महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
17 Nov 2024 - 8:45 pm

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.

मत टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.

एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.

महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)

काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)

भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)

मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्‍याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.

१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८

साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो.

_________________________________________________________________________

या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.

काँग्रेस

काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.

ऊबाठा गट

शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.

१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६

शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.

आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.

म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.

____________________________________________________________________

भाजप

भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.

भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.

शिंदे गट

शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.

शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.

अजित पवार गट

अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.

म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.

===================================================

बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्‍यापैकी चुकू शकतो.

____________________________________________________________________________________

मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.

________________________________________________________________

इतर काही अंदाज -

- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.

- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.

- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.

- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.

- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार

- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही

- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.

- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता

- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.

- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता

- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.

* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.

आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.

- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.

__________________________________________________________

इच्छा यादी

खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.

- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Dec 2024 - 10:36 pm | अमरेंद्र बाहुबली

ते झालं इव्हीएम मुळे, नाहीतर कंबरडे कोणाचे मोडले होते, कोण रडत होते नी मोकळे करा म्हणत होते सर्वश्रुत आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2024 - 9:43 am | श्रीगुरुजी

अरेरे, काय वाईट वेळ आलीये शेळ्यांवर.

उठांना पंतप्रधान करायला निघाले होते. ते नाही जमलं म्हणून उठांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करायला निघाले होते. ते नाही जमलं म्हणून मविआ निवडून आल्यावर उठांना एक दिवस तरी मुख्यमंत्री करा अश्या गयावया करायला लागले. आता तर आमच्याकडे पुरेसे आमदार नसले तरी आमचाच विरोधी पक्षनेता करा म्हणून गयावया करताहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 10:07 am | अमरेंद्र बाहुबली

पंतप्रधानही झाले असते, पण पाठीत वार झाला.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2024 - 10:19 am | श्रीगुरुजी

मातोश्रीचे पंतप्रधान होतील का?

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 10:37 am | अमरेंद्र बाहुबली

ईव्हिएम सेट केलं नाहीतर देशाचेही बनतील.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2024 - 11:23 am | श्रीगुरुजी

विरोधी पक्षनेतेपद वाडग्यात पडेल का?

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 11:39 am | अमरेंद्र बाहुबली

ते इव्हीएम सेट करणारे सांगू शकतील.

https://www.lokmat.com/maharashtra/evm-vvpat-not-a-single-vote-differenc...

-------

@ अमरेंद्र बाहुबली..... आता जर तुमचा वरील बातमीवर विश्वास नसेल तर, पुढची निवडणुक येई पर्यंत हा विषय डोक्यातून काढून टाका.

पुढच्या निवडणुकीच्या वेळी, मी तुमची त्रयस्थ निरीक्षक म्हणून, तूम्ही सांगाल त्या पार्टी तर्फे नेमणूक करू शकतो.

------

गंमत अशी आहे की, ज्यांनी सरकार तर्फे, EVM आधारीत निवडणुक पद्धतीत भाग घेतला आहे, अशी मंडळी EVM ला दोष देत नाही आहेत.

माझ्या दोन मित्रांनी, सरकार कडून, ह्या वेळी, EVM आधारीत निवडणुक पद्धतीत भाग घेतला होता. त्यांनी पण हेच सांगितले की, It is impossible to hack an EVM.
--------

बाकी, तरीही तुमचा EVM वर विश्वास नसेल तर, ह्या मानसिक रोगावर माझ्या कडे इलाज नाही... काही लोक जसे, सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, ह्याच मानसिकतेत आयुष्यभर असतात. तसेच तुमचे होऊ नये ह्यासाठी प्रतिसाद दिला.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 1:34 pm | अमरेंद्र बाहुबली

इव्हिएम आधीच सेट होऊन आले असतील तर निरीक्षकाला काय डोंबल कळणार?
बाकी, तरीही तुमचा EVM वर विश्वास असेल तर, ह्या मानसिक रोगावर माझ्या कडे देखील इलाज नाही...

अबा तुमचे म्हणणे बरोबर आहे पण कोणाला विश्वास नाही. तुम्ही एक काम का नाही करत, एक लेख का नाही लिहीत कि EVM कशी हॅक करता येतात?

म्हणजे सध्याची प्रोसेस काय आहे, किती स्टेप्स आहेत, आणि त्यातील कोणत्या स्टेप वर हॅकिंग होऊ शकते आणि कसे आणि सध्याची प्रोसेस ते उघडकीला आणण्यास कशी असमर्थ आहे ? म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 3:43 pm | अमरेंद्र बाहुबली

इव्हीएम मशीन फक्त हॅकच करता येते हे कशाच्या जोरावर सांगत आहात?

टीपीके's picture

9 Dec 2024 - 3:51 pm | टीपीके

मग कशी काय मते बदलतात? तुम्हीच सांगितले ना की हा इव्हीएम घोटाळा आहे, मग तो घोटाळा कसा घडला किंवा कसा घडवता येतो ते सगळ्यांना सजवून सांगा अशी विनंती. त्या मुळे या दुष्ट, अज्ञानी लोकांचे डोळे उघडतील ना.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2024 - 4:24 pm | श्रीगुरुजी

आव्हान दिले तर कपाळमोक्ष होईल. त्यांना इव्हीऐमची अंतर्बाह्य सखोल माहिती आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 4:32 pm | अमरेंद्र बाहुबली

इव्हीएम नकोच बॅलेट पेपर वापरा, भाजपेयी का भितात बॅलेटला?

टीपीके's picture

9 Dec 2024 - 4:50 pm | टीपीके

अहो पण का ते सांगा ना? दोघांची तुलना करून कोणता विकल्प चांगला हे ठरवता येईल ना? फक्त तुम्ही आणि मी बोललो म्हणून लोकं ऐकणार नाहीत ना, सर्वोच्च न्यायालयानेही इव्हीएम बद्दल काहीच आक्षेप नोंदवले नाहीत.

मला माहिती आहे बॅलेट पेपर उत्तम म्हणजे मग आपण बूथ कॅप्चर करून पाहीजे तसा निकाल फिरवू शकतो आणि इतके वर्ष लोकांच्या मनाविरुध्द्व जसे राज्य केले , लोकशाहीची सेवा (खिक्क ) केली तशी परत करू शकू, पण लोकांना असे सांगता येणार नाही ना, आणि नुसते ओरडून कोणी ऐकणार नाही. त्यासाठी मुद्देसूद चर्चा करावी लागेल. बरोबर ना? बरं पूर्वी राजदीप वैगरे सारखी लोकं थोडंफार तरी इव्हीएम वर शंका घ्यायचे पण म्हणतात ना घर फिरलें की घराचे वासे पण फिरतात , आता तेच आपल्याला शिकवतात की हा रडीचा डाव आहे, त्यामुळे आपल्या आरोपांना आपल्या कार्यकर्त्यांच्या वर्तुळाबाहेर पुरेशी प्रसिद्धी पण मिळत नाही , करायचे तर काय करायचे?

तुमच्या मार्गदर्शनाचा अभिलाषी

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 3:21 am | मुक्त विहारि

"इव्हिएम आधीच सेट होऊन आले असतील तर निरीक्षकाला काय डोंबल कळणार?"

त्यासाठी तर, प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनीधी, EVM चेक करतो.

चला ज्याअर्थी तुम्ही इतक्या छातीठोकपणे, EVM हॅक करण्यात आले होते, सांगत आहात, त्याअर्थी, EVM कसे हॅक करायचे? हे पण सांगा.

एकतर सूर्य पृथ्वी भोवती तरी फिरत असेल नाही तर, पृथ्वी सूर्या भोवती. तसेच, एक तर EVM हॅक तरी होत असेल किंवा EVM १००% हॅक होत नसेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Dec 2024 - 1:38 pm | चंद्रसूर्यकुमार

काही लोक जसे, सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, ह्याच मानसिकतेत आयुष्यभर असतात.

माझी तर मानसिकता वेगळीच आहे. पृथ्वी, गुरू, शुक्र वगैरे मंडळी सूर्याभोवती फिरत असतात. हा त्याच्या भोवती फिरतो, तो त्याच्याभोवती फिरतो, इतर कोणाभोवती फिरताफिरता आपल्या भोवतीपण फिरतो वगैरे वगैरे. एक गोष्ट कळत नाही काय खाज असते असे कुठे कुठे फिरत बसायची? गप घरी बसून आराम करायचा ते सोडून कुठेकुठे फिरत का बसतात हेच मला कळत नाही.

माझी मानसिकता अशी वेगळी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 1:40 pm | अमरेंद्र बाहुबली

एका जागी बसून बोर होत असावेत. :)

रानरेडा's picture

9 Dec 2024 - 8:38 pm | रानरेडा

म्हणे एक गणित तज्ज्ञाने गणित करून पक्षांना उडत येत नाही हे सिद्ध केले होते 
तसेच एक गणिती एकदा शिकार करायला गेला त्याच्यापुढे वाघ आला त्याची पहिली गोळी उजवीकडे १ मीटर वर लागली दुसरी गोळी डावीकडे १ मीटर वर लागली गणिती बोलला मी सरासरी ने वाघाची शिकार केली पण वाघ गणिती नसल्याने त्याने गणित तज्ञास खाऊन टाकले 
असले विनोद वरील लेख वाचताना आठवत होते 
गणित करून इतके परफेक्ट कळत असते तर यांनाच राजकीय पक्षांनी मदतीला घेतले असते 
अतिशय विनोदी धागा म्हणून मला याची लिंक आलेली 
धागाच नव्हे तर प्रतिक्रिया अजून धमाल खास करून धागा निर्मात्याची गिरा फार भी टांग उप्पर हि वृत्ती आणि त्याला अहो रूपं अहो ध्वनी म्हणून अनुमोदन देत लिहिणारा 
फार फार हसलो 

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 9:38 pm | अमरेंद्र बाहुबली

स्वतःचा अभ्यास शून्य. श्रीगुरुजीनी अभ्यास करुन धागा काढलाय तर त्यावरही पो टाकायचा?

रानरेडा's picture

9 Dec 2024 - 8:58 pm | रानरेडा

मुक्त विहारि मुवि काका , चंद्रसूर्यकुमार , डॉ सुबोध खरे काय ते फिल्मी नाव घेतलेल्या ला समजवायला निघाला आहात ?
कशाला ऊर्जा वाया घालवता
एक ओझे वाहणाऱ्या प्राण्या पुढे हिंदूंचा एक पवित्र धर्म ग्रंथ वाचला तर तो प्राणी कालचा गोंधळ बरा होता असे म्हणतात
सुज्ञास सांगणे नलगे

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 9:37 pm | अमरेंद्र बाहुबली

रानरेडा जंगलातच बरा, माणसांमध्ये नको. झाला ना पो टाकून? या आता. हुश्श….

वेडा बेडूक's picture

10 Dec 2024 - 11:28 am | वेडा बेडूक

गाढवाचा अपमान कशाला करताय? ते किमान ओझे वाहण्याच्या कामाचे असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 11:52 am | अमरेंद्र बाहुबली

बेडूक तर त्याही कामाचा नाही. :)

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 2:35 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 9:47 pm | अमरेंद्र बाहुबली

सध्याचे देशातील घाणेरडे वातावरण पाहून अनेक विचारवंत लेखक चिंता व्यक्त करताहेत.
.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2024 - 9:59 pm | श्रीगुरुजी

नेमाडे स्वत:च हास्यास्पद झालाय. कोणीही विचारत नसल्याने मुद्दाम वादग्रस्त विधाने करून प्रकाशात राहण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. असल्याच्या मताला काडीचीही किंमत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 10:03 pm | अमरेंद्र बाहुबली

जो भाजपबद्दल खरं बोलतो तो लगेच हास्यास्पद कसा ठरतो?

रात्रीचे चांदणे's picture

9 Dec 2024 - 10:06 pm | रात्रीचे चांदणे

कदाचित सलग १५ वर्ष ना आवडत सरकार सत्तेत असल्यामुळे चीड चीड होत असेल.

हा हा हा

आलेले रिझल्ट पाहता काय दर्जाचा अभ्यास होता ते दिसत आहे
कंपनी मध्ये असल्या लेव्हल चे एस्टिमेशन केले असते तर लाथ मिळाली असती

धागा काढताना गणित , लॉजिक आणि माहिती जमवण्याचे शस्त्र शिकण्याची सिरिअस गरज वाटत आहे .
आणि हो analysis करताना पूर्वग्रह आणि द्वेषाची झापडे उतरवणे

हा धागा निकालानंतर विनोद विभागात टाकला पाहिजे

अहो हे निवडणुकीचे अंदाज आहेत, कधी चुकणार, कधी बरोबर येणार. त्यांनी त्यांच्याकडे जमा झालेली माहिती, त्यांचे आकलन यावरून वर्तवलेला शेवटी अंदाज तो. हा, कधी कधी पूर्वग्रहामुळे अधिक चुकतो, पण चालायचेच. पण म्हणून त्यांना तुम्ही दिलेली कमेंट फार हार्ष वाटते.

एनी वे , श्रीगुरुजी निदान म्हणाले तरी त्यांचा अंदाज साफ चुकला, इतके दिलदार तर आहेत ते....

(कधी कधी वाटते की गुरुजींचा फडणीसांवर इतका राग आहे की ते राऊत, ते जाउ दे रागा, ते जाउ दे शप यांना पण आपले नेते मानायला तयार होतील की काय :D )

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 7:42 am | अमरेंद्र बाहुबली

सगळ्यांचे अंदाज हेच होते. आता काय झोल
झाला हे सगळ्यांनाच माहितीय.

अभ्यास ? कसला बोडक्याचा अभ्यास ?

फडणवीस द्वेषाचा चष्मा चावून हे सो कॉल्ड गणित शिक्षक काहीपण खरडत होते
आणि याना पाठिंबा देणार्या चा अभ्यास , गणित संख्याशास्त्र या विषयाशी काही संबंध नाही

खाली काही विधानाची यादी देतोय - ती पहा आणि पोटभर हसा
मला निकालाच्या दिवशी या दोघांचे काय झाले असेल या विचाराने गदगदून हसायला येत आहे. बरनॉल ला पूर्ण बॉक्स घेऊन बर्फाच्या लादीवर बसलेले असणार

इंजिनिअरिंग ला एक अभ्यासाचे नाटक आणि शो ऑफ करणारा होता . मोठा शो . पहिल्या वर्षी आठ हि विषयात नापास झाला होता. गणितात शून्य मार्क होते . आणि मग मला आठवते एखाद वर्षात त्याने इंजिनिअरिंग सोडले -

धागाकर्त्याचा अभ्यास त्या दर्जाचा आहे .

हि विधाने

१) मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.

मत टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.

२) परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्‍याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही.

३) साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो.

४) काँग्रेस

काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.

ऊबाठा गट

उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.

५) म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.

६) भाजप

भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.

भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.

( आता वाचले तर हसून हसून पुरेवाट होते - काय पण द्वेष भाजप आणि फडणवीस यांचा . धूर आणि जाळ संगत )

७) शिंदे गट

शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.

शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.

८) अजित पवार गट

अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.

९ ) म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.

१०) मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.

आता तर विनोदाचे फटाके आहेत

- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.

- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.

- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार

- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही

- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.

- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता

- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.

- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता

- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.

आणि यांची इच्छा असली कि किती द्वेष भरलेला ते दिसतेय

- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.

अर्थात एक उडणारा काळा पक्षी असतो त्याच्या शापाने हिंदूंना पवित्र असणारा प्राणी मरत नाही असे म्हणतातच

वाचा आणि परत परत हसा

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 9:46 am | अमरेंद्र बाहुबली

त्यांनी लिहिले ते बरोबरच होते नी साधारण असेच निकाल अपेक्षित होते, पण इव्हीएम ने असा चमत्कार घडवला की महाराष्ट्र अजूनही शॉक मधे आहे. त्या शिवाय का इव्हीएम विरोधात लोक रस्त्यावर उतरलेत?

वामन देशमुख's picture

10 Dec 2024 - 10:02 am | वामन देशमुख

इव्हीएम विरोधात लोक रस्त्यावर उतरलेत?

कोण? कुठे? कधी?

---

खरंतर महाराष्ट्रातील सुजाण मतदार (रस्त्यावर मोकाट न फिरता) आपापली कामे करत राहून लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत आहेत. त्यांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास वृद्धिंगत झाल्याचे हे लक्षण आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 10:07 am | अमरेंद्र बाहुबली

अंधभक्त म्हणजे सुजाण नागरिक नाहीत.

श्रीगुरुजी's picture

10 Dec 2024 - 10:08 am | श्रीगुरुजी

काही जणांना वाटते की शिळ्या वडापाववर दिवस काढणारे, 'आवाज कोणाचा' असे बोंबलणारे मूठभर निरूद्योगी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 11:04 am | अमरेंद्र बाहुबली

काही जणांना वाटते की सकाळी झेंड्या समोर बालिश खेळ खेळनारे नी कुजबुज करुन दिवस काढणारे, रामंदिराच्या नावाने खंडण्या गोळा करणारे' मूठभर निरूद्योगी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र.

सुबोध खरे's picture

10 Dec 2024 - 6:55 pm | सुबोध खरे

भुजबळ बुवा

रोज सकाळी उठून लोकशाहीची हत्या, इ व्ही एम चा घोटाळा, निवडणूक आयोगाचा गैरवापर, भाजपचा भ्रष्टाचार असं रडगाणं गाऊन काहीही होणार नाही हे समजतंय का?

पाच वर्षे रडगाणंच गाणं तुमच्या नशिबात आलंय हे लक्षात घ्या.

असलं रडगाणं म्हणजे च्युईंग गम चघळण्यासारखं असतं

कितीही चघळलं तरी पोटात काहीही जात नाही

काही वेळाने स्वादही राहत नाही.

मग केवळ सवय म्हणून रडताय असं समजून लोक दुर्लक्ष करतात.

लक्षात ठेवा

सतत किरकिर करणाऱ्या बाळाकडे प्रत्यक्ष त्याची आई सुद्धा कंटाळून दुर्लक्ष करते

श्रीगुरुजी's picture

10 Dec 2024 - 12:33 pm | श्रीगुरुजी

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद वर्तविले होते. आज माझ्या लेखामुळे एक आधुनिक रेडा भडाभडा ओकला. बहुधा काल रात्रीची झोप अजिबात न झाल्याने भरपूर पित्त झाले असावे किंवा काल रात्री हातभट्टी जरा जास्त झाली असावी किंवा मग एमबीएच्या धाग्यावर येऊन तंगडी वर केल्यावर पाठीत जो जोरदार रट्टा बसला होता, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी या धाग्यावर येऊन ओकाऱ्या काढल्या.

असो. ओकून पोटातली घाण बाहेर काढून टाकणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी हितकारक असते. आता रेडेमामांना जरा बरे वाटत असेल. अजूनही उसासे, उमाळे येत असतील तर उरलेला ऐवज सुद्धा ओकून काढून टाका.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 12:42 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क. रेड्याच्या पाठीत चांगलाच रट्टा दिलात. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली

आता रेडाच काय त्याच्या पुढच्या सात पिढ्या काही उत्तर द्यायला येत नाहीत. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Dec 2024 - 12:08 am | अमरेंद्र बाहुबली

रेडा काही परत आला नाही. थोडेसे रेकतो नी पळून जातो! :)

श्रीगुरुजी's picture

10 Dec 2024 - 5:44 pm | श्रीगुरुजी

निवडणूक आयोगाने २८८ विधानसभा मतदारसंघातील यदृच्छ पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी ५ vvpat मधील मतपत्रिकेंची मोजणी केली असून त्यात मतयंत्रातील प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते व पेटीत पडलेल्या छापील मतपत्रिकांनुसार प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते यात शून्य अंतर आढळले. ही मोजणी सर्व उमेदवार (किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या) उपस्थितीत होते.

श्रीगुरुजी's picture

10 Dec 2024 - 5:48 pm | श्रीगुरुजी

या पूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले असून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जाते.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 6:41 pm | मुक्त विहारि

आता ज्यांचा EVM वर विश्वास नाही, अशा लोकांना पण ह्या प्रक्रियेत सहभागी करायला हवे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 5:58 pm | अमरेंद्र बाहुबली

जुना डेटा रीसेट केला होता की नाही?

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 6:40 pm | मुक्त विहारि

हे तुम्हीच का नाही शोधून काढत?

कारण, तुमचा EVM वर विश्वास नाही आणि EVM कसे हॅक करायचे हे पण तुम्हाला माहिती असेल.

आमचा EVM वर पूर्ण विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला कमी मते मिळाली तरी मी EVMला दोष दिला न्हवता.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Dec 2024 - 6:40 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे केला का नाही केला?

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 6:46 pm | मुक्त विहारि

बाय द वे,

वक्फ बोर्डाच्या बाबतीत तुमची मते वाचायला आवडतील...