो..!

अस्सल (आणि इरसाल!) मराठी आल्याशिवाय या स्थळावर निभाव लागणे कठिण!
इथे इंग्रजीमधुन लिहिणे (अगदीच निरुपाय झाल्याखेरीज) म्हणजे शेरेटन मध्ये जाउन मिसळ मागण्यापैकी आहे!!!

अगदी खरं! मिपावर शक्यतोवर देवनागरीतच लिहावे. अगदी नाईलाज असेल तेव्हाच रोमन अक्षरांचा उपयोग करावा. तसेच, देवनागरीतून लिहितानादेखील शक्यतोवर मराठी शब्दच वापरावेत. अर्थात, 'इमेल' करता 'विरोप', किंवा 'डेटा' करता 'विदा', असले चमत्कारिक शब्द वापरण्याचा द्वारकानाथी अट्टाहास करू नये! :)

काय सरपंच! मी बोलतो ते सच्ची का झूठ?

एकदम सच्ची!

आपला,
मथुरादास जलंत्री! :)

ऋषिकेश's picture

24 Jan 2008 - 1:31 am | ऋषिकेश

मी तर म्हणतो इंग्रजी लिपित लिहायची सुविधाच नको. म्हणजे प्रश्नच नाहि. केवळ दुवे डकवता आले पाहिजेत.

(देवनागरी) ऋषिकेश

दीपा॑जली's picture

24 Jan 2008 - 2:39 pm | दीपा॑जली

आपल्या मराठी माणसालाच सर्व लो॑का॑सअमोर मराठी बोलायची लाज वाटते.
आपणच आपल्या भाषेच्या र्‍हासास कारणीभूत आहोत.

बहुरंगी's picture

24 Jan 2008 - 4:16 pm | बहुरंगी

खर आहे मंडळी,
केवळ मराठीतुन लिहायला मिळत म्हणुन तर इथे आपण सगळे जमतो. हिंदी, इंग्रजी वगैरे सोय ठेवली तर न जाणो इथे पण परप्रांतियांची घुसखोरी होईल.
मिपा वर आल्या पासुन तर इतकं मस्त वाटत की आजकाल प्रथम दर्ज्याच्या डब्यातुन प्रवास करताना चुकुन कधी वादावादीचा प्रसंग आलाच तर भो*/%$#त गेल्या इतर भाषा, सरळ मराठी तुनच सुरुवात आणि शेवट देखिल. समोरचा जर कुणी गुज्जु, भैय्या किंवा अण्णा असेल तर अजुनच मज्जा येते. करा प्रयत्न करुन कधी योग आला तर.
बर, मिसळ पावला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हो?
आपला,
बहुरंगी मिसळे