सुखाने जगू द्या रे! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
8 Jan 2009 - 12:28 am
गाभा: 

राम राम मायबाप मिपाकरहो,

अरे जरा सुखाने जगू द्या की रे..!

अरे प्रत्येक विषयात वाद घालतांना वैयक्तिक पातळीवर नका रे उतरू!

एक तर प्रत्येक विषयात दोन दोन, तीन तीन पानी वाद घालू नका आणि घातलात तरी वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!

हा पेश्शल घागा टाकण्याचे कारण म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखे वाढत चाललेले, अंत नसलेले वाद आणि काही मंडळींनी त्यात केलेली वैयक्तिक शेरेबाजी! त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात! मग तक्रारकर्त्याने दिलेल्या दुव्यावर जाऊन काय ते योग्य/अयोग्य ठरवा आणि योग्य ते संपादन करा..!

सध्या आम्ही कामधंद्याच्या निमित्ताने खूपच गडबडीत आहोत आणि प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या कंप्लेन्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला खरोखरच टाईम नाही व तेवढा उत्साहही आमच्यापाशी नाही. आमची सर्व सन्माननीय संपादक मंडळीही आपापले उद्योगधंदे सांभाळून संपादनाचे काम करत असतात. त्यांनाही कमीत कमी त्रास व्हावा अशी इच्छा आहे!

म्हणूनच आमच्यातर्फे आणि सर्व संपादक मंडळातर्फे पुन्हा एकवार अशी कळकळीची विनंती की वाद जरूर घाला, अगदी सहा-सहा पानी घाला, परंतु मुद्द्याला धरून घाला आणि कृपया वैयक्तिक शेरेबाजीवर अथवा हमरीतुमरीवर येऊ नका, किंबहुना लेखन करताना आपण असे करत नाही ना याची अवश्य काळजी घ्या..

समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे! :)

असो,

अजून काय लिहू, बाकी आपण सूज्ञ आहातच..! :)

आपला,
(मुंबईत हवा जरा बरी असल्यामुळे स्वेटर घातलेला!) तात्यागणपती! :)

प्रतिक्रिया

(अवांतर - तात्या, सारसबाग गणपतीसारखाच तुमचाही एक स्वेटरमधला फोटू टाकायचात ना राव सहीच्या सोबत! ;) )

चतुरंग

वाहीदा's picture

9 Jan 2009 - 10:42 am | वाहीदा

तुम्ही या problems ची यो ग्य ती द्खल घेतली या साठी शतदा धन्यवाद !

विकास's picture

8 Jan 2009 - 12:56 am | विकास

तात्या,

आपल्या विचारांशी सहमत.

वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!
एकदम मान्य...!

समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे!

हे बरं आहे... असे दुसर्‍याचे मत मान्य करणारे संकेतस्थळ आणि ते ही मराठीत? :-)

आजानुकर्ण's picture

8 Jan 2009 - 12:59 am | आजानुकर्ण

चर्चेचा मसुदा वाचून अंमळ गंमत वाटली.

खालील वाक्ये विशेष आवडली.

  • वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!
  • त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात! मग तक्रारकर्त्याने दिलेल्या दुव्यावर जाऊन काय ते योग्य/अयोग्य ठरवा आणि योग्य ते संपादन करा..!
  • सध्या आम्ही कामधंद्याच्या निमित्ताने खूपच गडबडीत आहोत आणि प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या कंप्लेन्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला खरोखरच टाईम नाही व तेवढा उत्साहही आमच्यापाशी नाही.
  • आमची सर्व सन्माननीय संपादक मंडळीही आपापले उद्योगधंदे सांभाळून संपादनाचे काम करत असतात. त्यांनाही कमीत कमी त्रास व्हावा अशी इच्छा आहे!

आपला
(मराठी संकेतस्थळ सदस्य) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

8 Jan 2009 - 7:08 am | छोटा डॉन

मस्त आणि चखपल निवेदन आहे, एकदम कालानुसंगत ...
१०० % पटले.

विशेषत : खालील मुद्दे फार भावले ...
१. अगदी सहा-सहा पानी घाला, परंतु मुद्द्याला धरून घाला आणि कृपया वैयक्तिक शेरेबाजीवर अथवा हमरीतुमरीवर येऊ नका, किंबहुना लेखन करताना आपण असे करत नाही ना याची अवश्य काळजी घ्या..

२. समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे!

असो.

- आपलाच
( २-२,३-३ पाने भरुन वाद घालणारा पण कधीही वैयक्तीक शेरेबाजीवर न उतरलेला थोडासाच अवांतर )
मिपासदस्य - छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि पुन्हा एकदा डॉन्याशी सहमत, अर्थात तात्यांशीही. काय जे वाद असतील ते विचारांचे असावेत माणसांचे असू नयेत.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

सुक्या's picture

8 Jan 2009 - 7:52 am | सुक्या

वाद विवाद हे वैचारिक असावेत. वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या , शेरेबाजी नसावी.
तात्यांशी सहमत.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

कलंत्री's picture

8 Jan 2009 - 9:01 am | कलंत्री

थोडेफार वादविवाद, शब्दछ्चळ हा होणारच. कधी कधी दुर्लक्ष फारच चांगला आणि रामबाण असा उपाय आहे.

विसोबा खेचर's picture

8 Jan 2009 - 9:24 am | विसोबा खेचर

थोडेफार वादविवाद, शब्दछ्चळ हा होणारच.

कलंत्रीसाहेब, कृपया धागा नीट वाचावा. वादविवाद आणि शब्दच्छलाला ना नाही. वैयक्तिक शेरेबाजी आणि चिखलफेकीवर आक्षेप आहे.

तात्या.

आनंदयात्री's picture

8 Jan 2009 - 10:43 am | आनंदयात्री

चला अँटीस्वेटरवाल्यांची लाल ... म्हणुन आम्ही स्वेटर प्रकरणावर आमच्याकडुन पडदा टाकतो :)

अवांतरः आजच सारसबागेत जाउन आलो. तिथे चौकशी केली म्हटले मला अन माझा मंबईचा मित्र तात्या अभ्यंकराला या गणपतीला योक स्वेटर घालायचाय बाप्पु ! मिपाची भरभराट होवो असा आशिर्वाद दे म्हणा बाप्पाला !! आता दोन चार दिसात येईलच बाप्पाच्या अंगावर खास मिपा तर्फेचा स्वेटर :)

गणपती बाप्पा मोरया !!

-
(अंधश्रद्ध) आंद्या हलकट

वेताळ's picture

8 Jan 2009 - 10:48 am | वेताळ

वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याचा प्रयत्न करु तात्या.
वेताळ

सुनील's picture

8 Jan 2009 - 10:58 am | सुनील

वैयक्तिक शेरेबाजी हे थोडेसे सब्जेक्टीव आहे. थट्टेत दिलेली टपली किंवा मस्करीत मारलेला गुद्दा, हे म्हटलं तर वैयक्तिक म्हटलं तर नाही. मग सीमारेषा ठरवायची कशी?

कमरपट्ट्याखाली वार करू नये, हा सर्वमान्य संकेत. पण काही मंडळी कमरपट्टा अंमळ वर बांधतात!! मग काय करणार? अशी कमरपट्टा वर बांधणारी मंडळी अनुभवतून ओळखायची (मी काही हुडकली आहेत) आणि त्यांपासून अंमळ दूर रहायचे!

शेवटी, आपण इथे येतो ते चार घटका मजेत जाव्यात म्हणून.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

8 Jan 2009 - 11:05 am | अवलिया

गणपती बाप्पा मोरया!!!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

धमाल मुलगा's picture

8 Jan 2009 - 11:55 am | धमाल मुलगा

२. समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे!

असं 'उत्तर द्या' ह्यावर क्लिक करुन द्यायच्या प्रतिसादात मनमोकळेपणानं टाकलं तर चालेल का तात्याबा??? ;)

आणि हो, अत्यंत पटाईतरित्या मुद्दे भरकटवून मूळ विषयाला पुर्ण बगल देऊन तिसरीच चर्चा करणार्‍या प्रतिसादांना नक्की काय करावं बरं? ते प्रतिसाद अवांतरही म्हणता येत नाहीत, आणी विषयाला धरुनही नसतात..(दिसत असले किंवा तसं समोरचा सिध्द करु शकला तरीही वस्तुस्थिती नाकारता येत नाही!) :)
अर्थात अशा धाग्यांवर प्रतिसाद द्यायची इच्छा असली तरी आम्ही ते धागे सरळ दुर्लक्षित करतो...

सखाराम_गटणे™'s picture

8 Jan 2009 - 11:58 am | सखाराम_गटणे™

व्यक्तीगत टिका करणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करणे हा उपाय चांगला आहे.
काही दिवसांनी ती मंडळी निराश होतात.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

आनंदयात्री's picture

8 Jan 2009 - 12:43 pm | आनंदयात्री

तुमच्यावरच्या टिकेच्या लढ्याबद्दल तुम्ही एक मार्गदर्शनपर पुस्तक लिहा .. त्याला नाव द्या "माझा साक्षात्कारी टिकारोग" !!

अवलिया's picture

8 Jan 2009 - 12:45 pm | अवलिया

"माझे दुर्लक्षाचे प्रयोग" की "माझे दूर'लक्षाचे'प्रयोग"

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2009 - 1:19 pm | प्रभाकर पेठकर

सुरक्षित अंतरावरून वैयक्तिक शेरेबाजी करता यावी म्हणूनच कित्येक जणं २-२, ३-३ आय्. डी.ज घेतात. त्यांची वरील सूचनेने बरीच कुचंबणा होईल.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

मला इथे मुक्त सुनीत नावाने वावर्णार्या संपादका चा धिक्कार करायचा आहे.

जर ह्या इसमा ला संपादना चे अधिकार असतील तर त्यांने आपले मत संपादक म्हणुन पोस्टिंग वर टाकावे. उगाचच पोस्टिंग उडवण्याचे अधिकार संपादकाला नसतात.
सेन्सॉरशिप आणि संपादन हे फरक समजण्याची संपादकाला अवश्यकता आहे.

असे झाले नाहि तर हे "संपादक" त्यांच्या मता विरुध्द मतं लिहिणार्या लोकांची पोस्टिंग्स उडवुन टाकतील ह्याची नोंद घ्यावी.

अश्लिल भाषा वापरणे व फेक आय डि ( उदा. वेताळ, मुक्तसुनीत ) वापरुन वैयक्तिक आरोप करणे , हयाचा मी निषेध करते.

संपादकांनी स्वतः चे खरे नाव लिहण्यास काय हरकत आहे ? लाज का भीती ?

सखाराम_गटणे™'s picture

8 Jan 2009 - 7:42 pm | सखाराम_गटणे™

श्वेताजी,
तुम्हाला जी तक्रार असेल ती संत विसोबा खेचर यांच्याकडे पाठवा.
उगाच आरोप करु नका.

तुम्ही सगळ्या धाग्यांवर मुक्तसुनीत यांच्यावर टिका करत आहात. हे बरोबर नाही.
येथे सगळे मिळुन मिसळुन राहतात.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

बट्टू's picture

8 Jan 2009 - 7:55 pm | बट्टू

यांचा चांगला अनुभव मला आला.

काही व्यक्तिगत स्वरूपाचा मजकूर संपादित.

प्राजु's picture

8 Jan 2009 - 7:59 pm | प्राजु

संपादकांनी स्वतःचे नाव लिहावे हा नियम नाहीये, आणि आपण नविन आहात. पण मुक्त सुनित हे अतिशय ज्येष्ठ सभासद आहेत. आणि त्यांच्या लेखनातून त्यांनी त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. आपल्याला तक्रार करायची असेल तर सरपंचांकडे करा.
दुसरी आणि महत्वाची गोष्ट,

जर ह्या इसमा ला संपादना चे अधिकार असतील तर त्यांने आपले मत संपादक म्हणुन पोस्टिंग वर टाकावे. उगाचच पोस्टिंग उडवण्याचे अधिकार संपादकाला नसतात.
सेन्सॉरशिप आणि संपादन हे फरक समजण्याची संपादकाला अवश्यकता आहे.

संपादनाचे अधिकार आणि नियम याबद्दल सरपंच पाहून घेतील. तेव्हा आपण सार्वजनिक धाग्यावर अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

8 Jan 2009 - 8:04 pm | विनायक प्रभू

तात्या स्व खर्चाने मिपा चालवतात. तेवढे खर्च करुन कपाळाला आठी नाही. हे किती जणाना शक्य आहे. मला नाही.
मला हे कळत नाही की संस्थळाचा खरा उपयोग करुन न घेता इतर गोष्टीत गुंतुन रहाण्यात काय अर्थ आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2009 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादनाचे अधिकार आणि नियम याबद्दल सरपंच पाहून घेतील. तेव्हा आपण सार्वजनिक धाग्यावर अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत ही विनंती.

सहमत आहे ! मुक्तसुनितांवर धिक्काराचा आरोप करतांना आश्चर्य वाटले. ज्या माणसावर कधीतरी विनाकारण टिका असणारे प्रतिसाद ज्यांनी उडवले नाहीत, त्या प्रामाणिक माणसांचा प्रतिसाद उडवले म्हणून काय धिक्कार करता राव ! असो, यापुढे निरर्थक आरोपांचे प्रतिसाद अप्रकाशित करावेत या मतावर मी आलो आहे.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

9 Jan 2009 - 7:58 am | विकास

ज्या माणसावर कधीतरी विनाकारण टिका असणारे प्रतिसाद ज्यांनी उडवले नाहीत, त्या प्रामाणिक माणसांचा प्रतिसाद उडवले म्हणून काय धिक्कार करता राव ! असो, यापुढे निरर्थक आरोपांचे प्रतिसाद अप्रकाशित करावेत या मतावर मी आलो आहे.

सहमत!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सखाराम गटणे, बट्टू, प्राजु यांच्याशी सहमत.

अवांतरः तो काय हो वाक्प्रचार मिपावरचा ताळतंत्र सोडून बोलणं सुरू झालं की वापरतात, 'चड्डीत रहा ना भौ'!
अतिअवांतर: वरच्या वाक्यात 'भौ' जाणूनबुजून लिहिलं आहे.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अनामिक's picture

8 Jan 2009 - 8:14 pm | अनामिक

'चड्डीत रहा ना भौ' - असेच म्हणतो.
भौ - अस्सं आहे होय.. आम्हाला माहितच नव्हत.

कृपया उगाच आरोप करण्या आधी आपण कोणाबद्दल बोलतोय याची जाणिव असु द्या.

अनामिक

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jan 2009 - 8:18 pm | प्रकाश घाटपांडे

एकदा आमच्या एका अभ्यास मंडळात एक गृहस्थ आले होते. विषयाची मांडणी झाल्यावर ते तावातावाने आपले ज्ञान पाजळण्यासाठी आतताई पणा करु लागले. काही काळ सहन केल्यावर संयोजकांनी शेवटी सदर गृहस्थांना एक प्रश्न विचारला .
तुम्हाला या अभ्यास मंडळा विषयी काय माहिती आहे?
वक्त्यांविषयी आपल्याला काय काय माहित आहे?
उचलली जीभ आन लावली टाळ्याला असं खर संयोजकांना म्हणायच होत पण मंडळाच्या परंपरेला ते साजेस नव्हत.
उत्साहाच्या भरात असं काहीस होत असत. वाचक वा प्रतिसादक म्हणुन अधिकार बजावताना आपण वाचक व प्रतिसादक म्हणुन असलेले कर्तव्य बजावताना कुठे कसुर होत नाही ना? हे ही पहाणे गरजेचे आहे.
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

8 Jan 2009 - 8:21 pm | सहज

काय मस्त सांगीतलेत!!

अवलिया's picture

8 Jan 2009 - 8:21 pm | अवलिया

मस्त

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 8:25 pm | लिखाळ

वाचक वा प्रतिसादक म्हणुन अधिकार बजावताना आपण वाचक व प्रतिसादक म्हणुन असलेले कर्तव्य बजावताना कुठे कसुर होत नाही ना? हे ही पहाणे गरजेचे आहे.

फार छान. सहमत आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

वाटाड्या...'s picture

9 Jan 2009 - 5:42 am | वाटाड्या...

नमस्कार..
"उगाचच पोस्टिंग उडवण्याचे अधिकार संपादकाला नसतात."..हे ठरवणार्‍या तुम्ही कोण?? हे ठरवणे तात्यांच्या अखत्यारीत आहे. कारण ही साईट व आम्ही सगळे हे तात्यांचे आहोत व मुक्तसुनित यांना पुर्ण पाठींबा आहे त्यांच्या कामासोबत....

"असे झाले नाहि तर हे "संपादक" त्यांच्या मता विरुध्द मतं लिहिणार्या लोकांची पोस्टिंग्स उडवुन टाकतील ह्याची नोंद घ्यावी."...असं झालेलं नाही आणि झाल्यास काहीतरी नियमाविरुद्ध असल्यशिवाय ते झालेलं नसेल. नियम मिपाचे जेष्ठ सहकारी व तात्या बनवतात...आम्ही सगळे त्यांचे पाठीराखे अहोत. जमत नसेल तर ...

"वेताळ, मुक्तसुनीत" असे आय. डी. वापरु नका असा नियम नाही इथे..त्यामुळे तुमच्या निषेधाला इथे वाव नाही..

"संपादकांनी स्वतः चे खरे नाव लिहण्यास काय हरकत आहे ? लाज का भीती ?"..परत असा नियम नाही इथे...लाजेचा आणि भीतीचा प्रश्नच नाही...

मिपाचा...
मावळा....(मावळे कधी गायक असतील का?) :$

विनायक प्रभू's picture

8 Jan 2009 - 7:28 pm | विनायक प्रभू

तात्याना सुखाने जगु देणे मुश्किल करणा-या सर्वांचा णिशेध.

विनोद कोकने's picture

8 Jan 2009 - 8:36 pm | विनोद कोकने

तु बोलतो काय अन लिहितो काय?

विकि's picture

8 Jan 2009 - 11:59 pm | विकि

तात्याशी १००% सहमत.

शेणगोळा's picture

9 Jan 2009 - 12:11 am | शेणगोळा

तात्या,

आता राग मानू नकोस पण स्वत:चा पैसा खर्च करून तुला ही नसती दुखणी विकत घ्यायला कुणी सांगितली होती?

मनोगतावर होतास ते काय वाईट होतं? :)

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

विटेकर's picture

9 Jan 2009 - 9:30 am | विटेकर

तिकडे तात्या फारच फार्मात असायचे..... हे नस्तं लचांड त्यांनी लाऊन घेतलयं. हे म्हणजे "सचिनला क्यंप्टण केल्यावर त्याच्यातला फलंदाज संपला "तसं झालयं.
काहि लोक इतके हमरितुमरिवर येतात कि विचारता सोय नाही. आता याहि टिपण्णिवर लोक हाणतिल. दुसरा उद्योग च नाहि. काहिंचा छुपा अजेंडाच आहे कि कितिहि मंगल विषय आला तरि आपल्या घाणेरड्या मतांचि पिंक टाकून ते विद्गुप करायचे.
ह्याला प्राज्ञ मराठित "क्रियानष्ट्पणा किंवा नतद्र्ष्ट्पणा" आणि अज्ञ मराठित "हलकटपणा "म्हणतात. अशावेळि प्रशासकाचे शासन हवे असेच वाटते.
स्वातंत्र्य भोगण्यासाठि काहि एक लायकि असावि लागते अन्यथा तो स्वैराचार होतो.!!!
असले लोक मिसळित आलेला कुजका दाणा होय , तेव्हा पंच मंडळिंनि योग्य तो विचार करून केवळ जालधर्म पाळणार्‍यांनाच प्रवेश द्यावा.
- विटेकर.
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

संकेतजी कळके's picture

9 Jan 2009 - 8:29 am | संकेतजी कळके

तात्यांशि १०१% सहमत. लोकशाहित प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे. कोणाला पटेल कोणाला नाहि पटणार. सोडुन द्यायला पाहिजे.. वाद घालुन काय फायदा????? आपलेच बी.पी वाधवुन घ्यायचे धंदे...

चापलूस's picture

9 Jan 2009 - 11:55 am | चापलूस

तात्यांशी सहमत आहे. मी इतर सदस्यांशी सहमत आहे. तात्या स्वत:चे पैसे खर्चुन इतकी चांगली साइट चालवित आहेत. त्यांचा मी शतश: आभारी आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Jan 2009 - 2:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

तात्यांशी सहमत आहे. तात्या स्वत:चे पैसे खर्चुन इतकी चांगली साइट चालवित आहेत. त्यांचा चांगला उपयोग करायचा सोडुन काहि लोक घाण करतात अशा लोकांवर मिपाने बंदी घालावी यांची लायकि नाहि आहे अरे असेल हिम्मत चालवा एखादी अशी साईट मग बघा कसे पार्श्वभागावर फोड येतील तुमच्या अरे जिथे खाता तिथे घाण करु नका रे
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

तात्या १०० टक्के सहमत.

वायफळ चर्चा करणार्‍या आणि उगाचच मि.पा.वर बिनकामाचे वादविवाद करणार्‍या सदस्यांवर संपादक मंडळाने नजर ठेवावी व योग्य ती समज देऊनही सदस्याच्या वर्तनात फरक नाही पडला तर त्याचे सदस्यत्व विनानोटीस रद्द केले जावे. तरच अशा विघ्नसंतोषी लोकांना आळा बसेन... अशा कळलावी सदस्यांचे आय.पी. अड्रेस पण ब्लॉक केले तर दुसर्‍या नावाने असली थेरं कोणी करणार नाही व मि.पा. वरचे खेळीमेळीचे वातावरण कायम राहीन असे वाटते....

(मि.पा.भक्त ) सागर

रेझर रेमॉन's picture

9 Jan 2009 - 6:03 pm | रेझर रेमॉन

काय वेळ आणि ताकद आहे आपल्याकडे!
सॉलिड!

एखाद्याला धरून हाण-हाण हाणायचा...
ते पण कारणाशिवाय!
- रेझर