शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in मिपा कलादालन
1 Oct 2025 - 6:46 pm

nk1

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

---------
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी
दुसरी माळ - लाल
तिसरी माळ - निळा
चौथी माळ- पिवळा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- चौथी माळ- पिवळा
पाचवी माळ - हिरवा
सहावी माळ -करडा

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग-आठवी माळ - मोरपंखी
नववी माळ -गुलाबी
आभार - पक्षीमित्रांनी पाठवलेली काही सुंदर प्रकाश चित्रे लेखामध्ये डकवली आहेत त्यांचे मनापासून आभार.
.

रंगांचा इतिहास शोधताना असे कळाले की मानवाने रंग चाळीस हजार वर्षांपूर्वी निसर्गातून शोधले. आता हा काळ फारच मोठा वाटला. तसेही लेखाचा उद्धेश शारदीय नवरात्रीचे रंग आणि पक्षी आसा असल्याने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. आपल्या अंजिठा लेण्याच सांगतात की रंग फार पूर्वी[असून मानव जीवनाचे अभिन्न अंग आहे

असो, देवीच्या वस्त्रांचा आजचा रंग केसरी, या रंगाला भारतीय परिप्रेक्षात विशेष महत्व आहे हे वेगळे सांगावयास नको. केसरी शब्द डोळ्यासमोर आला की देशाचा झेंडा ,राजपुतांचा केसरीया बाणा ,लोकमान्य टिळक ,पंजाब केसरी लाला लाजपत राय, मेरा रंग दे बसंती चोला आशा अनेक गोष्टी लक्षात येतात कविवर्य कुसुमाग्रज त्यांच्या सागर या कवितेत म्हणतात,

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

हिरव्यागार निसर्गात केसरी रंग वेगळाच उठून दिसतो. माळरानावर,रस्त्याच्या कडेला उगवणारी कॉसमॉसची केसरी फुले मंत्रमुग्ध करतात तसेच केसरी रंगाचे पक्षी हिरव्यागार पानातून सहज लक्ष्य वेधून घेतात अशीच काही दिसलेली पाखरे............

nk2
१. शामा.
-
nk3

२. कृष्ण थिरथिऱ्या
-
nk4

३. निखार्,छोटा गोमेट
.
nk5

४. चक्रवाक ,रुडी शेलडक
.
nk6

५. स्कार्लेट इबीस अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयात दिसला भारतात दिसत नाही
.
nk8

६. स्वर्गीय नर्तक्, पॅराडाईज फ्लायक्याचर. पुण्यामधे आमच्या भागात दिसला,कदाचित स्थलान्तरीत आसावा.
.
nk9

७, हिवाळी गप्पीदास
.
nk9

८. नीळा चिरक, इडिअन ब्लू रोबीन.
.
nk11

९.ब्राह्मणी मैना ब्राह्मणी स्टर्लिंग .
.
nk13

१०.आमेरिकन रोबीन.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Oct 2025 - 8:59 am | कंजूस

सुंदर.