कोडी
===
-राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५
तो सरळ
चालत होता...
चालता चालता
त्याला आयुष्याने
कोडी टाकायला
सुरुवात केली.
तो कोडी सोडविण्यात
मग्न असताना
त्याला कुणीतरी
धडक देऊन
पाडले.
तो पडला
जखम झाली
भळभळा वाहू
लागली.
मग आजुबाजुच्या
लोकांनी त्याला
आणखी दगड
मारायला सुरुवात
केली.
त्याला आणखी
जखमा झाल्या.
पण तरीही
त्याने सर्व ताकद
एकवटली.
नियतीचा धावा
केला.
धडपडतं
परत उठून
उभा राहिला.
आणि
मग...
...
...
...
मग त्याने
आयुष्याला कोडी
टाकायला
सुरुवात केली.
ती कोडी
सोडवता येईनात
तेव्हा
दगड मारणारे
पळाले.
त्याला ’शांत’
करण्यासाठी
मोठे दगड
शोधू लागले.