गेले द्यायचे राहून.....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
27 Jun 2025 - 5:10 pm
गाभा: 

हा धागा आहे आपल्या सगळ्यांच्या काही न वापरल्या /सूप्त टॅलेंट्स बद्दल
आपण बहितेकजण जे शिकलो त्या आधारावर नोकरी व्यवसाय केले.
कॉलेजात असताना अनेक इच्छा असतात. उदा: नाटक करणे , टॉक शो करणे , लेखन करणे , संगीत वादन गायन , चित्रे काढणे , अनवट ठिकाणे शोधून भटकंती करणे., इतिहास अभासणे , जिओ पोलीटीकल माहिती घेणे, विवीध खाद्य पदार्थ करणे ( शेफ होणे ), सुंदर बाग करणे , कुत्रे पाळणे , मासे पाळणे, ई.
हे सगळी स्वप्ने आपण हौस / हॉबी या सदरात टाकून त्या सगळ्या गोष्टी नाकारून अभ्यासावर लक्ष्य देत नोकरी व्यवसाय केले.
एक वाक्य आठवते कुछने सपनो के लिये अपनो को खोय... तो कुछने अपनो के लिये सपनों को खोया.
माझ्या पिढी तले बहुतेक जण दुसर्‍या गटातलेच. स्वतःवर अन्याय करुन घेणारे. स्वतःकडे असताना क्षमता ही, ते दरवाजे बंद करून स्वतःपासूनच होरावून घेणारे.
त्यावेळच्या पालकांची / समाजाची मानसीकता असेल किंवा कसे. पण ते घडले.
माझ्या वर्गात एक जण खूप छान स्पिन बॉलिंग करायचा इतका की तो किमान रणजी तरी सहज खेळू शकला असता. पण......
पण काही भाग्यवान असेही होते की त्याना त्यांची स्वप्ने खरी करता आली. माझ्या वर्गातील एकाला शेती मधे खूप रस होता. पुण्यातील नामवंत कॉलेजमधून एम बी ए करूनही पठ्ठ्याने नोकरीच्या नादाला न लागता शेती संभाळली. नुसती संभाळलीनव्हे तर व्यावसयीकरीत्या फायद्यात आणली.
ही यादी तयार करत असताना जाणवले की आज यू ट्यूबवर असे करणारे अनेक तरुण तरुणी दिसतात. व्ही लॉगर्स. शेफ , पत्रकार , विवीध विषयांवर पॉडकास्ट करणारे , संगीत शिकवणारे, स्वतःचे स्टूडीओ असणारे , स्वतःचे यू ट्यूब चॅनल असणारे, मालीका बनवणारे असे अनेक आपल्या आवडत्या हौसेचाच व्यवसायात उपयोग करणारे.
हेवा वाटतो.
जसे वर म्हंटले आहे त्याप्रमाणे तुमच्यात एखादा गुण होता मात्र त्याला परिस्थितीमुळे न्याय देता आला नाही याची आज खंत वाटते.
आपल्याला करायचे होते पण त्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्याला पोटामागे धावावे लागले. अशा गोष्टींची यादी करुया.
मला नाटकात काम करायची फार आवड होती. काही स्पर्धांत बक्षीसेही मिळाली होती. त्या आवडीला फार प्रयासाने मुरड घातली. आज त्याबद्दल वाईट वाटते.
हार्मोनीयम / की बोर्ड उत्तम वाजवायचो. बासरीही वाजवायचो. पण आज ते सगळे काधीतरी सठीसामासी घडते. कॉलेजात असताना त्याकडे लक्ष्य दिले असते तर आज कदाचित काहितरी नावलौकीक असणारा कलावंत झालो असतो. त्याबद्दल खंत वाटते.
मराठी / इंग्रजी भाषेतील वाचन भरपूर करायचो. भाषेचा अभ्यास करायचे राहून गेले.
यादी करुया स्वत:ला जे काही द्यायचे होते आणि ते राहून गेले.( नक्षत्रांचे देणे )

प्रतिक्रिया

माहितगार's picture

28 Jun 2025 - 2:46 pm | माहितगार

या बद्दलच लिहायचे राहुन जाते ना! :)

कर्नलतपस्वी's picture

28 Jun 2025 - 7:36 pm | कर्नलतपस्वी

गेले द्यायचे राहून.....,
म्हणत आयुष्य Mute केलं
प्रारब्ध, नशीब म्हणत .....
कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं

जगण्याची मजा काय विचारता?
स्वतःच्या मनाला mute करून,
दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय...
Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर
Google करून बघतोय!

घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं
मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं ....

इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत
Telling lies करतोय....
worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय.

म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful
Stressful आयुष्य gressful करून जगतोय.

"आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे
"अपेक्षा" ची साथ देत "आशा" जगायची hope अजून bright आहे.

विजुभाऊ's picture

29 Jun 2025 - 4:13 pm | विजुभाऊ

झक्कास.... कर्नल साहेब

स्वराजित's picture

1 Jul 2025 - 1:42 pm | स्वराजित

खुप छान रचना

मी चांगली लाईन मारायचो.
यात मी तरबेज होतो.
मला यश सुद्धा मिळालं
पण अनेक कारणांमुळे पुढे हवा तसा वेळ या स्कील ला देऊ शकलो नाही.
याची मोठी खंत आहे.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jun 2025 - 5:02 pm | कानडाऊ योगेशु

जसे वर म्हंटले आहे त्याप्रमाणे तुमच्यात एखादा गुण होता मात्र त्याला परिस्थितीमुळे न्याय देता आला नाही याची आज खंत वाटते.

एखादा दुसरा गुण आहे पण असे गुण सामान्य व सामान्याच्या वर ह्या श्रेणीतले असल्यामुळे आवश्यक आत्मविश्वास कधीच नसायचा. त्यामुळे मागे वळुन विचार करताना ह्यापेक्षा चांगले होऊ शकले नसते असा विचार मनात येतो आणि आहे त्या स्थितीत समाधानी वाटते.

नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले
जगण्याच्या वाटेवर पुढे काटे आले
नक्षत्रांची एक एक उल्का जेव्हा झाली
काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली

विजुभाऊ's picture

30 Jun 2025 - 9:22 am | विजुभाऊ

वा....

धाग्याचा विषय उत्तम आहे. नवीन जगात "गेले जगायचे राहून" असेही म्हणावे लागणारी माणसे झपाट्याने वाढत आहेत आणि वाढतील असे वाटते.

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 6:56 pm | श्वेता व्यास

स्वत:ला जे काही द्यायचंय त्यात 'एक ना धड भाराभर चिंध्या' असल्याने सध्या चाललंय तेच बरंय :)
पण त्या भाराभर चिंध्यांमधून कधीतरी स्वत:ला देण्यासाठी एखादी गोष्ट गवसेल अशी आयुष्याकडून अपेक्षादेखील आहे.

ही तर सगळ्यांचीच स्थिती आहे श्वेता

चित्रगुप्त's picture

8 Jul 2025 - 2:38 am | चित्रगुप्त

मी जरा अपवादात्मक व्यक्ती आहे असे वाटते, कारण १९७१ साली दोन वर्षे इंजिनियरिंगची करून झालेली असता मी ते सोडून पूर्णवेळ चित्रकलेत रमू लागलो, ते आजतागायत. संगीतात मात्र चांगली गति असूनही ते व्यवस्थित शिकणे झाले नाही. भटकंती, वाचन, लेखन, संग्रहालये बघणे या सगळ्या आवडीच्या गोष्टी नेहमी करू शकलो. अजूनही खूप काही करायचे, बघायचे राहिलेले आहे, ते कितपत शक्य होईल कुणास ठाऊक. याविषयीचे काही लेखनः

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
https://www.misalpav.com/node/18587

एका चित्रकाराच्या आठवणी...
https://www.misalpav.com/node/21369

संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय
https://www.misalpav.com/node/23441

या धाग्यावरून हाच मूड बराचसा पकडणारे एक गाणे
तू- नळीवरचे आठवले. लिंक खाली देतो.

https://youtu.be/xvmxH0mDuAg

कोणाला इतरही गाणी आठवली तर डकवावीत.

एक शेर देखील आठवतो.

उम्र यूँ गुजरी है के जैसे सर से
सनसनाता हुआ पत्थर गुजरे..

तेव्हा अचानक बरेच काही राहून गेले ही जाणीव जगात व्यापक असावी.

श्वेता व्यास's picture

10 Jul 2025 - 5:37 pm | श्वेता व्यास

आवडलं, अजून थोडं मोठं गाणं हवं होतं असं वाटलं, आता तेच तेच ऐकावं लागेल :)