( मी लिहिल्यावर पळुनी जातील -- )
प्रेरणा - पुष्कराज यांची कविता मी गेल्यावर वि़झुनी जातील--
------------------------------------------------------
मी लिहिल्यावर पळुनी जातील
शब्ददीप आकाशी
मी लिहिताना थांबून राहील
शाई तशी पेनाशी
मी लिहिल्यावर प्रतिसादही
कोणी द्यायचे नाही
मी लिहिल्यावर कोणी तळपूनी
उत्तर द्यायचे नाही
मी मी माझे खुळ्या कल्पना
किती काढसी धागे
लिहिल्यानंतर पृष्ठावरती
दोन क्षणांतच मागे
नवलेखांची ही पहा अवस्था
काय होतसे आहे
गमनानंतर कशास वेड्या
नाव आपुले राहे
कौलामध्ये विषय संपला
खरडीमध्ये नाती
लिहून लिहून आज जाहली.
विचारांची माती
तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
लिहिल्यानंतर प्रतिसादतो
कोणी तरी देणार
----------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रतिक्रिया
21 Feb 2009 - 11:14 am | सुक्या
लिहिल्यानंतर प्रतिसादतो
कोणी तरी देणार
दिला भो प्रतिसाद दिला . . . पळतो आता.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
21 Feb 2009 - 4:35 pm | लिखाळ
>कौलामध्ये विषय संपला
खरडीमध्ये नाती
लिहून लिहून आज जाहली.
विचारांची माती <
हा हा हा ...
अरे वा .. मस्त आहे विडंबन..
-- लिखाळ.
21 Feb 2009 - 4:47 pm | यशोधरा
मस्त विडंबन!
21 Feb 2009 - 11:16 pm | मीनल
नादमय आहे.
मजा आली वाचून.
मीनल.
21 Feb 2009 - 11:32 pm | प्राजु
मजा आली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Feb 2009 - 8:57 am | संदीप चित्रे
एकदम झ्याक :)
22 Feb 2009 - 12:25 pm | अवलिया
मस्त :)
--अवलिया
22 Feb 2009 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता मस्त आहे, पण तुमच्या लिखाणासाठी नॉट ऍप्लिकेबल आहे. कोणाच्या लिखाणासाठी आहे ते कविलाच विचारा. ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
22 Feb 2009 - 8:28 pm | शितल
मस्त विडंबन. :)