सोळावं वरीस धोक्याचं..!

पारोळेकर's picture
पारोळेकर in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 4:16 pm

तारूण्याच्या दिशेने झुकणारे वय... सोळावे वरीस !
तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात.
एका बाजुला अभ्यासाचा ताण व दुसरीकडे 'तो' तिच्या व 'ती' त्याच्या, आठवणीत रात्र जागून काढत बसावं लागते.

या वयात जे काही होतं ते तरूण-तरूणींनी अनुकरणातून शिकले असतात.
कारण त्यांना या गोष्टीचा फारसा अनुभव आलेला नसतो.
तरूण्याची पहिली पायरी समजणार्‍या सोळाव्या वर्षात स्वत:ला जेवढे जपले तेवढे कमी असते.
या वयातच तरूण-तरूणी अधिक घसरतात.
ज्याला सावरता आले़ त्याचेच करियर उज्ज्वल होते. नाही तर 'घडीचे घड्याळ' व्हायला वेळ लागत नाही.

घाई गडबडीत घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापाशिवाय काहीच देत नाही.
सोळ्याव्या वयाच 'तो' तिच्या व 'ती' त्याच्याकडे पहाणे स्वाभाविक आहे. परंतु यात स्वत:चा तोल सांभाळणे अधिक महत्त्वाचे असते.
स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मात्र ती पाहण्याचाही कुठला काळ असतो याचे भान तरूण-तरूणींनी ठेवले पाहिजे.
या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात.
त्यामुळे घरच्याचा विरोध पत्करावा लागतो. एका बाजूला करियर तर दुसर्‍या बाजूला 'प्रेम' अशी 'द्विधा अवस्था' कमी वयात डोके दुखी होऊन बसते.
एक बाजूला 'आड तर दुसर्‍या बाजूला विहीर' अशी अवस्था निर्माण झाल्याने तरूण-तरूणी घरच्याच्या नकळत अभ्यासाच्या काळात 'प्रेमाचे रंग' उधळत असतात.

आता पुढे काय करायचे? हा प्रश्न तरूण- तरूणींना भंडावून सोडतो.
आपलं गुपीत घरच्यांना कळले तर काय होईल? अशा दडपणामुळे तरूण- तरूणीमध्ये वैफल्य निर्माण होते.
त्यामुळे समाजात मनोरूग्णांची संख्या सतत वाढत आहे.

'प्रेम' करणे चुकीची गोष्ट नाही. परंतु स्वत:च्या पायावर उभे राहून 'प्रेम' केवळ करायचे नाही तर ते शेवटपर्यंत निभवायचे असते. कारण प्रेम करणे सोपे आहे, मात्र ते निभावणे कठीन.

व्यक्तीला प्रत्येक वयात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे घाईत घेतलेला निर्णय भविष्याची डोके दुखी होता कामा नये. त्यामुळे सोळाव्या वर्षात तोलून मापून पाऊल उचलले पाहिजे.

सोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी-
* आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. शिक्षणच आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडेल.
* लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेक बुध्दीचा वापर करा.
* काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या.
* आपले चुकीच्या दिशेने पडणारे एक पाऊले ही कुटुंबासाठी नुकसानदायी ठरू शकते.
* तारूण्याच्या उंबरठ्यावर चूकीचा निर्णय किंवा चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल भविष्य उध्दवस्त करू शकतो.
* आपल्या मनातील गोष्ट आई- वडीलासोबत शेयर करा, त्याने तुमचे मन हलके होईल व अभ्यासात तुमचे मन रमेल.

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

5 Feb 2009 - 4:22 pm | सखाराम_गटणे™

तुम्ही काय केले हो सोळाव्या वर्शी?

पारोळेकर's picture

5 Feb 2009 - 4:30 pm | पारोळेकर

आपलं नेहमीचंच ...नाडी बांधण्यात व्यस्त!

जो पिणार तोच सोनार!

दशानन's picture

5 Feb 2009 - 4:32 pm | दशानन

अगदी हाच प्रश्न मनात होता !

आज पहिल्यांदा गटण्याचे धन्यवाद करावे असा प्रतिसाद गटण्याने लिहला !

अभिनंदन गटणे..

कुंपुबाज मित्रांनो !

चालू व्हा आता !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

झेल्या's picture

5 Feb 2009 - 4:30 pm | झेल्या

१. रिटायरमेंटचं वय धोक्याचं
२. २५ वं वय बोक्याचं
३. वय काय डोक्याचं?
४. (नेमकं) कोणतं वय मोक्याचं?

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

नीधप's picture

5 Feb 2009 - 4:32 pm | नीधप

"आई आई मी प्रेम करू?"
"अरे गाढवा आधी गृहपाठ पूर्ण कर क्लासचा..!"

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पारोळेकर's picture

5 Feb 2009 - 4:33 pm | पारोळेकर

सुंदर सुंदर चेहर्‍यामध्ये माणसाचे जगणेच धोक्याचं झाले आहे. जरा सांभाळून!

सखाराम_गटणे™'s picture

5 Feb 2009 - 4:36 pm | सखाराम_गटणे™

सोळावं वरीस कामाचे..!

असे विडंबण येयील काही दिवसांनी

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2009 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

आधि हे सांगता
* लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेक बुध्दीचा वापर करा.
आणी मग हे सांगता
* काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या.
हे हे हे आपले लेखन वाचुन ह ह पु .. आपल्या लेखात 'बुवा' दिसले हे हे हे...

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नवनाथ's picture

5 Feb 2009 - 5:12 pm | नवनाथ

घडीचे घड्याळ म्हणजे काय हो?

गोमट्या's picture

5 Feb 2009 - 5:26 pm | गोमट्या

'घडीचे घड्याळ' म्हणजे काय हो?

'घडीचे घड्याळ' = 'बरबादि' असावं

मांडणी मध्ये थोडी गडबड, पण एकुण चांगला लेख..

गोमट्या

धनंजय's picture

6 Feb 2009 - 4:52 am | धनंजय

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

अवलिया's picture

6 Feb 2009 - 11:17 am | अवलिया

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

अविनाशकुलकर्णी's picture

5 Feb 2009 - 7:19 pm | अविनाशकुलकर्णी

१६ व नाहि पण ६१ व वर्ष धोक्याच असते..६० ठिला बुध्धि नाठि होति...त्या मुळे या वयात संभाळुन रहाणे महत्वाचे अस्ते..

शाहरुख's picture

6 Feb 2009 - 11:13 am | शाहरुख

तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात.
'विनाकाराण' हा शब्द विनाकारण आहे वरील वाक्यात..

या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात.
असे कसे काय म्हणु शकता आपण ???

सोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी गमतीदार वाटली..

(सर्व भारतीयांना लव शिकवणारा) शाहरुख

फ्रॅक्चर बंड्या's picture

9 Feb 2009 - 11:52 am | फ्रॅक्चर बंड्या

प्रेम करण्याचे वय कुठले मग ?

महेंद्र's picture

9 Feb 2009 - 1:53 pm | महेंद्र

एखाद्या मुलिला सांगाल कि "विवेक" बुध्दीने काम घे. तर आजकालची मुलगी सरळ "विवेक" नावाच्या मुलाच्या बुध्दीने काम करेल ना..त्यानं म्हंटलं चल प्रेम करु तर ही बया सरळ तयार होइल ना.
अहो, इंग्लीश मिडियम ना आजकालचं.......