नारळ आणि र द्दी कायमच एकत्र का?

अप्पासाहेब's picture
अप्पासाहेब in काथ्याकूट
19 Sep 2007 - 4:21 pm
गाभा: 

नारळ आणि र द्दी कायमच एकत्र का? नारळाचा आणि रद्दीचा असा काय संबंध आहे कि जे कायमच एकत्र दिसतात?

प्रतिक्रिया

टीकाकार-१'s picture

19 Sep 2007 - 4:25 pm | टीकाकार-१

विस्त्रुत लिहा नाहीतर तुमचे account delete केले जाईल!!!!!
बाकी विषय चर्चेला बेस्ट आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2007 - 4:57 pm | प्रकाश घाटपांडे

रद्दी विकली कि त्या पैशातून नारळ लगेच तिथेच मिळण्याची सोय आहे ती.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 5:04 pm | विसोबा खेचर

रद्दी विकली कि त्या पैशातून नारळ लगेच तिथेच मिळण्याची सोय आहे ती.
प्रकाश घाटपांडे

मस्त! :)

माझंही उत्तर हेच आहे रे आप्पा!

तात्या.

अप्पासाहेब's picture

19 Sep 2007 - 5:20 pm | अप्पासाहेब

पण नारळ् च का? रद्दी च्या पैशातून नारळा खेरीज ईतर ही ब-याच वस्तु घेता येतील ना? मिसळ हाणता ये ईल , शीणेमा बघता ये ईल , नारळ् च का?

आजानुकर्ण's picture

19 Sep 2007 - 7:06 pm | आजानुकर्ण

मिसळीच्या हॉटेलात मालकांनी विकत घेतलेली रद्दी जर गल्ल्यावर ठेवली तर मिसळीच्या तिखटपणाबद्दल भलभलत्या शंका लोकांना येतील म्हणून हाटेलात ती ठेवत नाही.
आणि शीणेमाची तिकीटे मिळतात त्या खिडक्यांमधून हात आत जात नाही तिथे पेपरची रद्दी कशी आत जाईल?

म्हणजे राउंड ऑफ एलिमिनेशन ने नारळच योग्य असे सिद्ध करता येईल.

काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2007 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्पासाहेब,
चर्चा प्रस्तावात आपणास काय म्हणायचे आहे,हे समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे ही एक साधारणतः अपेक्षा असते आणि दुसरे या चर्चेच्या निमित्ताने या विषयी आपली भुमिकाही मांडली पाहिजे, त्याच बरोबर दिले तर काही संदर्भ,दुवे,काही त्या विषयाच्या संबंधी मते
म्हणजे काय होते,चर्चेत सहभागी होणा-या सदस्यांना विषय समजून त्यावर आपले मत प्रदर्शीत करता येईल असे वाटते.
सदरील चर्चा प्रस्ताव मला तरी निटसा कळलेला नाही आपण नक्की त्यात दुरुस्त्या करुन किंवा अधिक विस्तृतपणे हा विषय मांडावा किंवा मांडला असता तर मला हा चर्चाविचार समजला असता किंवा मत मांडता आले असते असे वाटते. आपण हे सर्व जाणता तरीसुद्धा राहवले गेले नाही म्हणून हा लेखन प्रपंच.!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीकाकार-१'s picture

19 Sep 2007 - 5:28 pm | टीकाकार-१

डा. साहेब ,
बहुधा अप्पासाहेबन्ना काय प्रश्न पडला आहे ते आपल्या ध्यानात आलेले दिसत नाहि.
यावर सन्दर्भासहित स्पश्टिकरण देण्याची गरज आहे का?

सहज's picture

19 Sep 2007 - 5:46 pm | सहज

टीकाकार-१ तुमच्या आणी अप्पासाहेबच्या तारा (वेव्ह लेन्ग्थ) जूळत असतील हो. तुम्हाला काय समजले व काय उत्तर तुम्ही देऊ शकता ते लिहा की जरा म्हणजे चर्चा अजून रंगात येईल, दर्जेदार होइल.

बर ते मगाशी कायतरी करणार म्हणाला होता, ते जमल का अडकलय अजून?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2007 - 6:01 pm | प्रकाश घाटपांडे

रद्दी व बिअरच्या मोकळ्या बाटल्या विकुन भरलेली बिअर मिळत असे.
प्रकाश घाटपांडे

अप्पासाहेब's picture

20 Sep 2007 - 10:20 am | अप्पासाहेब

रद्दी व बिअरच्या मोकळ्या बाटल्या विकुन भरलेली बिअर मिळत असे...

ह्ये बरिक पटलं हा, आमी कालीजात अस्ताना असेच करत होतो.

अप्पासाहेब's picture

20 Sep 2007 - 10:26 am | अप्पासाहेब

चर्चा विषय समजला नाही !....

जाउद्या हो, नाही चर्चा विषय कळला ता नाय कल्ला , त्यापायी लांब चेहरा करुन , यवडी मोट्टी पर्तीक्रीया कशापायीं..

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 10:29 am | टीकाकार-१

सहमत

प्रभाकर पेठकर's picture

1 Feb 2008 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर

'नारळ' 'रद्दीच्या' भावात मिळत होते तेंव्हा ही प्रथा सुरू झाली असणार.

'घरात नुसते पेपर वाचत बसता आणि घरातली रद्दी वाढवता. जा.. फिश करी साठी जरा नारळ घेऊन या' असा आळशी नवर्‍यांना (त्यांच्या) बायकोने सज्जड दम दिल्यावर नाईलाजाने नारळ आणायचाच आहे तर एकाच फेर्‍यात रद्दीही विकून येऊ. असा विचार आळशी नवरे करीत असावेत आणि अशाच कुणा नवर्‍याच्या सुचवणीनुसार रद्दीच्याच ठीकाणी नारळ ठेवले तर आपल्याकडे ही आळशी गिर्‍हाईके जास्त येतील अशा विचारात कुणा रद्दीवाल्यानेच ही प्रथा पाडली असावी. (असाही एक संशय आहे.)

रद्दी विकली तर पैसेही मिळाले, त्यातल्याच थोड्या पैशात नारळ घेतला, स्वयंपाकात वापरला आणि करवंट्या बंबात पाणी तापवायला उपयोगी पडल्या अशा बहुगुणी विचारातुनही ही प्रथा जन्माला आली असण्याची शक्यता आहे.

एखाद्याला नोकरीत 'नारळ' मिळणे म्हणजे समाजात तो 'रद्दी' भावाचा होणे असे एक समीकरण फार फार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावे असे वाटते.

एखाद्या मठ्ठ माणसाच्या डोक्यास 'नारळ' म्हणण्याची आपल्यात पद्धत आहे. ह्यालाच 'अर्वाच्य' भाषेत संबोधणे असेही म्हणतात. ....म्हणजेच 'नारळ' म्हणजे 'अर्वाच्य'.... म्हणजेच 'वाचण्यालायक नाही असे' ....म्हणजेच 'रद्दी' असाही संबंध असू शकतो.

'नारळ' झाडावर तयार होतो आणि 'रद्दी'चे कागदही झाडापासूनच बनतात. म्हणजे तसे दोघेही नात्यातलेच.

सत्कारमूर्तींना शाली बरोबर 'श्रीफळ' म्हणचेज नारळ देतात. नंतर त्याच सत्कारमूर्तींना कोणी 'रद्दीच्या' भावातही विचारत नाही. (ही एका सत्कारमूर्तीनेच माझ्याजवळ व्यक्त केलेली खंत आहे.)

असे 'नारळ' आणि 'रद्दी'चे घनिष्ठ नाते आहे.

धमाल मुलगा's picture

1 Feb 2008 - 5:58 pm | धमाल मुलगा

ओsss पेठकर...आयला अहोss, कुठून कुठे पोचवलत हो !!!
धन्य.. धन्य आहात बुवा तुम्ही. लय भारी...एकदम खल्लास लिहिलय.

अप्पासाब, आता इचाराल का पुन्न्या॑दा ?

बाकी जिथे आम्ही रद्दी देतो, तो दुकानदार 'झेरोक्ष' काढून देतो. आता 'रद्दीचीपण का?' असा बाळबोध प्रश्न आम्हालाही पडला होता..पण त्याच्या ता॑बारलेल्या डोळ्या॑कडे पाहून आम्ही तो गपचुप गिळला, हो, नाहीतर तो आपल्याच गालावर 'झेरोक्ष' काढायचा..

- अजूनही गो॑धळलेला
ध मा ल

सहमत आहे! :)
शून्यातून (नारळातून?) ब्रम्हांड कसं निर्माण झालं ते आत्ता समजलं!!
पण पेठकरांनी लिहीलंय मात्र झकास!!
गोंधळलेल्या मुलाचा सोबती,
पिवळा डांबिस

केशवराव's picture

2 Feb 2008 - 11:53 am | केशवराव

धमाल उत्तर दिलेत साहेब. दिल खूश !

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 2:25 pm | विसोबा खेचर

प्रभाकरशेठ,

रद्दी विकली तर पैसेही मिळाले, त्यातल्याच थोड्या पैशात नारळ घेतला, स्वयंपाकात वापरला आणि करवंट्या बंबात पाणी तापवायला उपयोगी पडल्या अशा बहुगुणी विचारातुनही ही प्रथा जन्माला आली असण्याची शक्यता आहे.

हे बाकी मस्त! :)

आपला,
(मल्टिपर्पज) तात्या.

वा! काय झक्कास उत्तर दिलय.मजा आली जुनी 'रद्दी' वाचताना.

प्राजु's picture

1 Feb 2008 - 8:26 pm | प्राजु

म्हणतात.. "नारळ आणि मुलगा कसा निघेल हे सांगता येत नाही". मुलगा जर प्रभाकर रावांनी सांगितल्याप्रमाणे "नारळच" निघाला तर त्याने न वापरलेली वह्या पुस्तके रद्दीतच जातात.
म्हणून बहुधा नारळ आणि रद्दी एकाच ठिकाणी..

-(नारळाची आई)प्राजु

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2008 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर

श्री. धमाल मुलगा, श्री. पिवळा डांबिस, श्री. केशवराव आणि प्राजु मनःपूर्वक धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

4 Feb 2008 - 11:55 am | धमाल मुलगा

प्रभाकर (काका / राव / शेठ / दादा...योग्य ते जोडून घ्या, वय ठाऊक नसल्यामुळे अस॑ कराव॑ लागल॑, असो.)

हे बघा, मी निक्षुन सा॑गतोय, तुम्हाला चा॑गल॑ वाटो अथवा वाईट फिकीर नाही आपल्याला....

माझ॑ नाव "धमाल मुलगा" अन् त्याला "श्री" ??? पुन्हा अस॑ कराच् मग बघा, तुमच्या एका तरी पोष्टला प्रतिसाद देतो का ते !
अहो धमाल म्हणा, मुलगा म्हणा, धमाल्या म्हणा, धम्या म्हणा, मुलग्या म्हणा, मुला म्हणा, कार्ट्या म्हणा...पण हे असल॑ श्री वगैरे जोडुन साल॑ परक॑ नका बुवा करू !

बाकी..डा॑बिसकाका, तुमचा गो॑धळ सुटला की मला पण एकदा सा॑गा बर॑ का. डोस्क्याची पार म॑डई झालीये :)

प्राजुताई, ह.ह.पु.वा. ...अमेरिकेत आहेस, उगाच लेकाला "नारळ" वगैरे म्हणालेल॑ चालत नाही म्हणे तिकडे..पोट्टे फोलिसात ख॑प्लिट देत्यात म्हन॑... सा॑बाळुन :)

आपला,
- (हक्काने आपलेपणा मागुन घेणारा) ध मा ल.

पिवळा डांबिस's picture

7 Feb 2008 - 12:05 am | पिवळा डांबिस

बाकी..डा॑बिसकाका, तुमचा गो॑धळ सुटला की मला पण एकदा सा॑गा बर॑ का. डोस्क्याची पार म॑डई झालीये :)

आरं त्येला 'बादरायण सम्बन्ध' का काय तरी म्हंत्यात. आता परमपूज्य पेठकरमहाराजच काय त्ये खरं समजावून सांगत्याल!
ह्यो डांबिस तुला काय सांगनार? त्ये काय इतकं सोपं हाय का? चार बुकं वाचून त्ये समजत नसतंय रं माज्या राजा! त्येला म्हंजे साधना करावी लागत्येय! तुज्या-माज्या डोस्क्याबाहीरलं काम हाय बघ! :)

प्राजुताई, ह.ह.पु.वा. ...अमेरिकेत आहेस, उगाच लेकाला "नारळ" वगैरे म्हणालेल॑ चालत नाही म्हणे तिकडे..पोट्टे फोलिसात ख॑प्लिट देत्यात म्हन॑... सा॑बाळुन :)

नाय तर काय! आनी बाबा, फोलीस परवाडलं, त्ये काय येत्याल, दम (किंवा दोन लाफे) देत्याल आनी निघूनशान जात्याल. आरं पन थिकडं आमिरिकंत प्वारं वकील घेऊन आयबापाला कोरटात खेचत्यात म्हनं! अवं प्राजुबाई, सांबाळा! कायतरी बोलून जाल आनी लेक उद्या तुमाला (की तुमच्यावर?) "सू" करंल! थिकडं घाम गाळून ज्ये काय शिलकीला टाकलं आसंल त्ये समदं वकीलाच्या आनी प्वाराच्या नांवावर करून द्यायला लागंल हो!

परमपूज्य पेठकरम्हाराज्यांच्या निरूपनाची वाट बघनारा,
पिवळा डांबिस

बापु देवकर's picture

4 Feb 2008 - 6:39 pm | बापु देवकर

चर्चेची मिसळ झकास जमली आहे.....

प्राजु's picture

7 Feb 2008 - 9:20 am | प्राजु

सध्या मुलगा ४ वर्षांचा आहे. त्याला नारळ म्हणजे काय माहिती असले तरी रद्दी म्हणजे काय हे माहीती नाहीये. आणि तसेही इथे नारळ फोडायचे प्रसंग फार कमी येतात त्यामुळे नारळावर घाव घालून किंवा नारळ धोंड्यावर(धोंडोपंत काका तुम्ही नव्हे, हं!) आपटून फोडायचा असतो हे त्याला माहिती नाहिये.. त्यामुळे जोपर्यंत ते माहिती नाही तोपर्यंत हे चालून जाईल... :))))

- प्राजु

धमाल मुलगा's picture

7 Feb 2008 - 11:26 am | धमाल मुलगा

प्राजुताई,
नारळ फोडायचे प्रस॑ग फार कमी येतात,म्हणजे...ओल्या नारळाच्या कर॑ज्या, वड्या, लाडू (म्म्म..तो॑डाला पाणी सुटल॑) इ.इ. प्रकार बिचार्‍याला क्वचीतच् नशिबी येत असतील नाही? अर्थात, ईकडुन पाठवलेल॑ डबाब॑द प्रेम येत असेलच् पण...आईच्या हातचे असले पदार्थ, ते ही ताजे ताजे खाण्यात जी मजा आहे ती त्यात नाही.
(कस॑ जळवल॑? :)) ...)

डा॑बिसकाका,
ह्ये मातर खर॑ हा.येकदम सोळा आणे राईट्ट बोललासा तुमी. तेच्यामारी, ही बुक॑ वाचली आन पाक वाया गेलो राव.

ह.भ.प. पेठकरमहाराज पुनेकरा॑च्या चरनी सादर द॑डवत.
म्हाराज, आमी बी तुमच्या किर्तन-परवचनाला याच॑ म्ह॑तो. त्येवड॑च मोलाच॑ चार बोल कानाव पडत्याल. कस॑?

आप्पासाहेब, या तुम्हीपण महाराजा॑च्या निरुपणाला, नारळ, रद्दी, करव॑ट्या, बियरच्या बाटल्या (रिकाम्या+भरलेल्या) सगळ्याच प्रश्ना॑चे निकाल लागतील, काय?

प्रभाकर पेठकर's picture

7 Feb 2008 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर

श्री. धमाल मुलगा,

ह.भ.प. पेठकरमहाराज पुनेकरा॑च्या चरनी सादर द॑डवत.
म्हाराज, आमी बी तुमच्या किर्तन-परवचनाला याच॑ म्ह॑तो. त्येवड॑च मोलाच॑ चार बोल कानाव पडत्याल. कस॑?

आमच्या किर्तन्-प्रवर्चनात 'तीर्थ-प्रसाद' आधी वाटला जातो. म्हणजे मग 'बुवा आणि भक्त' असा दुजाभाव उरत नाही. तुम्ही आमचं प्रवर्चन ऐकायचे आणि आम्ही तुमचे.

'श्री.'अशाकरीता की आमच्या लेखी सगळेच वंदनिय आहेत. अर्थात तुम्हीही. मिसळपाववर अभिव्यक्ती स्वात्तंत्र्य आहे. आम्हाला हे स्वातंत्र्य जरूर असो द्यावे. प्रेमानेही, गळचेपी करू नये. आमचा श्वास घुसमटेल.
धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

7 Feb 2008 - 2:00 pm | धमाल मुलगा

बुवा, तसे आम्ही प्रवचनाला जातो ते तिर्थ-प्रसादाच्या ओढीनेच. आता तुम्हीच म्हणताय तर आपली आज्ञा शिरसाव॑द्य !
बाकी ही दुजाभाव नष्ट करण्याची कल्पना भन्नाट हा॑.

'श्री.'अशाकरीता ....हे स्वातंत्र्य जरूर असो द्यावे. प्रेमानेही, गळचेपी करू नये. आमचा श्वास घुसमटेल.

अरेरेरे...हे अस॑ त्रा॑गड॑ आहे काय? असो, क्षमा करा, जरा जास्तच लगट झाली. पुन्हा अशी गुस्ताखी होणे नाही.

अवा॑तरः पण तुम्हाला बुवा म्हणल॑ तर चालेल का? :)) बघा ह॑, नेहमी बुवा म्हणून हाक मारेन, अर्थात...चालणार असेल तरच.

आपला
- (तिर्थ-प्रसाद, मौलिक ज्ञानासाठी आशाळभूत) ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

7 Feb 2008 - 5:04 pm | प्रभाकर पेठकर

असो, क्षमा करा, जरा जास्तच लगट झाली.

अजिबात नाही. क्षमा कसली? मित्रा-मित्रांमध्ये (आणि मित्र-मैत्रीणींमध्येही..) सप्रेम जवळीक असावीच. तिथे 'लगट' हा शब्द मात्र सजत नाही.
पण तुम्हाला बुवा म्हणल॑ तर चालेल का?

''श्री.'अशाकरीता की आमच्या लेखी सगळेच वंदनिय आहेत' तेंव्हा तीच उपाधी आम्हास भावते. बाकी आपली मर्जी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपणासही आहे.

धमाल मुलगा's picture

7 Feb 2008 - 5:23 pm | धमाल मुलगा

आम्ही आपणास दुखावु ईच्छीत नाही.

श्री. पेठकर, आपला मोकळेपणा अन् त्यातूनही मनाचा स्वच्छपणा भावला.

आपला,
- ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

7 Feb 2008 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. धमाल मुलगा.
प्रत्यक्ष कधी भेट झाली तर (ती ह्या आधीच झाली आहे असे वाटते, असो.) ओळख द्या. ह्या विषयावर जास्त विस्ताराने बोलू.

dadadarekar's picture

13 Jul 2015 - 7:00 am | dadadarekar

छान