सुखदुःखविवेक -भाग-१
#सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते.
व्याख्या १.
नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत.
व्याख्या-२
मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल.
-आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख
• आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्भवणारे सुखदुःख आहे.
व्याख्या -3
प्रतीकारो व्याधे: सुखमिति विपर्यस्यति जनः । - भूर्तिहरि
-"कोणतीहि व्याधि अगर दुःख झाल्यावर त्याचे जे निवारण त्यालाच लोक सुख असे भ्रमाने म्हणत असतात. दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.
व्याख्या- ४
तृष्णार्तिप्रभवं दुःखं दुःखार्तिप्रभवं सुखम् । - [शां२५)
- कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्भवले.
या संज्ञेनुसार सुख तृष्णामूलकच आहे, पण बाह्य स्पर्शानि इंद्रियांना सुख होते, जरी इच्छा / तृष्णा निर्माणच व्हावी असेही नाही.
उदा. योगायोगाने खडीसाखर इच्छा नसतांनाही जरी तोंडात पडली तरी सुख हे होतेच.
मात्रास्पशांनी शीतोष्णादिकांचा अनुभव घडून सुख दुःख होते असे गीतेत म्हटले आहे. (गी, 254).
प्रश्न-२
#सुखकसेभोगावे ? त्यासाठी कर्माचा त्याग नकोच...
'इंद्रियस्येंद्रियस्थार्थ रागद्वेषौ व्यवस्थितौ ' [गी. ३ ३४]
इंद्रिये व त्यांचं शब्दस्पर्श इत्यादिविषय यांच्यामधील आवड व द्वेष ही दोन्हीहि 'व्यवस्थित' म्हणजे मूळचीच स्वतंत्रसिद्ध आहे, असे सांगून हे व्यापार आत्म्याच्या कल्याणाचे कसे होतील किंवा करून होता येतील एवढेच काय ते आपणांस पाहणे आहे व त्यासाठी इंद्रियांच्या व मनाच्या वृत्ति मारण्यांच्या भरीस न पडतो,
#सदर वृत्ति आपल्या फायद्याच्या होण्यास इंद्रिय व मन आपल्या ताब्यांत ठेवा, स्वैर होऊ देऊ नका,'
'जगातील सर्व कतृत्व किंवा पराक्रम अजिबात नाहीसा करावा असे गीतेचे तात्पर्य नसून, (गी-१८.२६) कर्त्याचे अंगी समबुद्धीबरोबर धृती व उत्साह गुण पाहिजेत.
कोणतेंहि कृत्य दुःखकारक आहे म्हणून ते सोडिल्याने त्यागफल मिळत नाही, हा त्याग राजस होय. "(गी.१८.१८).
#पण ज्याला दुःखाचा यत्किंचित हि अनुभव नाही, त्याला सुखाची गोडी कळणे शक्य शक्य आहे का?
कदाचित नित्यसुख मिळणे सहज शक्य आहेच. पण
"सुखं सुखेनेह न जातु लभ्यं दुःखेन साध्वी लभते सुखानिं ।
सुखाने सुख कधी मिळत नाही, साध्वीला सूखे प्राप्त होण्यास दुःख किंवा कष्ट सोसावे लागतात. (मभा वन २९३,४),
जांभूळ ओठावर पडले ते तोंडात घालावे लागते, तोंडात पडले तरी ले चावण्याचे कष्ट घ्यावे लागतात.
#
• सुखस्यानंतर दुःख दुःखस्यानंतर सुखम् (वन २६०,४९)
सुखापाठीमागे दुःख आणि दुःखापाठीमागे सुख लागलेलंच आहे,
वीट न येता विषय सुखोपभोगच नित्य एकसारखा मिळणे अगदी असंभवनीय नसेल, पण दुःख अजिबात नाहीसे होऊन केवळ सुखच सदैव अनुभविणे निदान या कर्मभूमीत तरी शक्य नाही.
प्रश्न-३. संसारात सुख अधिक का दुःख ?
१.आयुष्याला ज्या अर्थी मनुष्य कंटाळलेला दिसत नाही त्या अर्थ संसारात त्याला दुःखापेक्षा सुखच अधिक उपभोगायला मिळेल असेल.
२.पण आदिमानव, रानटी मनुष्याच्या कष्टाची, दुःखाची तुलना आता केली. तर ते नक्कीच अधिक होते. पण रानटी मनुष्यही आनंदात राहिला / राहतो, हे सुख म्हणजे "मी पशु नसून मनुष्य आहे" या समाधानात आहे. "भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धीजीविनः ।बुद्धिमत्सु नराः श्रेष्ठा....
३.नरदेहधारी प्राण्याला सुख की दुःख अधिक हे ठरविण्यासाठी मनुष्याच्या प्रस्तुतच्या वासनांपैकी किती वासना सफल किती निष्फल हे पाहावे लागेल.
मनुष्याची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही, ती वाढतच जाते.त्यामुळे तृष्णा सतत जागी असते, मनुष्यास मी दुःखी आहे' असे नेहमी वाटते.
#
'सुखाद्बहुतरं दुःख जीविते नास्ति संशयः ।
या जीवितामध्ये /संसारात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे. शां. २०५.)
#सुखपाहताजवापाडेदुःखपर्वताएवढे ।। - तुकोबा -
उदा.
#सुखोपभोग /#सुखेच्छा
हा अपूर्णांक नेहमीच वाढत राहतो प्रथम १/२ असला ,तर नंतर ३/१० पर्यंत वाढू शकतो. -
पण
ज्या गोष्टी तृष्णा असंतोष व असंतोषामुळे पुढे दुःख होते तर ते दूर करण्यासाठी तृष्णा व सर्व सांसारिक कर्माचा त्याग करायचा?
नक्कीच नाही...
जिव्हेने अपशब्द उच्चारले म्हणून तिला तोडूनच टाकायची ?
#असंतोष हवा कारण....
१.आपणास प्राप्त झालेल्या स्थितीतच कुजत न राहता तीन यथाशक्ती शांत व सम चित्ताने उत्तरोत्तर अधिकाधिक सुधारणा करीत राहून ती शक्य तेवढ्या उत्तम उत्तमावस्थेत आणण्याची जी इच्छा तिला मूलभूत होणारा जो असंतोष तो कधीच ग्रर्ह्य मानता येत नाही.
२.'यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ' - गोडी किंवा इच्छा पाहिले पण यशाची असावी, व्यसनही पाहिजे पण विदयेचे असावे ते ग्रर्ह्य नाही.
३.तृष्णा अगर असंतोष भावी उत्कर्षाचे बीज आहे, म्हणून कोणत्या तृष्णेपासून किंवा असंतोषापासून दुःख होते यावर नीट विचार करून दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, त्यासाठी यच्चयावत् कर्म सोडण्याचे कारण नाही.
कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात तात [गी. २.५०].
#गीतारहस्य५.
#सुखदुःखविवेक -भाग-१

#गीतारहस्य
#सुखदुःखविवेक
#भाग२
चक्षुः पश्यति रूपाणि मनसा न तु चक्षुषा "
पहाण्याचे काम केवळ डोळ्यांनीच होत नसून मनाचे त्यास जरूर साह्य लागते [ममा सां-३११.१७) आणि ते मन जर व्याकुल असले तर डोळ्यांनी पाहून हि न पाहिल्या सारखे होते
आधिभौतिक सुखदुः यांचा अनुभव घडण्यास केवळ इंद्रियेच कारण नसून त्यांस पुढे मनाचे साह्य असावे लागते असे उघड होते; आणि आध्यात्मिक सुखदुःखे तर मानसिकच असतात, एतवता सर्व प्रकारचा सुखदुः खानुभव अखेर मनावरच अवलंबून आहे.
आपणांस जे काही करावयाचे ते मनोनिग्रहाने त्यांतील फलाशा सोडून व सुख्खदुःखांच्या ठायी समबुद्िध ठेवून आपण करीत गेलें म्हणजे कर्म न सोडितांहि त्यांच्या दुःखाची बाधा आपणांस लागण्याची भीति अगर संभव राहत नाही, असे गीतेचे सांगणे आहे.
#फलाशा न धरणे म्हणजे?
१. फल मिळता ते सोडणे, किंवा ते फल कोणास कधींही न मिळण्याची वासना ठेवणे असे नव्हे,
२. दरएक कर्माचा काहीतरी फल मिळणार हे ज्ञान हवे.
३. अमक्या फलासाठी अमुक अशी योजना करुनच कोणतेहि कर्म करण्याची त्याने इच्छा धरिली पाहिजे, नाहीतर क्रिया वेड्यागत निरर्थक होतील.
परंतू अमूक कमर्मासाठी इच्छितच फल मिळणे अवश्यक आहे. या माझेपणाची आसक्ती ठेवली असला हाव, अभिमान, अभिनिवेश किंवा आग्रह त्याने मन ग्रासते व इच्छित फल मिळण्यास अडथळा आल्यास दुःखपरंपरेस आरंभ होतो,
फलाशा सोडून यथाप्राप्त विषयांचे निष्काम व निसंग बुद्धीने जो सेवन करतो तो खरा स्थितप्रज्ञ होय. [ गी. २.६४].
मनुष्य आपल्याला नसते महत्त्व होऊन प्रकृतीच्या व्यापारात आसक्त होत असल्यामुळे सुखदुःखभागी होत असतो,
- "न प्रदृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चापियम् "[५.२०] सुख पाहून फुरफुरुन जाऊं नये आणि दुःखाने खट्टूहि होऊ नये, आणि दुसऱ्या अध्यायांत ही सुखदुःखे निष्काम बुद्धीने सोशिली पाहिजेत असेही म्हटले आहे.
फलाशा, तृष्णा, कर्माचा नाश, दुःख यात न अडकता मनोवृत्ती शुद्ध राहून सर्वभूतहितप्रद होत असते.
- इंद्रिये ताब्यात ठेवून स्वार्थाऐवजी वैराग्याने निष्काम बुद्धीने लोकसंग्रहार्थ त्यांना आपआपले व्यापार करू देणे, आणि संसारमार्गीप्रमाणे तृष्णा मारण्यासाठी इंद्रियांच्या सर्व व्यापारांचा म्हणजे कर्माचा आग्रहाने समूल नाश करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
#कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भ: मा ले संगो..स्तकर्मणि ।
कर्म करण्याचाच तुझा अधिकार आहे?
- 'कर्मफलाच्या ठायी केव्हांच तुझा अधिकार नाही."
(कर्मविपाकाप्रमाणे तुझ्या कर्माचे फल व्हायचे असेल, ते होईल, तुझ्या इच्छेने ले कमी जास्त, अगर लवकर किंवा उशीरा होणे शक्य नसून, अशा प्रकारच्या हावरेपणाने फुकट तुला त्रास व दुःख होते.
पण 'कर्म न करण्याचा तू आग्रह धरु नको..
फलाशा सोडून कर्म करीतच रहा.
#
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे [गी-६.१५]
-
परंतू शरीरधारणार्थ तरी ऐहिक वस्तूंची जोड या शांतीस पाहिजे. याच अभिप्रायाने आशीर्वादाच्या संकल्पांत नुसते शान्तिरस्तु असे म्हणतो
#"शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चासु"
म्हणजे शांतीबरोबरच पुष्टि व तुष्टिहि पाहिजे. तथापि पुष्टिची म्हणजे ऐहिक सुखाची अनावर हाव असणेंहि योग्य नाही. म्हणून शांती, तुष्टि, पुष्टि ही तिन्हीं योग्य प्रमाणात प्राप्त होवोत भावार्थ.
कोणत्याहि #कर्माचीनीतिमत्ता केवळ बाह्यपरिणामांवरून ठरवता येत नाही, अशाप्रकारे अध्यात्मपक्ष स्वीकारणे टळत नाही. तर तो अर्धवट स्वीकारण्यांत काय हशील ? म्हणून सर्वभूत-हित, पुष्कळांचे सुख, माणुसकीचा परम उत्कर्ष वगैरे नीतीनिर्णयाची सर्व बाह्यसाधने किंवा आधिभौतिक मार्ग गौण ठरवून आत्मप्रसादरुपी अत्यंत सुख आणि त्यालाच जोडून असणारी कर्त्याची शुद्बुद्धी या आध्यात्मिक कसोटीनेच कर्माकर्माची परीक्षा केली पाहिजे, असा कर्मयोगशास्त्रांत अखेर सिद्धांत केला आहे.
"आत्मा वा आरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निविध्यासितव्यः"
दृश्य जगाचे परीक्षण करुन जर परोपकारासारखी तत्त्वेच. अखेरीस निष्पन्न होतात, तर अध्यात्मविद्येची महती त्याने कमी न होता, उलट #सर्वांभूती #एकच #आत्मा असल्याचा हा पुरावाच आहे असे म्हटले पाहिजे.
प्रतिक्रिया
17 Apr 2025 - 6:45 am | सोत्रि
मस्त!
ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
(लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
(लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्भवले)
(लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
(लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी
17 Apr 2025 - 10:37 am | Bhakti
धन्यवाद सोत्रि ,
हे कधीतरी समजून घेईन.
हे चांगलच समजलं आहे :)
17 Apr 2025 - 10:38 am | Bhakti
संपादकजी ,भाग १ चूकून दोनदा कॉपी पेस्ट झालाय तो काढून टाकता का? तसदीसाठी क्षमस्व.
17 Apr 2025 - 11:00 am | सोत्रि
ते मलाही जाणवलं होत, तसा व्यनीही तुम्हाला करनार होतो, पण समहाऊ विसरून गेलो.
- (विसरभोळा) सोकाजी