राम राम मायबाप मिपाकरहो,
अरे जरा सुखाने जगू द्या की रे..!
अरे प्रत्येक विषयात वाद घालतांना वैयक्तिक पातळीवर नका रे उतरू!
एक तर प्रत्येक विषयात दोन दोन, तीन तीन पानी वाद घालू नका आणि घातलात तरी वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!
हा पेश्शल घागा टाकण्याचे कारण म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखे वाढत चाललेले, अंत नसलेले वाद आणि काही मंडळींनी त्यात केलेली वैयक्तिक शेरेबाजी! त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात! मग तक्रारकर्त्याने दिलेल्या दुव्यावर जाऊन काय ते योग्य/अयोग्य ठरवा आणि योग्य ते संपादन करा..!
सध्या आम्ही कामधंद्याच्या निमित्ताने खूपच गडबडीत आहोत आणि प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या कंप्लेन्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला खरोखरच टाईम नाही व तेवढा उत्साहही आमच्यापाशी नाही. आमची सर्व सन्माननीय संपादक मंडळीही आपापले उद्योगधंदे सांभाळून संपादनाचे काम करत असतात. त्यांनाही कमीत कमी त्रास व्हावा अशी इच्छा आहे!
म्हणूनच आमच्यातर्फे आणि सर्व संपादक मंडळातर्फे पुन्हा एकवार अशी कळकळीची विनंती की वाद जरूर घाला, अगदी सहा-सहा पानी घाला, परंतु मुद्द्याला धरून घाला आणि कृपया वैयक्तिक शेरेबाजीवर अथवा हमरीतुमरीवर येऊ नका, किंबहुना लेखन करताना आपण असे करत नाही ना याची अवश्य काळजी घ्या..
समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे! :)
असो,
अजून काय लिहू, बाकी आपण सूज्ञ आहातच..! :)
आपला,
(मुंबईत हवा जरा बरी असल्यामुळे स्वेटर घातलेला!) तात्यागणपती! :)
वाचने
14060
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्..हेच मनात होतं ते तुम्ही लिहिलंत, धन्यवाद!
Thanks a Million तात्या !
In reply to ह्म्म्म्..हेच मनात होतं ते तुम्ही लिहिलंत, धन्यवाद! by चतुरंग
सहमत
गंमत
- वैयक्तिक चिखलफेक कृपया टाळा!
- त्यामुळे होतं काय, की जेव्हा जेव्हा आम्ही लॉगईन होतो तेव्हा तेव्हा किमान चार व्य नि आणि खरडी आमची वाट पाहात असतात! मग तक्रारकर्त्याने दिलेल्या दुव्यावर जाऊन काय ते योग्य/अयोग्य ठरवा आणि योग्य ते संपादन करा..!
- सध्या आम्ही कामधंद्याच्या निमित्ताने खूपच गडबडीत आहोत आणि प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या कंप्लेन्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला खरोखरच टाईम नाही व तेवढा उत्साहही आमच्यापाशी नाही.
- आमची सर्व सन्माननीय संपादक मंडळीही आपापले उद्योगधंदे सांभाळून संपादनाचे काम करत असतात. त्यांनाही कमीत कमी त्रास व्हावा अशी इच्छा आहे!
आपला (मराठी संकेतस्थळ सदस्य) आजानुकर्णणिवेदन आवडले ....
मलाही णिवेदन आवडले
In reply to णिवेदन आवडले .... by छोटा डॉन
सहमत
हेही स्विकारावे.
थोडेफार
In reply to हेही स्विकारावे. by कलंत्री
चला अँटीस्वेटरवाल्यांची लाल
सहमत
बरोबर
स्वेटर घातला की उब येते
वोक्के!!
व्यक्तीगत
मार्गदर्शनपर
In reply to व्यक्तीगत by सखाराम_गटणे™
असे लिहिले तर
In reply to मार्गदर्शनपर by आनंदयात्री
वैयक्तिक शेरेबाजी...
संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित)
श्वेताजी, त
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
मुक्तसुनीत
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
हेच म्हणते..
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
वेगळे
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
सहमत आहे !
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
सहमत...
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-४
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
'चड्डीत
In reply to -४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अधिकार व कर्तव्य
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
+१
In reply to अधिकार व कर्तव्य by प्रकाश घाटपांडे
+२
In reply to +१ by सहज
वाचक वा
In reply to अधिकार व कर्तव्य by प्रकाश घाटपांडे
धिक्कार.. ??
In reply to संपादकांची कर्तव्य ( अधिकारा सहित) by shweta
सुखी जीवन
अरेरे
सहमत
तात्या, आता
हे बरिक खर हो.....
In reply to तात्या, आता by शेणगोळा
सहमत..
सहमत..
तात्यांशी सहमत आहे.
तात्या १०० टक्के सहमत.
काय ताकद आहे!