गाभा:
प्रश्न: Is: O5 ⊆ I5 ?
मागील पानावरून पुढे सुरू...
O ⊆ I अर्थात AI नवीन असे अर्थपूर्ण शब्द तयार करू शकत नाही. आउटपुट हा इनपुटचा सब सेट राहतो. हां , निरर्थक जीबरिश खंडीभर शब्द तयार करू शकेल पण त्याला काही किंमत नाही.
हां तर मग फक्त शब्दावर का थांबा ! शब्द हा तर फक्त कानांचा विषय झाला.
कल्पना करा की AI ला सर्वच सेन्सरी इनपुट्स देता आले तर आणि त्यातून AI मॉडेल बिल्ड करता आले तर...
व्याख्या
• समजा I5 : त्या सर्वच्या सर्व, शब्द स्पर्श रस रूप गंध ह्या पाचही ज्ञानेंद्रियांचा संवेदनाचा संच जो की LLM, किंबहुना LSM लार्ज सेन्सरी मॉडेल ला ट्रेन करताना वापरले गेले आहेत.
• समजा O : त्या सर्व मानवी बुद्धिमत्तेला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण, संवेदनांचा संच जे LSM जनरेट करू शकेल.
प्रश्न असा आहे की O5 हा I5 च सब सेट असेल की सुपर सेट ?
---
क्रमशः