लफडा

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 12:46 pm

प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :?

आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !

ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.

गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !

काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही ;)

पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !

कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !

भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !

जीवनमानप्रकटनविचारमतअनुभव

प्रतिक्रिया

शेखर's picture

5 Feb 2009 - 12:53 pm | शेखर

सुंदर प्रकटन.

एक प्रश्न : ज्या माणसाला आपण ओळखलेच नाही त्याला आपण दोस्त म्हणु शकतो का?

शेखर

दशानन's picture

5 Feb 2009 - 1:03 pm | दशानन

म्हणून शकता पण मार लै जोरात पडतो बॊ ;)

पण मार्ग आहेत ना चिक्कार !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सहज's picture

5 Feb 2009 - 12:53 pm | सहज

प्रेमभावना खरी आहे. दोस्ती खरी आहे. दारु खरी आहे. सगळ्यात आनंद आहे.

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2009 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

काय राजे आजकाल आपल्याला 'प्रेमभंग' या शिवाय दुसरा विषय सापडत नाहि काय ???

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अवलिया's picture

5 Feb 2009 - 1:21 pm | अवलिया

च्यायलाऽऽ वाचायला मजा वाटते ना? ऑ....राजे लिहा हो ;)

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

5 Feb 2009 - 1:24 pm | दशानन

=))

पोट्डीतून काढु का थोडे लेखन बाहेर ???

पण रडायचं नाय बॊ !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

ब्रिटिश's picture

5 Feb 2009 - 5:14 pm | ब्रिटिश

वैच बोल्ता मय !
आदी भेटला पायजेल व्हतास र

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

केवळ_विशेष's picture

5 Feb 2009 - 2:24 pm | केवळ_विशेष

क्र. १

सुनील's picture

5 Feb 2009 - 2:34 pm | सुनील

सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात
मस्त!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव's picture

5 Feb 2009 - 3:45 pm | शंकरराव

अगदि बरोबर !!

अनंत छंदी's picture

5 Feb 2009 - 3:46 pm | अनंत छंदी

राजे
+१
=))

ऍडीजोशी's picture

5 Feb 2009 - 4:45 pm | ऍडीजोशी (not verified)

एकटं असतो म्हणून दारू,
कुणी आवडल्याच्या आनंदात दारू,
प्रपोज करायला हिंमत हवी म्हणून दारू,
हो म्हणाली तर आनंदात दारू,
नाही म्हणाली तर दु:खात दारू...........................

ऍडी जोशी
(दारू सत्यं, जगन् मिथ्या)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Feb 2009 - 5:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

दारू सत्यं, जगन् मिथ्या
+१ सहमत

दारु चिझ है खराब
चलो ईस खराबी को
दुनिया से खत्म करे
एक बोतल तुम खत्म
करो एक हुम खत्म करे

___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

गोमट्या's picture

5 Feb 2009 - 5:29 pm | गोमट्या

दारू जगम् , 'सत्यं' मिथ्या

सुहास..सदेव हसनार्..'s picture

5 Feb 2009 - 4:54 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात

हे मात्र खर

सुहास

(धन्य ते मातीत पितात)

दिगम्भा's picture

5 Feb 2009 - 5:09 pm | दिगम्भा

राज

तुझ्या आत्मचरित्राचे मनोगतावरचे पहिले भाग अजून आठवतात. फार सुंदर होते.
आता संपूर्ण पुस्तकच येऊदे.

(फक्त हे लिहिण्यासाठी लॉगिन केलं)

- दिगम्भा

दशानन's picture

5 Feb 2009 - 5:12 pm | दशानन

>>फक्त हे लिहिण्यासाठी लॉगिन केलं

धन्यवाद.

माझे सर्व लेखन येथे मिसळपावर आहेच !

माझी सफर चे १ ते...१५.१६.१७.. आठवत नाहीत येवढे भाग लिहले आहेत ;)

त्या नंतर मिसळपाववरच बाहुबली हॉस्टेल ही लेख माला लिहली.... ६-७ भागांची !
त्याच्या मध्येच ती व मी चे दोन-तीन भाग लिहले आहेत येथेच मिपा वर आहेत... !

कोणी आहे का रे पुस्तक छापणारं :D

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शितल's picture

5 Feb 2009 - 7:49 pm | शितल

राजे,
तुमच्या लेखाच्या खाली पहिला क्रमश: असते ते पहिला पाहते आणि मग लेख वाचते ;)
छान लिहिले आहे. :)

प्राजु's picture

5 Feb 2009 - 7:59 pm | प्राजु

हम्म..
चांगलं अनुभव कथन आहे. क्रमशः कसं नाही यावेळी?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आचरट कार्टा's picture

5 Feb 2009 - 11:31 pm | आचरट कार्टा

:)

धनंजय's picture

6 Feb 2009 - 2:44 am | धनंजय

तिने तुमचे ऐकावे. ऐकलेच अशी आशा करतो.

गणा मास्तर's picture

7 Feb 2009 - 4:01 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

संदीप चित्रे's picture

6 Feb 2009 - 2:40 am | संदीप चित्रे

कधी बंद करायचे नसतात.
काय लाखमोलाचं बोललायस मित्रा !

मॅन्ड्रेक's picture

6 Feb 2009 - 1:07 pm | मॅन्ड्रेक

फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

थोड्स बद्लुन

फक्त होकारालाच नाही तर,
नकारांला सुध्दा प्रेमाची झालर असते !

जनाडु.

सुचेल तसं's picture

7 Feb 2009 - 8:32 am | सुचेल तसं

>>मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?

वा चांगलंच पकडलत!!! =D>

सखाराम_गटणे™'s picture

8 Feb 2009 - 12:12 pm | सखाराम_गटणे™

सध्या हा लेख फॉरवर्डेड मेल मधुन फिरतो आहे. मला २ वेळा आला आहे.

दशानन's picture

8 Feb 2009 - 12:15 pm | दशानन

हा हा हा हा !

मला पण आला आहे

=))

वर ही प्रतिक्रिया होती.... बघ लेका असं काही तरी कर म्हणून :D

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सखाराम_गटणे™'s picture

8 Feb 2009 - 12:17 pm | सखाराम_गटणे™

बघ लेका असं काही तरी कर म्हणून
असतात, काही काही दिवस