मराठी विकी किती उपयोगी वाटतो ??

Primary tabs

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in काथ्याकूट
9 Jan 2009 - 8:06 pm
गाभा: 

मराठी विकी ज्ञानकोश किती काल सुसंगत वाटतो ?

विकी हा मराठी मधील मुक्त ज्ञानकोश आहे हे इथल्या सर्वांआ माहिती असेलच.
सध्या मराठी विकीवर सुमारे २२ हजार लेख आहेत.
भारतीय विकींमध्ये मराठी सध्या ४ थ्या स्थानावर आहे.
व २ / ३ स्थानावरील भाषांपेक्षा मराठी फ़ार मागे नाही.

त्याच वेळी इंग्रजी (२,६८४,७१४) , जर्मन (८४७,८६८) पेक्ष मराठी बरिरिरिरिचचच मागे आहे.

कुटायचा काथ्या असा आहे की अशा वेळेस मराठी विकी ला उत्तेजन देणे चुकिचे ठरते का ?

मराठी पारड्यास अनुकुल गोष्टी अशा -

१ ओरिजिनल लेखांवर भर दिला तर इंग्रजी नसलेल्या गोष्टि येऊ शकतील . हे जर्मन विकीचे खास वैशिष्ट्य म्हणतात
२ बहुतेक स्थानिक कोशंमध्ये स्थानिक माहिती सविस्तर असते; मराठी विकी ही तेच स्वरुप घेत आहे; मरठी / इंग्रजी दोन्ही येणा-याला हे जास्तीचे ज्ञान फ़ायदेशीर होईल

तुम्हाला काय वाटते ???

( लेख जरा घाईत झालाय; समजून घ्या :) )

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 8:12 pm | लिखाळ

कुटायचा काथ्या असा आहे की अशा वेळेस मराठी विकी ला उत्तेजन देणे चुकिचे ठरते का ?

अजीबात नाही.

बहुतेक स्थानिक कोशंमध्ये स्थानिक माहिती सविस्तर असते; मराठी विकी ही तेच स्वरुप घेत आहे; मरठी / इंग्रजी दोन्ही येणा-याला हे जास्तीचे ज्ञान फ़ायदेशीर होईल

नक्कीच. असेच व्हावे. शनिवारवाड्याची, पर्वतीची, भारतीय समजूती, प्रथा, पदार्थ आणि यासारख्या अनेक विषयांची माहिती त्यात तपशिलात असावी. तरच वेगळेपणामुळे तो वापरला जाईल आणी समृद्ध होत राहील. असे मला वाटते.

अजून - मी मराठी विकीचा माहिती मिळवण्यासाठी अजून उपयोग केलेला मला स्मरत नाही. मी नेहमी इंग्रजी विकीच वापरतो. वास्तविक माझ्यासारख्या सामान्याने मराठी विकिचा वापर वाढवणे विकिला उत्तेजनार्थच होईल.

-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अभिरत भिरभि-या's picture

10 Jan 2009 - 11:29 am | अभिरत भिरभि-या

अजून - मी मराठी विकीचा माहिती मिळवण्यासाठी अजून उपयोग केलेला मला स्मरत नाही. मी नेहमी इंग्रजी विकीच वापरतो. वास्तविक माझ्यासारख्या सामान्याने मराठी विकिचा वापर वाढवणे विकिला उत्तेजनार्थच होईल.

करेक्ट!
तुम्हाला जितक्या जास्ती भाषा येतात तेवढा विकीचा उप्योग वाढतो. विशेषतः जर्मन व फ्रेन्च येत असेल तर

तिमा's picture

9 Jan 2009 - 10:39 pm | तिमा

मराठी विकि म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर तो काम्रेड विकि उभा रहिला.

अभिरत भिरभि-या's picture

10 Jan 2009 - 11:15 am | अभिरत भिरभि-या

मराठी विकि म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर तो काम्रेड विकि उभा रहिला.

ह्यो बाब्या समाजवादी नाय

विसोबा खेचर's picture

10 Jan 2009 - 12:07 am | विसोबा खेचर

निदान मलातरी आजतागायत मराठी विकी कुठल्याही माहितीकरता उपयोगी पडलेला नाही.

असतील त्यावर मारे २२००० लेख. परंतु आजपर्यंत तरी ते माझ्याकरता पूर्णत: निरुपयोगी ठरले आहेत.उद्याचं माहिती नाही..!

तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

10 Jan 2009 - 11:10 am | अभिरत भिरभि-या

निदान मलातरी आजतागायत मराठी विकी कुठल्याही माहितीकरता उपयोगी पडलेला नाही.

अण्णांना इथे मानवंदना द्यायला आपला मराठी विकीच होता की ! :)

समग्रपणे मराठी विकी इंग्रजी पुढे कमी पडतो हा माझा ही अनुभव आहे.
आकडेवारीने बोलायचे तर इंग्रजी विकीची दर्जात्मक खोली (Depth) सुमारे ४०० तर मराठी विकीची १४; हिंदीची त्याहून कमी म्हणजे ६.
पण खरे सांगायचे तर दोष असलाच तर विकीचा नाही तर समस्त मराठी समाजाचा असेल. कारण विकीची संकल्पना बरिचशी लोकशाहीसारखी आहे - लोकांसाठी , लोकांद्वारे आणि फुकाट !!
दर्जा वाढवायला वापरकर्त्यांनीच जास्तीत जास्त लेख लिहिणे, संपादणे अपेक्षित आहे.
आपण सार्‍यांनी आपले छटाक छटाक योगदान दिले तर ही दर्जात्मक खोली वाढायला वेळ लागणार नाही.

आता हेच बघा ना,
मिपावर हिंदुस्तानी संगिताचे कितीतरी जाणकार आहेत.
हिंदुस्तानी रागदारीबद्दल मराठी विकीवर इथे इंग्रजीला लाजावेल इतक्या दर्जाचे लेख मराठीत लिहिता येतिल. थोडा आपणच पुढाकार, सहभाग घ्यावा लागेल.

Local info centre असा ब्रॅण्ड मराठी विकीला विकसित करता येईल; अर्थात आपल्या सगळ्यांच्या सहभागाने !!

कलंत्री's picture

10 Jan 2009 - 8:12 pm | कलंत्री

भिरभिरे यांनी प्रेषिताची भूमिका निभावलेली दिसते. मराठीचा ज्ञान साठा वाढला पाहिजे यात काही संशय नाही. प्रत्येकाने प्रत्येक महिन्यात २ माहिती निर्माण केल्या / अद्ययावत केल्या तर अल्पावधित विकीचा साठा वाढेल यात काही संशय नाही.

माझ्या परीने मी भर टाकणारच.