भुकेचा आग डोंब

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Jan 2009 - 3:27 pm

भुकेचा आग डोंब
दुपारचे १२.३० वाजुन गेले होते..गोदा जिना चढत होति.
ऊन मी म्हणत होते..पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता
काल् रात्री १ वाजेपर्य्ंत् ति वाट् पहात् होति..गि~हाईकाचि
१२ चा सीनेमा सुटला होता..वाटल् येईल् एखादा..
पण् कुणीच् फिरकल् नाहि..
कालपासुन अन्नाचा एक कण पोटात नव्हता..
राजादादाला २ महिन्याची जेल झाली अन तिचे दिवस फिरले.
तो जेल जाण्या आधी हप्त्यातन ३ वेळा तरी यायचा..पैस पण बरा द्यायचा.
तो सुटलाय अस कानावर आल होत..ति वाट बघत होति त्याची.
गिऱ्हा‌ईक येत नव्हत...धंदा होत नव्हता...उधारी झाली होति..
कुणीच उधार द्यायला तयार नव्ह्त..घरवालीला पैसे मागयची सोय नव्ह्ती..
२हजार रु अंगावर होते...पैसे मागायला गेली तर् घरवालि चिडुन म्हणली की..धंदा कर अन पैसा मिळव
नसल जमत तर भिक माग..हा भाकड गुर पोसायचा पांजर पोळ नाय ...
वर आल्यावर ति शांत बसली..भुकेमुळें काहि सुचत नव्हत..

सकाळि हातापाया पडुन् चहावाल्या कडुन् मिळालेला कपभर् चहा पोटात् होता....बस् बाकि काहि नाहि...
भुक असह्य झाल्यामुळे ति पाणी प्यायला उठली अन समोर राजादादा उभा
त्याला पाहिल्यावर् तिला कोण् धिर् आला...
अरे कधि सुटलास्? कधि आला?..कसा आहेस्..ति विचारत् होति..
तो सांगत् होता
"गोदे..सकाळीच सुटलो अन तुझ्याकडच आलो.
मि मजेत् आहे..कसा दिसतोय्??पुढे म्हणाला..काय् सांगु गोदे..
२ महिने जेल मधि..बा‌ईच नख बि बघायला नाय मिळाल..लय आंग ताठलय..ताव आलाय..तिला जवळ् ओढत् म्हणाला
ल‌ई भुक लागलीय..रातभर कच्चा खाणार तुला...."अन् हसायला लागला..

ति बघतच होति...
दोघाना कडकडुन भुका लागल्या होत्या.
दोन्हि भुका शरीराच्या होत्या..
फक्त भुकेची जात निराळी होति...

"अर..२ दिवस झाला अन्नाचा कण पोटात नाय,
च्चा, भज्जी पाव,मिसळ पाव मागव..माझी भुक भागव
मग मी तुझी भागवते...ति म्हणालि
अन् बोलता बोलता भुकेन तिला त्याच्या मिठीतच् चक्कर आली....

अविनाश.......

कथा