असंच एक स्वप्न.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Feb 2009 - 7:42 am

मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती. सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे. काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.हिरवी गार बेडकांची डोकी आजूबाजूला प्रकट होत होती.काही सूर्यस्नान घ्यायला डोकं वरकरून राहायची तर काही कुणाची चाहूल लागल्याचा भास होऊन झटकन डबक्यात डुबकी मारीत होती.

एक तरतरीत आणि अक्कलमंद बेडूक काळसर खडकाचा आधार घेऊन वर बसून रात्रीचं जागरण विसरून पेंगत बसला होता.
मी त्या बेडकाच्या अंमळ जवळ बसून कुतहलाने त्याच्याकडून शिकायला बघत होतो.हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत.हा बेडूक आणि ह्याचे भाऊबंद बरेच वर्षात एकत्रीत मी पाहिले.आम्ही दोघे एकमेकाशी काही न बोलता निळ्या आकाशाच्या क्षीताजाकडे बघत असता मधूनच
डबक्यातल्या माशांची पाण्यातली धक्काबूक्की बघत होतो.शेवटी तो चाणाक्ष्य बेडूक माझ्याशी बोलायला लागला,
"माणसं ह्या ओढ्याकडे येत जात असतात."
पुन्हा एक बगळ्यांची रांग आवाज करीत आमच्या डोक्यावरून निळ्या क्षितीजाकडे झुकली.
सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत ह्याचा विचार येऊन आम्ही दोघे दुःखी आणि हताश झालो.
"प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे.काहीना त्यांची वाट अजून ध्यान्यात आहे."
असं मी बेडकाला म्हणालो.
"मी जिथे जिथे जातो तेव्हा ह्या लोकाना हूडकून काढायाला प्रयत्न करतो."असं मी म्हणालो.
त्याने मान हलवून संमत्ती दिली.

दिवस उतरंडीला जात होता.परत भेटायचं ठरवून आम्ही वेगळे झालो.एकमेकाचे आभार मानले.मी मागे वळून पाहिल्यावर तो अजून त्या खडकावर होता.मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.आणि तो बेडूक ते पहात होता.
पण हे असंच एक स्वप्न होतं.

श्रीकृष्ण सामंत

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

11 Feb 2009 - 7:56 am | धनंजय

आवडली.

शशिधर केळकर's picture

11 Feb 2009 - 1:45 pm | शशिधर केळकर

काका यात स्वप्न काय ते कळले नाही!
विषयही पोचला नाही.
बेडूक चाणाक्ष का? आणि काय मुद्दा आहे सर्व मिळून?
अचानक चर्चा संपुष्टात का आणली?

योगी९००'s picture

11 Feb 2009 - 2:20 pm | योगी९००

सामंतसाहेब,

जरा लेख अर्धवट वाटला आणि म्हणून डोक्यावरून गेला.

तुमचा आणि बेडकाचा संवाद २-३ वाक्यातच संपला त्यामुळे पुर्ण विषय कळाला नाही. कदाचित तुमचे स्वप्न अर्धे राहिले असेल किंवा माझी आकलनशक्ती कमी पडत असेल.

खादाडमाऊ

ब्रिटिश's picture

11 Feb 2009 - 2:59 pm | ब्रिटिश

>>>हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत

ह्या बेडकांसाटी कयतरी केला पायजेल. क बोल्ता ?

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

ढ's picture

11 Feb 2009 - 3:25 pm |

पण....

मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.

हे वाचून काही भलतंच आठवलं.

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Feb 2009 - 10:06 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो धनंजय,
शैली वेगळी वाटली पण आवडली हे वाचून आनंद झाला.

हलो शशिधर,
"सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत "
दिवसभर हा विचार मनात येऊन,
"मनी असे ते स्वप्नी दिसे" असं झालं.
सूर्यस्नासाठी तो बेडूक खडकावर बसलेला पाहून इतर बेडकात तो जरा चाणाक्ष वाटला.
स्वप्नच होतं ते अचानक जाग आली आणि चर्चा संपुष्टात आली.
"प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे."
हा मुळ मुद्दा डोक्यात होता.

हलो खादाडभाऊ,
आपली आकलनशक्ति मुळीच कमी पडलेली नाही.माझं स्वप्नच अर्धवट राहिलं हे खरं आहे.जसं आठवलं तसं लिहिलं झालं.स्वप्नच ते.

हलो ढ,
"नागवा" ह्या शब्दाने आपल्याला "भलतंच" वाटलं का?
"उजाड" ह्या अर्थाने तो शब्द थोडा इंप्रेसीव्ह करायचा होता.एकाएकी सर्व सपाट झालेलं पाहून तसं वाटलं.

ब्रिटिश सकट आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार
लेखापेक्षा प्रतिक्रियेला प्रतिसादच जास्त लांबला आहे.पण असो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com