निसर्गायण
लेखक- दिलीप कुलकर्णी.
जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे.
हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो. आधुनिक माणसाला तंत्रज्ञानाचा जिनी प्राप्त झाला, आणि तो हे चक्र सोडून एकरेषीय असंतुलित, विषमतापूर्ण प्रगतीला भुलला आहे. या सगळ्यांवर मात करत संतुलन प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या मनोवृत्तीवर काम करायला पाहिजे.
पुस्तकाच्या पहिल्या भागात मनोवृत्ती स्थिर करणाऱ्या विविध पाश्चात्य आणि भारतीय वैचारिक पद्धतींचा उहापोह केला आहे. निसर्गाला जाणून तद् रुप त्यासह एकात्म स्थापन करायला हवे. वस्तुनिष्ठता ते व्यक्तीसापेक्षता याचा विचार केला आहे. निसर्गाशी आनंदाचे नवं नात कसं स्थापन करायचे हे सांगितले आहे. दुसऱ्या भागात अन्न, आरोग्य ऊर्जा या प्राथमिक गरजा पूर्ण करताना शस्त्रस्पर्धा,व्यसने,शोषण इत्यादी विकृतीकडे न झुकता सुसंस्कृत होण्याची मानवी नैसर्गिक उर्मी कशी असते ,जपावी कशी हे सांगितले आहे.
***
हे पुस्तक वाचताना असेच एक चिंतन सुचले..
वस्तुनिष्ठ विचारांपासून, चालीरीती, परंपरा, उपाय योजना, उपचार यापासून आज व्यक्तीनिष्ठ व्यक्ती सापेक्ष पद्धतीचा सर्वत्र वापर होत आहे. अगदी न्यूटनचा नियमांनाही वस्तुनिष्ठ आईनस्टाईनच्या सापेक्षवादी नियम/थेअरीने मोडीत काढले. उपचार पद्धतीत तर आमुलाग्र बदल होत आहे.आता customized diagnosis report आधी अभ्यासले जातात. अगदी थेट DNA based profile वापरून nutriogenomic DNA based customized diet ही दिले जाते. माणसाच्या मनातल्या विचारांची सुसुत्रता आधी केवळ छापील मोजक्यांचीच होती. आता म्हणजे गेल्या १५ वर्षापासून ती स्वतंत्रपणे प्रत्येकाने मांडायची सोय सोशल मिडियाने केली .आता AI तर वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे सतत व्यक्तीबरोबर आहे.तेही चकटफू!! वर्गात शिकवलेले समजत नाही तर पसर्नल क्लासेसही आहेतच. customized कपडे,दागिने, घर सजावट सारे काही आहेच. यातून फक्त काही ठिकाणी गोंधळ कमी होण्याऐवजी तो वाढल्याचे दिसते.जसे सोशल मिडियावर या व्यक्ती निष्ठतेने बिभत्सरूप अतातायी विचार, व्हिडिओ, भाषण, हिंसक प्रचार रूपात दिसतो. customized वस्तूंच्या नावाखाली प्रचंड लूट व्यक्तींची होत आहेच.
खरं पाहता व्यक्तीनिष्ठता ही देगणी गोंधळ (Universal randomness) न वाढवता काही एकात्मिक पुन्हा घडवण्यासाठी हवा. जसा योग्य custemized diet, उपचारांनी व्यक्ती मग समाज आरोग्यदायी होईल. customized वस्तू बनवण्यासाठी स्वतःच्या सृजनाचा वापर करून मार्केटचा बळी न होता, योग्य माफक दृष्टिकोन हवा.
-शिक्षणक्षेत्रात प्रत्येक मुलाला मदत करण्याची वृत्ती' भविष्य या लहान मुलांचे आयुष्य आणि आपले भविष्य सुंदर करेल.एकमेका साहाय्य करु असे धोरण घेत नैतिकता पाळून प्रत्येक गोष्टीचा वापर हवा. AIचा वापर वैश्विक ज्ञानाच्या साहाय्यानेज्ञानी होण्यास व्हायला हवा.
या सगळ्या वस्तुनिष्ठ कडून व्यक्तीनिष्ठते कडून -- एकात्मिता धोरण --वैश्विक सुजाणता येण्यासाठी भोगवादी, ओरबडण्याची (ग्राहक-मालक दोन्ही दृष्टीने) संपुष्टात यायला हवी.
-भक्ती
प्रतिक्रिया
21 Jul 2025 - 5:26 pm | श्वेता व्यास
पुस्तक परिचय आवडला.
वस्तुनिष्ठतेकडून व्यक्तिनिष्ठतेकडे गेल्याने काही समस्यांचे निराकरण होईल असं मात्र नाही वाटत.
reversal is impossible
21 Jul 2025 - 7:36 pm | Bhakti
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.